davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 15)

आपण एकदा भेटून बोलूया का? कदाचित मला जे माहित आहे ते तुला माहित नसेल आणि तुझ्याकडे जी माहिती आहे ती मला मिळेल. ” सिद्धार्थ

हो, नक्कीच. मी आता ३४ दिवस मुंबईमध्ये आहे. तू माझा नंबर घेऊन ठेव. आपण ठरवू नंतर. ” ईशा

पण प्लीज सायलीला कळू देऊ नकोस आपण टच मध्ये आहोत ते. तिला संशय येईल.” सिद्धार्थ

तिला ऑलरेडी आलाय…” ईशा

काय ? तिला अजून कुठे माहितीये आपण भेटलोय ते? ” सिद्धार्थ

आपल्याबद्दल नाही….सुजयबद्दल. आम्ही दोघी मिळून हा शोध घेतोय….चल तू आता तुझ्या जागेवर जा. मला मिस्ड कॉल दे. आपण कधी आणि कसं भेटायचं ते ठरवू…..बाय….”

ईशा शांतपणे सायलीच्या डेस्कसमोरच्या खुर्चीत जाऊन बसली आणि सिद्धार्थ आश्चर्यचकित होऊन ईशाकडे बघत राहिला…….

——————– भाग १४ पासून पुढे चालू ——————

भाग १४ येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-mH

 

सुजय मोठ्या खुशीत सायलीच्या ऑफिसमधून निघाला होतासायलीशी जवळपास पंचवीसेक मिनिटं बोलला होता तो. पण त्याचं समाधानच झालं नव्हतं. सायलीला प्रत्यक्ष भेटून खरं तर पुन्हा एकदा रिस्क घेतली होती त्याने. पण यावेळी ते खरंच गरजेचंही होतं. काल रात्री सायली रागारागाने त्याला बरंच बोलली होती. नंतर थोडी शांत झाल्यासारखी वाटली ती. पण तरी त्याने तिला भेटून तिची समजूत काढणं गरजेचं होतं. पण प्रत्यक्ष भेटल्यावर ती आणखी काय, काय म्हणेल ही त्याच्या मनातली धाकधूक मात्र सायलीला भेटल्यावर पूर्ण नाहीशी झाली.

 

सायलीसुद्धा आज नेहेमीपेक्षा मोकळेपणाने बोलत होती. अर्थात लग्नाबाबत तिने काय निर्णय घेतलाय, हे ती बोलली नव्हती. आणि सुजयनेसुद्धा तिला मुद्दामहून काही विचारलं नव्हतं. त्याला लग्नाची घाई आहे, असं कुठेही सायलीला वाटून उपयोग नव्हता. त्याने तिला एकदोन दिवसात निर्णय घे, असं सांगितलं होतं, त्यामुळे ती कदाचित आणखी एक दिवस निर्णय घेण्यासाठी घेणार. पण तिच्या एकूण बोलण्यावरून ती लग्नाबद्दलचा विचार करतेय एवढं त्याला कळलं होतं. एकदोनवेळा तिच्या बोलण्यात लग्नानंतर आपण एकदा इथेजाऊ– ‘तिथेजाऊ असंही आलं. बोलण्याच्या ओघात. यु.एसला त्याला नक्की कुठे जायचंय आणि तिथे व्हेदर कसं असतं, इंडियन्स आहेत का, अशीही चौकशी केली तिने. काल फोनवर बोलताना तिला आलेला राग आज कुठेच जाणवत नव्हता आणि तिच्या बोलण्यातून ती ह्या सगळ्याबाबत ती खूप पॉझिटिव्हली विचार करतेय एवढं मात्र त्याला कळलं होतं. तिच्या वागण्यातून कुठेही तिला आपला संशय आलाय असंही वाटलं नव्हतं त्याला. आता फक्त वाट बघायची होती ती तिच्याकडून लवकर लग्न करण्यासाठी होकार यायची.

———————————

सायली सुजयला सोडायला रिसेप्शनपर्यंत गेली आणि मग पुन्हा ऑफिसमध्ये आत यायला निघाली. सुजयबद्दलचा राग आज तिने त्याच्याशी बोलताना काही काळापुरता बाजूला ठेवला होता. आता ती त्याच्या लवकर लग्न करण्याच्या प्रस्तावावर सिरीयसली विचार करतेय असं त्याला वाटायला हवं होतं, तरच तो बेसावध राहिला असता. त्याच्याशी बोलताना ती अगदी सहज, मोकळेपणाने बोलायचं नाटक करत होती खरं, पण खरं तर त्याच्याशी काय बोलायचं हे तो तिला भेटायला आल्याचं कळल्यावरच तिने ठरवायला सुरुवात केली होती. आपल्या बोलण्याच्या त्याच्यावर आपल्याला हवा तसा परिणाम झाला असेल का, हाच विचार करत ती तिच्या जागेवर परत आली …आणि समोर…तिला आश्चर्याचा धक्काच बसला…..समोरच्या खुर्चीवर ईशा बसली होती.

—————————————

ईशा अचानक समोर दिसल्यामुळे सायलीला आश्चर्य तर वाटलं होतंच पण त्याहीपेक्षा तिला धीर आला होता. ईशा तिची फक्त बहिण कधीच नव्हती त्याहीपेक्षा जास्त तिची अगदी जिवलग मैत्रीण होती. तिच्या मनातलं आणि तिच्यासाठी योग्य सगळ्यात आधी ओळखून तिच्यासाठी धावत येणारी. ११ वाजेपर्यंत ईशा ऑफिसमध्ये होती. पण नंतर सायलीला मिटिंग असल्यामुळे ती घरी जायला निघाली. सायली तीन साडेतीन पर्यंत ऑफिसमधून निघून जुहूला सुजयच्या बिल्डींगमध्ये जाणार होती. मग त्या दोघींचं तिकडेच भेटायचं ठरलं. संध्याकाळी साडेचार वाजता सुजयच्या बिल्डींगच्या गेटच्या बाहेर. ईशाने सायलीकडून तो पत्ता घेतला आणि ती निघाली. सायली तिला भेटली आणि लगेच १०१५ मिनिटात तिला मिटींगसाठी जावं लागलं, त्यामुळे त्या दोघींचं नीट बोलणं झालंच नव्हतं. फक्त काल रात्री सायलीने सुजयला चिडून फोन केला होता तिची समजूत काढायला आणि तिचा गैरसमज दूर करायला तो आला होता, एवढं तिला सायलीकडून कळलं होतं.

 

सायलीच्या घराजवळ जाणाऱ्या बसमध्ये ती बसली आणि ह्याच विचारात गढून गेली.

 

काल रात्री उशिरा सायलीकडून पुढच्या दोन आठवड्यात लग्न करण्याचा तिचा निर्णय कळला आणि ईशाला धक्काच बसला होता. पण आज मात्र तिला सायलीने उचललेलं हे पाऊल आपल्याला या कोड्याचं उत्तर कदाचित लवकर देऊ शकेल, असा विश्वास वाटायला लागला होता. एक गोष्ट तर नक्की होती. सुजयच्या भूमिकेतून विचार केला, तर लवकर लग्न केल्यामुळे सायलीला त्याच्याबद्दल संशय येण्याचे आणि खऱ्याखोट्याचा शोध घेण्याचे चान्सेस फारच कमी होते, त्याच्या दृष्टीने त्याचा ह्यात कोणता फायदा आहे, हे स्पष्टच दिसत होतं. मात्र आता सायलीच्या भूमिकेतून विचार केल्यावर ईशाला ह्या निर्णयामुळे सायलीचा होणारा फायदाही दिसत होता. सायलीच्या बाबतीत सुजय बेसावध राहणार होता आणि त्यामुळे हा शोध जास्त वेगाने आणि त्याच्या अगदी जवळ जाऊन, अगदी जवळच्या माणसांपर्यंत जाऊन घेता येणार होता. ह्या बाबतीत सिद्धार्थशी बोलायला सुद्धा हरकत नव्हती. त्याला सुद्धा सुजयचा संशय आलाय असं तो म्हणाला होता. पण सगळं नीट बोलायला वेळच मिळाला नव्हता. लवकरात लवकर, अगदी उद्याच त्याला भेटायला हवं होतं. यु हॅव अ लॉट टू डू, ईशा….असं म्हणेपर्यंत मावशीच्या घराजवळचा बसस्टॉप आलाच आणि ईशा बसमधून उतरून घराच्या दिशेने चालायला लागली.

———————————————-

ठरल्याप्रमाणे सायली सुजयच्या बिल्डींगच्या एन्ट्रन्सपाशी आली. घड्याळात सव्वाचार होत होते. मागच्या वेळी ती मोलकरीण साधारण पाच सव्वापाच च्या सुमाराला भेटली होती. आजही त्याच वेळेला भेटण्याची शक्यता होती. पण अगदी वेळेवर जाण्यापेक्षा थोडं आधी गेलेलंच चांगलं, म्हणून ती जरा लवकरच आली होती आणि आता ईशाची वाट बघत होती. पुढच्या पाच मिनिटात ईशासुद्धा आली.

ईशा, आपण आता लगेच आत जाऊया की थोड्या वेळाने जाऊया? ” सायली

 

एक मिनिट, मला सांग, तुझा नक्की काय प्लान आहे? आता आत जाऊन त्या मोलकरणीला शोधायचं आणि मग तिच्याशी बोलायचं का? ” ईशा

 

हो, तसंच काहीतरी…..आपण वॉचमन ला किंवा बिल्डींग मधल्या लोकांना डायरेक्टली फोटो दाखवून विचारू शकतो, हेच साने आहेत का, किंवा हे इथे राहतात का, असं. पण कुणाकडूनही हे सुजयपर्यंत जाऊ शकतं. म्हणून त्या मोलकरणीला पण डायरेक्टली विचारणं उपयोगाचं नाही. ” सायली

 

“पण म्हणजे सुजयच्या घराच्या बाहेर ती भेटली होती, तिकडे जायचं?” ईशा

 

हो. त्यांच्या बाजूच्यांच्या घरातून ती बाहेर पडली होती मागच्या वेळेला, म्हणजे त्यांच्याकडे कामाला असणार ना तीआणि पाच सव्वापाचच्या सुमाराला भेटली होती म्हणजे आजही त्यांच्याकडे पाचच्या सुमाराला ती काम करत असणार….” सायली

 

आणि त्या वेळेला ती नेमकी तिकडे नसेल तर?” ईशा

 

तर…….माहित नाही….” सायली

 

अगं, म्हणजे जनरली ह्या कामवाल्या बायका एका बिल्डींग मध्ये तीनचार तरी कामं करतात. नेमकी आज ती ह्या वेळेला दुसऱ्या कुठल्यातरी घरी काम करत असेल तर? आपण सुजयच्या घराच्या बाहेर तिची वाट बघू आणि ती दुसरीकडेच असेल किंवा निघूनही जाईल आणि आपल्याला कळणारही नाही. आणि तसंही सुजयच्या घराबाहेर थांबणं रिस्की आहे. नेमकं त्यांच्या घरातल्या कुणी बघितलं तर आपण काय सांगणार?” ईशा

 

हो गं, वाटलं होतं तेवढं सोपं नाहीये हे. थांब जरा विचार करूया. ” सायली

 

एक गोष्ट चांगली आहे त्यातल्या त्यात….आपण दोघींनी पंजाबी ड्रेस घातलाय. ओढणीने तोंड झाकता येईल वाटलं तर…” ईशा

 

मी मुद्दामच घातला आज पंजाबी ड्रेस. एरव्ही ऑफिसला मी बरेचवेळा वेस्टर्न फॉर्मल्स घालते पण आज मी हाच विचार करून पंजाबी ड्रेस घातला. सुजयच्या घराच्या बाहेर असं तोंड न लपवता उभं राहणं रिस्की आहे, म्हणून मुद्दाम ओढणीवाला ड्रेस…..” सायली

 

आणि निघतानिघता चहाचा कप हातात देताना आमच्या ग्रेट मावशीने आमच्या केप्रीजवर चहा सांडवला आणि आम्हाला पंजाबी ड्रेस घालून यावं लागलं…..मावशी तुस्सी ग्रेट हो….” ईशा

सायली तिच्याच विचारात होती.

इशी, होतं ते चांगल्यासाठीच होतं नाचल आपण आता आत जाऊ.”

 

अगं पण काय करायचं आत जाऊन ? आणि हे बघ सायली, सगळ्या शक्यतांचा विचार करून, त्याच्यावर उपाय शोधून ठेवून आत जायचं. आपण आधी नीट ठरवू. हे बघ, :२५ झालेत. इथे समोर ज्यूस सेंटर आहे. तिथे जाऊन १५ मिनिटं बसून सगळं नीट ठरवू आणि मग आत जाऊ. आपल्याला आधीच वेळ कमी आहे आणि आज तिला भेटून जायचंच आपण. पुन्हा पुन्हा इथे यायला आपल्याला वेळ नाहीये. ” ईशा

 

ठीक आहे..चल

दोघी मागे वळून मागच्या ज्यूस सेंटर कडे चालायला लागल्या.

————————————-

बरोब्बर पंचवीस मिनिटांनंतर दोन तरुणींनी सुजय राहत असलेल्या त्या अलिशान कॉम्प्लेक्स मध्ये प्रवेश केला. त्यांनी चेहरा झाकलेला नव्हता मात्र दर मिनिटाला सावधगिरी म्हणून कुणी ओळखीचं दिसत नाहीये ना, हे त्या मागे वळून बघत होत्या. आधीच्या २ बिल्डिंग्ज मागे टाकून त्या दोघी सुजय राहत असलेल्या ब्लॉसम ह्या बिल्डींगपाशी आल्या. आत जाणाऱ्या प्रत्येकाने स्वतःचं नाव, पत्ता, फोन नंबर आणि कुणाला भेटायचंय ते लिहून मगच आत एन्ट्री करायची होती. त्यातल्या एकीने स्वतःचं नाव लिहिलं ईशा. पत्ता पुणे. आत जाण्याची वेळpm . एवढंच. तिथला वॉचमन फोनवर बोलण्यात गुंग होता. काहीतरी लिहिलंय एवढंच बघून त्याने दोघींना आत जाण्याची खूण केली.

———————————————-

लिफ्ट दहाव्या मजल्यावर येउन थांबली आणि त्यातून ईशा आणि सायली बाहेर आल्या. सायलीने चेहरा ओढणीने झाकला होता. मुली स्कूटीवर बसताना झाकतात, तसा. न जाणो, एकदम सुजयच्या घरातून कोणी बाहेर आलं तर प्रॉब्लेम नको व्हायला. ईशाला मात्र सगळ्यांनी फक्त एकदा, साखरपुड्यात बघितलं होतं. त्यामुळे ती ही रिस्क घेऊ शकत होती. पण तिनेही डोक्यावरून पदर घेतल्यासारखी ओढणी घेतली होती. सुजयच्या घराच्या बंद दाराकडे एकवार नजर टाकत त्या दोघी पुढे आल्या आणि ईशाने समोरच्या घराची बेल वाजवली. सायली थोडी मागेच थांबली होती.

 

दोन वेळा बेल वाजवूनही कुणी दार उघडेना, तसं दोघीही निराश व्हायला लागल्या. आता काय करायचं, अशा प्रश्नार्थक नजरेने एकमेकींकडे बघत असतानाच आतून कुणाचातरी आवाज आला….

“कौन है? जरा रुको हा….आती हु….”

आवाज म्हाताऱ्या बाईचा होता, असं वाटलं.

पुढच्या मिनिटाला दार उघडलं गेलं. एक म्हातारी बाई तिचा वॉकर घेवून दार उघडायला आली होती. तिने नेसलेल्या पांढऱ्या साडीवरून आणि त्या साडी नेसण्याच्या पद्धतीवरून ती नक्कीच सिंधी बाई असावी. वॉकर घेऊन चालत आल्यामुळे तिला दम लागल्यासारखा वाटत होता. त्यात समोर दोन अनोळखी मुली बघितल्यावर तिचा चेहराही जरा त्रासिक झाला. ह्या मुली ओळखीच्या वाटत नव्हत्या. त्यातल्या एकीने तर चेहरा जवळपास झाकलेलाच होता आणि दुसरीने डोक्यावरून ओढणी घेतली होती. एका हाताने वॉकर पकडत दुसऱ्या हाताने डोळ्यांवरचा चष्मा नीट करत त्या मुलींना न्याहाळत तिने विचारले,

कौन चाहिये? कुछ बिकना है, तो अभी वापस जावो……”

 

नही नही दादीजी, वो हम लोग…..मतलब वो आप के यहा वो काम करती है….उसको मिलने आये हैसिर्फ दो मिनट का काम थावो वॉचमनने कहा की अभी आपके घर होगी तो..” ईशा

 

“वो हम लोग गाव से आये है, और यहापर कुछ काम करना है. वो हमे काम दिलवानेवाली है, इसीलिये …..”

सायली थोडी पुढे येत म्हणाली. पण म्हातारी आधीच कंटाळली होती. सायलीला मधेच तोडत ती म्हणाली,

अरे पुष्पा अब तक आई नही है, मुझे लगा था वोही रहेगी….साडेचार बजे आती है रोज..आज पता नही क्या हुवा, कल आजाना….”

आणखीनच त्रासिक होत दरवाजा बंद करण्याच्या हेतूने म्हातारी वॉकर घेऊन दोन पावलं मागे सरकली.

