davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

माझ्या ‘दवबिंदू’ची कहाणी

                                          

cropped-dew122.jpg

थोडंसं हितगुज माझ्या माय-मराठीतून

पहाटेच्या सुंदर शांत वेळी हिरव्या गार पानांवर पडलेले मोत्यासारखे दवबिंदू, फुलांच्या रंगीबेरंगी मोहक पाकळ्यांना अलगद स्पर्श करून तिथेच विसावलेले दवबिंदू, निळ्या आकाशाशी नातं सांगणारे आणि धरतीच्या ओढीने इथल्या फुला-पानांवरही अवतरणारे दवबिंदू, सूर्याच्या कोवळ्या किरणांत अधिकच तेजस्वी दिसणारे दवबिंदू. दवबिंदू आपण अनेकदा बघतो. काही जणांना ते क्षण-भंगुर वाटतही असतील पण मला मात्र त्यांचं निर्मळ, पारदर्शी, पानाच्या दोन टोकात झुलणारे रूप अधिक भावतं. पाना-फुलांचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते त्यांच्यावर दवबिंदू पडल्यामुळे. आपल्या आयुष्याचंही असंच असतं. आपलं आयुष्यही सजलेलं असतं वेगवेगळ्या माणसांनी. ही माणसं आणि त्यांच्यासोबतचे आपले अनुभव आणि आपलं नातं ह्या सगळ्यातून तयार होतात आपल्या आयुष्यातील दवबिंदू. क्षण-भंगुर असले तरीही आयुष्यभर सोबत राहतात आठवणींच्या रुपात. भूतकाळ आणि भविष्यकाळात झुलताना वर्तमानालाही स्पर्शून जात असतात आणि ज्या क्षणी हा समतोल बिघडतो, त्या क्षणी तो दवबिंदू आपल्या हातून निसटून जातो. पण जाताना आपल्यातल्या सुंदर क्षणांचा आणि अनुभवांचा ठसा मनावर उमटवून जातो. तोच असतो आपण अनुभवलेल्या सुंदर पहाटेचा साक्षीदार. माझ्या आयुष्यातील अशाच काही ‘दवबिंदू’वर काही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ते वाचताना तुमच्याही आयुष्यातील दवबिंदूंना स्पर्श केल्यासारखे तुम्हाला वाटेल अशी आशा आहे.

असा एखादा ब्लॉग सुरु करणं हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. आयुष्यात अचानक काही गोष्टी अशा घडतात की त्या आपल्याला बदलून टाकतात. सरळ चाललेल्या आयुष्यात वादळ घेऊन येतात. पण वादळातून उठता-उठता आपल्या पुढच्या आयुष्याचा मार्ग आपल्यालाच ठरवावा लागतो. भरकटलेलं आयुष्य योग्य मार्गाला लागतंय की नाही हे आपणच बघायचं असतं. वादळाबरोबर आपलाही पाला-पाचोळा होऊ द्यायचा की वादळाच्या खुणा आपल्यावर बाळगत पुढचा प्रवास करायचा हे सुद्धा आपल्यालाच ठरवायचं असतं. माझं लिखाण आणि हा ब्लॉग हे ह्यातूनच सुरु होतंय कदाचित. आज ते माझं स्वप्न झालंय कारण त्या साठी मी जी किंमत मोजली आहे ती ही तितकीच मोठी आहे, खरं तर ती कशानेही भरून येण्यासारखी नाही. खूप उशीर झालाय खरं तर, पण निदान सुरुवात तरी झाली आहे. मला कसलीच, कुणाशीही स्पर्धा करायची नाही. मला ह्या ब्लॉग ला एका विशिष्ठ उंचीवर नेवून ठेवण्याचीही महत्वाकांक्षा नाही. ह्यातून मी फक्त मला समाधान मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या लिखाणातील विचार, अनुभव तुम्हाला भावून गेले तर ते सगळं श्रेय माझ्या आई-बाबांचं असेल. त्यांचे संस्कार, माझ्याबद्दलचा विश्वास आणि तळमळ हेच माझ्या लिखाणाचं कारण आणि विचारांचा पाया आहेत आणि कायमच असतील. आजच्या पिढीची भाषा इंग्रजी, म्हणून काही लेख हे इंग्रजी मध्ये लिहित आहे. पण माझ्या हृदयाची भाषा मात्र मराठीच त्यामुळे हृदयाला भिडलेले विषय, अनुभव, आठवणी मात्र मराठीतच असतील.

आपले विचार तयार होतात आपल्याला आलेल्या अनुभवांतून आणि आपल्याला वेगवेगळे अनुभव मिळतात ते आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या नात्यांकडून आणि काही नात्यात बांधल्या न गेलेल्या माणसांकडूनही. अशा सगळ्याच माणसांना मनापासून धन्यवाद. तुम्ही दिलेल्या अनुभवांतूनच माझे विचार निर्माण झाले आणि लिखाणाची कृती होऊ शकली. आयुष्याबरोबरच त्या प्रवासातल्या ह्या नवीन वाटेवरही सोबत करणारा उत्पल आणि ब्लॉगसाठी इतकं योग्य आणि अर्थपूर्ण नाव सुचाविण्यापासून साथ दिलेला माझा भाऊ – सुनिश्चल, दवबिंदू च्या वाटचालीत कायम असेच माझ्याबरोबर असतील ह्याची मला खात्री आहे.

Advertisements

6 comments on “माझ्या ‘दवबिंदू’ची कहाणी

 1. Avinash
  September 22, 2015

  khupch chaan aahe he.

  Like

 2. Anonymous
  February 12, 2016

  PLEASE NEXT PART LAVKAR PATHVA I REQUEST YOU

  Like

  • rutusara
   February 13, 2016

   Sure…I will upload the next part shortly …

   Like

 3. Sarika devrukhkar
  December 2, 2016

  Ata Sagale part update kara ha full story mag Maja yeil

  Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: