davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 17)

ईशा बोलताबोलताच आत आली सुद्धा. पॅस्सेजमध्ये पूर्ण अंधारच होता. तिथेच ती क्षणभर थबकली. “सायली ठीक असेल ना?” हा विचार तिला पोखरून टाकत होता. तिने आधी पॅस्सेजमधला दिवा लावला. आणि मग ती सायलीच्या खोलीपाशी आली. दार उघडणार तेवढ्यात आतून आवाज ऐकू आला, सायलीचा.

ईशा तू काय बोलतेयस? काय अर्थ आहे? मला काहीच कळत नाहीये…..तू अजून रागावली आहेस का? ईशा, ए ईशा?”

बाहेर उभी असलेली ईशा हे ऐकून भीतीने जागीच खिळून राहिली.

सायली झोपेत बडबड करतेय, की खरंच समोर कुणी आहे तिच्या? ती ईशाअसं का म्हणाली आत्ता?”

मनात असे विचार येत असतानाच तिने दार उघडलं सुद्धा. आत खोली खूप विचित्रपणे थंड झालेली होती.

म्हणजे काय ईशा? असं काय बोलतेयस तू?”

सायलीचा आवाज त्या अंधारात आणि त्या शांततेत खूप भयाण वाटत होता.

ईशाने आत येउन लाईट लावले. सगळ्या खोलीभर नजर फिरवली. सायली कुठेच दिसत नव्हती. मग तिचा आवाज कुठून येत होता? आणि ती नक्की कुणाशी बोलत होती?

<<<<<<भाग १६ पासून पुढे चालू <<<<<<<

भाग १६ येथे वाचा<<– http://wp.me/p6JiYc-qK

 

लाईट्स लावल्यावर खोलीतल्या वातावरणात अचानक काहीतरी बदल झाल्यासारखा वाटला. किंवा काहीतरी आधी बदललं होतं, ते पूर्ववत होतंय असं वाटलं. पण सायली होती कुठे? तिचा आवाजही पुन्हा आला नाही. ईशाला खरं तर आत जायचं तितकंसं धाडस होत नव्हतं. एरव्ही ती आल्या पावली मागेच वळली असती. पण ती सायलीसाठी आलेली होती. दोन पावलं आणखी आत येउन तिने धीर करून सायलीला हाक मारली.

सायली ….”

पण काहीच उत्तर नव्हतं. ईशाने पुन्हा हाक मारली.

सायलीकुठे आहेस?”

खोलीतली शांतता आता आणखीनच भयाण वाटत होती. ईशाने आता आणखी नीट नजर फिरवली सगळीकडे. सायलीच्या कॉम्प्यूटर टेबलच्या खाली, बेडखाली, कपाटामागे….सायली कुठेच नव्हती. आता एकच जागा बघायला हवी होती…. कपाटाच्या मागे बाहेरच्या व्हरांड्याचं दार होतं. ते दार बाहेर व्हरांड्यात उघडत असलं तरी बरीच वर्षं ते उघडलेलंच नव्हतं. ते मोठं कुलूप लावून बंद केलेलं होतं आणि त्याच्यासमोर कपाट ठेवलेलं होतं. तिथे व्हरांडा आहे हे एरव्ही कोणाला कळलंही नसतं. पण हे घर ईशाच्या चांगलंच ओळखीचं होतं. लहानपणी सुट्टीत ती आणि निशा मावशीकडे राहायला यायच्या तेव्हा ते व्हरांड्याचं दार तिथे बाहेर खेळण्यासाठी उघडलं जायचं. त्यानंतर मात्र आजूबाजूच्या एरियामध्ये काही चोरीघरफोडीचे प्रकार घडले आणि मग सायलीच्या बाबांनी ते दार कुलूप लावून बंदच केलं आणि त्याच्यापुढे सायलीचं कपाट सरकवून दिलं. काही वर्षांनी सायलीसाठी त्या खोलीत वॉर्डरोब आणि बुकशेल्फ आलं. पण तरीही ते कपाट होतं तसं आणि होतं तिथेच राहिलं. व्हरांड्याच्या दरवाजापुढे.

 

कपाटाच्या दिशेने जात असताना आपल्याच हृदयाचे जलद पडणारे ठोके ईशाला ऐकू येत होते. सायली खरंच बाहेर असेल? पण तिने एवढं मोठं कपाट कसं सरकवलं असेल? आणि तसं तर ते कपाट सरकवल्यासारखं तर दिसत नव्हतं.

 

काय करावं? अनिकेतला बोलवायचं का?

 

पण अनिकेत आला आणि त्याला काही शंका आली तर त्याला सगळं सांगावं लागेल. जाऊदेत, इथे जीवावर बेतायची वेळ आली तर त्याला सांगावं लागेलच ना. आणि तो हेल्पच करेल आपल्याला. आत्ता लगेच बोलवावं त्याला. सायलीला शोधायला कोणाचीतरी मदत लागणारच. ईशाला खरं तर आता त्या खोलीत एकटी राहणं असह्य झालं होतं. त्यामुळे तिचं मन असं उलटसुलट विचार करायला लागलं. कपाटाजवळ उभी राहून ती हाच विचार करत होती. अखेर तिचा विचार झाला आणि अनिकेतला बोलवून आणायचं तिचं नक्की झालं. ती मागे वळली. आणि दचकून एक पाऊल मागे गेली.

 

समोर बेडवर सायली बसली होती. ती ईशाकडेच बघत होती. पण तिचे डोळे नुसतेच रोखलेले होते, त्यात काहीच भाव नव्हते. क्षणभर ईशाच्या काळजाचा ठोकाच चुकला.

 

पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं. सायलीला हाक मारायला जाणार तेवढ्यात सायलीचेच शब्द ऐकू आले,

काय बोलतेयस तू ईशा? मला कळत नाहीये अगं..”

ईशाच्या छातीत पुन्हा धडधडलं. सायली बोलताना तर तिचं नाव घेत होती, तिच्याकडे बघतही होती, पण ती खरंच तिच्याशी बोलत होती का? ईशा काहीच बोललेली नसतानाही तू बोलतेयस ते मला कळत नाहीये, असं ती का म्हणत होती? तिच्या बेडरूमचं दार उघडून आत येतानाही ईशाला असंच काहीतरी ऐकू आलं होतं. पण आता विचार करत बसून चालणार नव्हतं. ती सायलीच्या जवळ आली आणि तिच्या खांद्याला हात लावून तिला हाक मारली,

सायले, काय बोलतेयस तू? मी काही बोललेच नाही अगं….”

पण सायली शांतच होती. ईशाचं बोलणं तिला ऐकू गेलं होतं की नाही, कोणास ठावूक.

सायली, ए सायली …”

दोनतीन वेळा तिला हाका मारल्यावर सायलीने तिच्याकडे बघितलं.

तिचे डोळे आत्ता ओळखीचे वाटले ईशाला. आता त्या डोळ्यांत भाव होते. खरं तर खूप प्रश्न होते.

सायली पुन्हा तेच म्हणाली,

काय गं, तू काय म्हणतेयस ते काहीच कळत नाहीये मला….”

या वेळी मात्र ती ईशाशीच बोलत होती. तिचा आवाज, तिची नजर सगळंच अचानक अगदी नॉर्मल झालं होतं. ईशाने तिचे दोन्ही खांदे पकडून तिला गदागदा हलवलं.

सायले, अगं जागी हो तू. काय बोलतेयस? मी कुठे काही बोलले तुझ्याशी? अगं मी बाहेर होते ना एवढा वेळ? मी आणि अनिकेत मुव्ही बघत होतो, आठवतंय का?”

सायली आता पूर्ण भानावर आली. पण तरीही आपण बघितलेलं तेच सत्य होतं, असंच तिला वाटत होतं.

अगं, हो, मी कशी विसरेन ते? पण तू आत आलीस ना मध्ये, आणि मग गेलीच नाहीस. तूच विसरली आहेस तू इथेच होतीस ते. आणि किती विचित्र वागत होतीस माहितीये का? काय बोलत होतीस घोगऱ्या आणि भसाड्या आवाजात? मला ना, मधेच असंच वाटत होतं की ही तू नाहीच आहेस. पण मगअसं कसं होईल? तू नाही, तर कोण असणार ना? मला थंडी वाजायला लागली म्हणून मी तुला खिडकी बंद करायला सांगितली, आठवतंय का तुला? आणिआणि ना तू अंधारात असताना तुझे केस लांब आहेत असंच वाटत होतं मला. म्हणजे तुझे केस छोटे आहेत ना, पण मला असे लांबसडक दिसत होते. पण मग नंतर वाटायला लागलं की चार वर्षांपूर्वी असेच लांबसडक छान केस होते ना तुझे. आम्ही सगळे सांगत होतो कापू नकोस. पण तू कुठे ऐकलंस? मैत्रिणीबरोबर जाऊन हेअरकट करून आलीस आणि असे छोटे केस घेऊन आलीस. , पण मला ना, नंतर तुझे असेच केस आवडायला लागले. हेच खूप सूट करतात तुला. हा, तर मी काय सांगत होतेकी चार वर्षांपूर्वी तुझे असे लांबसडक केस होतेच ना…..”

ती आणखीही पुढे काहीतरी असंबद्ध बोलत राहिली असती. पण ईशाने तिला अडवलं. सायलीचा काय गोंधळ झालाय ते तिच्या आत्ता लक्षात येत होतं. नक्कीच, ‘तीआली होती आणि गाढ झोपेत असल्यामुळे किंवा इतर कोणत्यातरी गोष्टीच्या प्रभावाखाली असल्यामुळे सायलीला ती ईशाच वाटली होती. किंवा मग सायलीला नक्कीच काहीतरी स्वप्न पडलं होतं. नक्की, काय होतं ते पडताळून बघायला हवं होतं.

सायली, शांत हो जरा. तुझा जरा गोंधळ झालाय. मी सांगते तुला सगळं. हे बघ, माझे केस आत्ता लहान आहेत अगदी शोल्डर पर्यंत जेमतेम. चार वर्षांपूर्वी माझे केस लांब होते, म्हणून आत्ता तुला ते लांब दिसतील का? आत्ता मी तुझ्या समोर उभी राहिले, अंधारात काय किंवा उजेडात काय, तुला माझे केस, आत्ता आहेत तसेच म्हणजे छोटेच दिसायला हवेत ना? “

तिचा प्रत्येक शब्द सायलीला पटत होता. ती हळूहळू विचार करण्याच्या मनस्थितीत येत होती.

हो गं, पण मग मला असं का वाटलं? मला ना, ….मलामधेच प्रश्न पडत होता, की ईशा जरा विचित्र वागतेयकाहीतरी वेगळं वाटतंय….पण मग दुसऱ्या क्षणी वाटायचं की समोर आहे, हेच खरं आहे….”

 

तुला स्वप्न पडलं का?” ईशा

 

नाही गं, मी झोपेत होते खूप पण मला चांगलं आठवतंय. स्वप्न नव्हतं ते नक्कीच. मी नाही का, म्हटलं की मला थंडी वाजतेय तू खिडकी लावून घे, असं. तू लावलीस पण खिडकी जाऊन. असं काय करतेयस, तू आली होतीस ईशा खोलीत…” सायली

सायली खिडकी बद्दल बोलायला लागल्यावर ईशा उठून खिडकीच्या दिशेने गेली. खिडकी उघडी होती. पण ती खोलीत आली होती, तेव्हा ही खिडकी नक्की उघडी होती का? तिला नीट आठवत नव्हतं. कदाचित सायलीच्या टेन्शन मुळे तिने नीटसं बघितलंच नव्हतं खिडकीकडे.

ईशा? काय करतेयस तिकडे?” सायली

 

काही नाही. खिडकी बघत होते. आत्ता तर उघडी आहे खिडकी. ” ईशा

 

मग ए.सी जास्त असेल म्हणून थंड झालं होतं खोलीत. मी म्हटलं ना तुला खिडकी बंद कर किंवा ए.सी बंद करतुला आठवत नाहीये का ईशा?” सायली

 

तुला आठवत नाहीये सायली. आज आपण सुजयकडून परत येत होतो, तेव्हा बसमध्ये तूच म्हणालीस ना मला, की ए.सी.बंद पडलाय आणि सर्व्हिसिंगसाठी उद्या येणार आहेत. .सी. बंदच आहे सायली. आणि खिडकी पण उघडी आहे. आणि माझं म्हणशील तर मी आले होते इथे माझा मोबाईल घ्यायला आणि मग तुला विचारलं मुव्ही बघायला येतेस का. पण तू नाही म्हणालीस आणि मग मी तुझ्यावर रागावून बाहेर गेले निघून. त्याच्यानंतर माझा आणि आनिचा एक मुव्ही झाला पण बघून. तुला कळतंय का, काय गोंधळ झालाय तुझा तो? ”

ईशाला सायलीच्या ह्या अवस्थेत आणि एकूणच रात्रीच्या त्या भयाण अनुभवानंतर तीबद्दल बोलणंही नकोसं वाटत होतं.