 

दार हळूहळू बंद होताना ईशा आणि सायली हतबल होऊन नुसत्याच समोर बघत राहिल्या. हातातून वेळ निसटून चालली होती. आज ती पुष्पा भेटणार नव्हतीच तर…..आता पुढे काय? त्या दोघी एकमेकींकडे बघत असतानाच बंद होत चाललेल्या दारामागून काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आला आणि पाठोपाठ त्या म्हातारीच्या विव्हळण्याचा आवाज

ईशा त्या आजी पडल्या वाटतं….चल पटकन…”

दार ढकलून दोघी आत गेल्या. वॉकर मागे घेता घेता त्या आजीचा पाय मध्ये आला होता आणि अडखळून त्या खाली पडल्या होत्या.

आज्जीदादीजीकैसे गिर गयी आप? ठीक तो है….उठीये..हम मदद करते है…” सायली

दोघींनी मिळून आज्जींना उठवलं आणि समोरच्या सोफ्यावर नेऊन बसवलं. त्यांना धाप लागली होती. ईशाने त्यांना पाणी आणून दिलं. पाच मिनिटांनंतर आजी बोलण्याच्या परिस्थितीत आल्या. तोपर्यंत सायली आणि ईशा चिंताग्रस्त चेहऱ्याने त्यांच्यासमोर उभ्या होत्या. आज्जीच्या पडण्याला एका अर्थी त्या दोघीच जबाबदार होत्या. त्यांना दार उघडण्यासाठीच आजी आल्या आणि पडल्या.

दादीजी आप ठीक तो है? हमहम डॉक्टर को फोन करे क्या? आपके पास नंबर तो होगा ना? ” ईशा

आज्जी हाताने खूण करत म्हणाल्या,

अब ठीक हू….तुम लोग थे इसलिये अकेली होती और गिर जाती तो पता नही क्या होता…..”

 

नही दादीजी, वोह तो हम लोग की वजह से आप उठके आई ना….सॉरी….” सायली

 

दादीजी और कौन रहता है आपके साथ? किसीको फोन करके बुलाये क्या?” ईशा

तिच्या प्रश्नावर आजी खिन्नपणे हसल्या.

वैसे तो बहोत लोग रह सकते है यहा मेरे साथ, लेकिन किसीको रहना नही है.तुम टेन्शन मत लेनातुम लोग की जगह कोई और आतातो भी गिरती ना मै….इसीलिये वोह पुष्पा को रखा है, सुबह से शाम तक आती है, फिर रात को उसकी बहन आती हैमेरे साथ रहने के लिये….अपने लोग होते हुए भी ऐसे रहना पड रहा है….”

आजीच्या डोळ्यातून पाणी आलं.

सायली आणि ईशाला आता काय बोलावं, काय करावं काहीच सुचत नव्हतं. त्या आल्या होत्या कशासाठी, आणि हे काय झालं होतं…..

दादीजी, आप सुनिये हमारी बात….हम डॉक्टरको बुलाते हैवो चेक….”

सायलीला मधेच तोडत आजी म्हणाली,

जरुरत नही है बेटा. मै बता रही हू नातुम लोग अब जावो. पुष्पा अगर आई तो बोल दुंगी उसे. क्या नाम है तुम दोनोका? …”

आजीच्या प्रश्नांवर ईशा आणि सायली चपापल्या. नाव काय सांगायचं ते त्यांनी ठरवलंच नव्हतं. आणि तसंही त्या आजीला तिथे तसं एकटीलाच सोडून यायला पण त्यांना जीवावर आलं होतं. आत्ता पाच मिनिटांपूर्वी त्या तोल जाऊन अडखळून पडल्या होत्या, स्वतःच्या एकटेपणामुळे थोड्या हळव्या झाल्या होत्या. आपण इथून गेल्यावर काही मेडिकल इमर्जन्सी आली तर त्यांना कोण मदत करणार, असं त्या दोघींनाही वाटत होतं. समोर सुजयच्या घरी जाण्यात त्यांनाच धोका होता. ह्या दोन घरांच्या मध्ये असलेला एक फ्लॅट तर बरेच दिवसांपासून बंद असल्यासारखा दिसत होता. पण आजींना असं एकटीला सोडून सायलीईशाला तिथून येणं जमणारच नव्हतं. निदान ती पुष्पा येईपर्यंत तरी तिथे त्यांच्याबरोबर थांबायला हवं होतं.

दादीजी, हम थोडी देर रुकते है आपके साथ. यहा कोई नही है और. आपको कुछ मदद लग गयी तो? ऐसे आपको छोडके नही जा सकते हम, आप हमारी दादी की जैसी है…..” सायली

 

दादीजी वो पुष्पा कब तक आती है?”

ईशाने हळूच विषय काढला. त्या दोघी ज्या कामासाठी इथे आल्या होत्या, ते विसरून चालणारच नव्हतं.

“अरे पुष्पा भी अभी एक महिनेसे आने लगी यहापर…….वो तो सुबहसे ही आती है. फिर मेरा खाना हो जानेके बाद वो दो घंटे के लिये घर जाती है, उसकी बुढी सास हैमेरे जैसीउनको खाना देके, फिरसे यहा आती है चारसाडेचार बजेतक….कुछ सब्जी, दूध लेके आना है, तो वो भी ले आती है आते आते….फिर छेसाडेछे तक रुकती है….लेकिन अभी साडेपाच बज गये अभी तक आई नहीपता नही कहा रह गयी….”

शेवटचे वाक्य आजी स्वतःशीच बोलल्यासारखी बोलली.

त्या दिवशीचं त्या मोलकरणीचं बोलणं सायलीला आठवलं,

**********

“सान्यांकडे आला होतं व्हय? पर या टायमाला सुजय दादा तर घरात नसतात ना….थोडं थांबावं लागनार तुम्हास्नी.”

बोलत बोलतच ती लिफ्ट मध्ये शिरली.

    “अहो नाही, बाकीचे सगळे असतीलच ना घरात. ” सायलीची आई .

    “बाकी कुनी नसतं तिथे…..” लिफ्ट चा दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट खालच्या मजल्यावर गेली.

*************

तिच्या बोलण्याचा अर्थ आत्ता सायलीला कळत होता. ती पुष्पा महिन्याभरापूर्वीच इथे कामाला लागली होती, असं आजी म्हणाली. आणि आशयने दिलेल्या माहितीनुसार जर न्यू – जर्सीला गेलेली साने मंडळी म्हणजेच सुजयचे आई-बाबा असतील तर ते सुद्धा एक महिन्यापूर्वीच अमेरिकेला गेले होते. म्हणजे कदाचित ते गेल्यावर पुष्पाने इथे काम सुरु केलं असणार. ती सुद्धा आजीकडे नव्यानेच यायला लागली असणार. म्हणून शेजारी सुजयदादा राहतात, संध्याकाळी घरी येतात एवढंच तिला तेव्हा माहिती होतं. आणि म्हणूनच इथे बाकी कुणी नसतं असं ती म्हणाली तेव्हा. म्हणजे साने आई-बाबा सध्या इथे नाहीयेत हे जवळपास नक्की होतं. फक्त आता आज्जीकडूनच ही माहिती काढून घेऊन खात्री करून घ्यायला हवी होती.

दादीजी, मै जाके देख के आती हू. सामनेवाले घर मे जाके उनको बोलती हू पुष्पाके आने तक आपका खयाल रखनेको” सायली

 

अरे बेटा, इस वक्त यहा और कोई नही मिलेगा. हमारी पडोसका घर तो एक साल से बंद ही है. और वो सामनेवाले घर मै साने फैमिली रहती है, बडे अच्छे लोग हे….लेकिन अभी वो भी नही है…” आजी

साने फॅमिलीचं नाव ऐकून सायली आणि ईशाचे श्वास जलद पडायला लागले.

क्यो? वो भी चले गये क्या यहासे?”

सायलीने खूप धीर करून असं थेट विचारलं होतं. ह्या दोघी काहीतरी चौकशी करतायत, असं त्या आज्जीला वाटू शकलं असतं. पण दुसरा काहीच पर्याय नव्हता.

तेवढ्यात फोनची रिंग वाजली.

या फोनला पण आत्ताच वाजायचं होतं का? ईशाने सायलीकडे बघितलं. सायलीच्या मनातही तेच आलं असावं. पण तेवढ्यात आज्जी फोन घ्यायला म्हणून उठली आणि सायलीने तिला धरून पुन्हा बसवलं.

दादीजी, हम उठाते है फोन….आप बैठो….”

तेवढ्यात ईशाने फोन उचलला.

दादीजी, कोई नीलिमा है…..”

 

नीलिमा?” आजीच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहायला लागला. “अरे वोही….मैं बोल रही थी ना अभी, साने लोग बहोत अच्छे है…..उसीका फोन हैवहा से….अमरिकासे…..”

आजी फोनवर बोलायला लागली पण तिचं शेवटचं वाक्य ऐकून सायली आणि ईशा जागच्या जागी खिळून राहिल्या…..एकदम सायलीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडलाती ईशाच्या बाजूला जाऊन कुजबुजली…..