सायलीने एक मिनिटभर विचार केला. तिला जे काही दिसलं होतं, ते पुन्हा आठवून बघितलं. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता.

हो ईशी, आत्ता लिंक लागतेय मला. म्हणजे तू इथे येउन गेल्यानंतर मला जी दिसत होती, ती तीहोती? हो, बरोबर, ईशा अगं आपण कसं विसरलो? आज सुजयला भेटले ना मी. आज तीयेणारच होती. मी इतकी दमले होते ना, की मी विसरूनच गेले. ….”

 

मला मधेच ते आठवलं म्हणून मी आत आले.” ईशा तिला मधेच तोडत म्हणाली. “आणि आत आले तर तू ईशा काय बोलतेयस तूअसं काहीतरी बोलत होतीस….सायलेते जाऊदेत आतातू नीट आठव सगळंकाय काय झालं इथे? ‘तीकाय म्हणत होती ते आठवते महत्वाचं असणार, एक काम करूमी कॉफी आणते तुझ्यासाठी. तोपर्यंत तू शांतपणे आठव काय काय झालं ते. ओके? मग बोलू…”

ईशा जायला उठली तशी सायलीने तिला हात धरून खाली बसवलं.

मला नकोय कॉफी. तू बस इथे. मला ना…..मला….काहीच आठवत नाहीये. “

 

काय? अगं पण आत्ता सांगत होतीस ना सगळंविचित्र वाटत होती, तिला खिडकी बंद करायला सांगितली वगैरे…” ईशा

 

अगं हो, पण ते तेवढंच….ती नंतर काय म्हणाली ते काहीच आठवत नाहीये. असं अंधुकसं काहीतरी डोळ्यासमोर येतंय, कसलातरी भसाडा, घाणेरडा आवाज कानावर पडत होता असं वाटतंय, पण असं नीटसं काहीच आठवत नाहीये. ओह गॉड, ईशा, काय आहे हे? मला मधेच भीती वाटते गं. असं वाटतं की आपण कशाला या असल्या विचित्र, गूढ गोष्टींच्या मागे लागतोय? आपलं आयुष्य खूप छान आहे अगं. आपण खूप सुरक्षित जगात वाढलोय. खूप, खूप चांगले संस्कार आहेत आपल्यावर. आपली माणसं आपल्यावर खूप प्रेम करतात. उद्या या असल्या गोष्टींच्या मागे लागलो आणि आपलं आयुष्यच बदलून जाईल असं काही घडलं तर? ”

 

भीती मला पण वाटतेच गं सायले. पण शांत बसून लॉजिकल विचार केला की आपला आत्ताचा स्टॅंड पटतो मला. आणि आपण आहोत ना बरोबर, काका परत आले की त्यांना पण तू सांगणार आहेसच. त्यांचा पण विचार घेऊ आपण. त्यांच्या परवानगीने पुढचं सगळं करू. पण कितीही भीती वाटली तरी आता मागे हटायचं नाही. कळलं ना? मी जेवढं तुला ओळखते, त्यावरून सांगते. हे आत्ता तू जे बोललीस ते मनापासून बोलली नाहीस ना? तुला ह्या सगळ्याचा शोध घ्यायचाच आहे, हो ना? एखादी गोष्ट अर्धवट सोडून देणारी मुलगी नाहीयेस तू….”

सायली ह्यावर मनापासून हसली.

किती चांगली ओळखतेस तू मला..हो ..खरं आहेमी आत्ता जे म्हटलं, ते खरं म्हणजे मला म्हणायचं नव्हतं. काहीच आठवत नाही म्हटल्यावर ते सगळं किती भयंकर आणि गूढ आहे ह्याची जाणीव झाली. आणि पटकन असं बोलून गेले मीएनीवेज , ते जाऊदेत ह्या सगळ्यावरून माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. हे बघ, माई आज्जी येतेय ना? तुला आठवतं? लहानपणी आपण चिपळूणला जायचो तेव्हा माई आजी कसल्या हॉरर स्टोरीज सांगायची, भुताच्या. आपल्याला ती म्हणाली होती आठवतंय, की मी माझ्या लहानपणी एकदा अंधारात भूत बघितलंय, असं. तिला ना ह्या सगळ्यातली थोडीतरी माहिती असणार. म्हणजे आपण