ईशा, सुजयच्या आईचं नाव नीलिमा आहे…..”

ईशाने चमकून सायलीकडे बघितलं.

आणि आजी म्हणाली की तिने अमेरिकेतून फोन केलाय……सायले, आपली शंका खरी ठरणार बहुतेक….आणि त्या पुष्पाच्या ऐवजी ही आजीच हेल्प करेल आपल्याला…..” ईशा कुजबुजली.

 

“फोनवर नंबर आला होता का?” सायली

 

“हो . यु.एसचाच नंबर होता तो. आशयचा तिकडून फोन येतो, तेव्हा असाच नंबर येतो स्क्रीनवर. +१ ने सुरु होतो. ” ईशा

पाच मिनिटांनंतर आजीचा फोन झाला त्यानंतर ती बरीच आनंदी, फ्रेश दिसायला लागली. हे मध्ये सगळे आलेले एकटेपणाचे विचार कुठल्याकुठे पळून गेल्यासारखे वाटले. इतका वेळ पाय धरून बसलेली ती आजी फोन जागेवर ठेवायला म्हणून लगेच वॉकर घेऊन उठलीसुद्धा. ईशाने हळूच धीर करून विचारले,

क्या बात है दादीजी, आप तो एकदम ठीक हो गयी फोन आने के बाद . आपकी बेटी का फोन था क्या ?”

 

वैसे मेरी बेटी तो नही है वो, लेकिन बेटीसे भी ज्यादा करती है मेरा. मैं बता रही थी ना, यहा सामने वो साने लोग रहते है, वो दोनो और उनका बेटा यहा रहता है, बेटी बाहर होती है पढाई के लिये. बडे अच्छे लोग है. किसी दोस्त के यहा गये है अमरिका मे. एक महिना हो गया उनको जाके, लेकिन नीलिमा रोज सुबह उठ्नेके बाद पेहेले मुझे फोन करती है. अभी वहा सुबह ७ बज गये. रोज ये वक्त पे फोन आता है उसका….मेरा हालहवाल पुछने….”

आजी उत्साहाच्या भरात बरंच काही बोलत होती. तिला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावरून लपत नव्हता.

तो वो वापस कब आयेंगे? ” सायली

 

और एकदेढ महिना लगेगा….” आजी

 

दादीजी, आप एक काम किजिये, उनके बेटे का नंबर होगा ना, वो दे दिजीये. हम उनको फोन करके बोल देते है, की आप गिर गयी थी, तो अगर जरुरत लगे तो डॉक्टर को बुलालेंगे वो…तो हम लोग भी बीना चिंता किये घर जा सकते है…..” ईशा

 

अरे तुमको ऐसे ही रुकना पड रहा है ना, तुम लोग अब जावो. अब मैं बिलकुल ठीक हू. और वो सुजयको फोन करनेकी तो और भी जरुरत नही है. वैसे भी वो तो काम मे ही लगा रहता हैउसको फोन किया तो परेशान होकर भागता चला आयेगा….”

 

उनकी बिवी को फोन करेंगे नही तो….”ईशाने आणखी एक प्रश्न टाकला.

बिवी? शादी के लिये क्या, लडकी देखने केलीये भी वक्त नही है उसके पास. उसकी मा तो उसे बोलके गयी है, वो लोग आने के बाद अब उसकेलीये लडकी देखना शुरू करेंगे…..”

 

ठीक है दादीजी, तो आप अब बिलकुल ठीक है ना? तो हम निकले क्या? “

सायलीला आता आणखी काही प्रश्न त्या आजीला विचारणं धोक्याचं वाटत होतं. काही झालं तरी सान्यांचे, म्हणजे निदान रमेश आणि नीलिमा साने ह्यांचे आणि त्या आज्जींचे संबंध फारच चांगले असावेत असं दिसत होतं. चुकून आजीकडून कुणीतरी दोन मुली त्यांची चौकशी करत होत्या, असं सुजयपर्यंत पोहोचलं असतं, तर कदाचित तो सावध झाला असता.

ठीक है बेटा, तुम दोनो एकदम वक्तपे आई. मेरी मदद करनेके लीये शुक्रिया.”

आजी जागेवरून उठायला लागल्या तसं सायलीने त्यांना हाताला धरून पुन्हा खाली बसवलं.

हम दरवाजा बंद कर लेंगे दादीजी. आप तकलीफ मत उठाना. हम लोग नीचे वॉचमन को बताके जायेंगे. कुछ मदद लगी तो नीचे फोन कर देना आप. “

दार लावून घ्यायच्या आधी ईशा पुन्हा एकदा आत वळली. पर्समधला मोबाईल काढून त्यावर काढलेला सायलीच्या साखरपुड्यातला साने पती-पत्नींचा फोटो ओपन करून तिने आजीच्या समोर धरला. एका गावातून आलेल्या मुलीकडे एवढा महागडा फोन कसा, ह्याबद्दल आजीला शंका येऊ शकली असती. पण ईशाला आता पक्की खात्री करून घेतल्याशिवाय तिथून परत जायचंच नव्हतं. सुदैवाने, आजीला असं काही वाटल्याचं दिसलं नाही.

“दादिजी, पुष्पा के साथ इनको भी मिलना था हमे, ये यहा कहा रहते है, आप जानती है ?”

आजीने तिचा चष्मा वरखाली करत तो फोटो पहिला.

“इनको तो कभी नही देखा यहापे….”

———————————

आजीचा निरोप घेऊन त्या दोघींनी दरवाजा लावून घेतला. सायलीने आधी हुश्श करत ओढणी तोंडावरून बाजूला केली. ईशाने आधी तिच्या पर्समधून पाण्याची बाटली काढली आणि तोंडाला लावली.

सायलीने पुढे जाऊन लिफ्टचं बटन दाबलं.

“सायले, हे सगळं वाटलं होतं, त्यापेक्षा जास्त चीड आणणारं आहे यार…त्यांनी सरळ सरळ खोटं सांगितलंय आपल्याला. सगळं नीट प्लॅन करून केलंय असंच दिसतंय..”

 

“हम्म ….मला पण तेच कळत नाहीये. बाजूच्या आजीबद्दल एवढी माया आहे त्यांना, म्हणजे त्याचे आई-वडील वाईट, व्यसनी, सुनेचा छळ करणारे असे तर नक्कीच नसणार. एवढे सगळे लोक त्यांच्याबद्दल चांगलं बोलतायत. मग असं असताना सुजयने त्यांच्या ऐवजी ते दुसरेच स्वतःचे आई-वडील असल्याचं का सांगितलं असेल?” सायली

 

“कदाचित त्यांचं आणि सुजयचं पटत नसेल आणि सुजयला ते नसताना स्वतःचं लग्न स्वतः जमवायचं असेल. पण मुलीकडचे आई-वडिलांबद्दल विचारणारच ना, म्हणून त्याने हे खोटे आई -वडील उभे केले असतील. “

ईशा बोलत असताना सायली तिच्याकडे बघत होती. ईशा स्वतःच ती जे बोलत होती त्याच्याशी कन्व्हिन्स्ड नव्हती.
सायली मान हलवत म्हणाली,

“नाही यार ईशा, सगळ्या लोकांनी सांगितलंय, साने कुटुंब फार चांगलं आहे, त्यांचे एकमेकांशी संबंध चांगले आहेत वगैरे. आय डोन्ट थिंक, तू म्हणतेयस असं काही असेल. पण काहीतरी सॉलिड गडबड आहे, एवढं नक्की . आपण आत्ता चेक करुया का की त्यांच्या घरी कोणी आहे का ते…?” सायली

 

“कशाला? सुजय आत असला तर? नको, उगीच रिस्क घायला….” ईशा

 

“मला वाटत नाही तो असेल, तो एरव्ही पण रात्री उशिराच घरी येतो. ती आजीपण म्हणाली ना तसं.”

बोलता-बोलता सायलीने बेल वाजवली देखील. एक मिनिट श्वास रोखून त्या दोघी दाराकडे बघत होत्या. दार उघडलं गेलं नाही.

“म्हणजे जेव्हा आम्हाला घरी यायचं निमंत्रण देतात, तेव्हाच ते खोटे आई-बाबा इथे येतात. म्हणूनच मागच्यावेळी मी आधी न कळवता आले, तेव्हा ते इकडे नव्हते. आणि म्हणूनच तेव्हा घर पण नीट आवरलेलं नव्हतं.” सायली नीट आठवत म्हणाली.

 

“बरं, आपण बोलू ते नंतर. लिफ्ट येईल आता. तू ओढणी घे तोंडावरून….”

सायली ओढणीने तोंड झाकत होती, तेवढ्यात लिफ्ट आलीच. लिफ्टचं दार उघडलं आणि समोरच्या व्यक्तीला पाहून सायली आणि ईशा जागच्याजागी खिळून राहिल्या.

समोर सुजय होता.

क्रमशः

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on April 16, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: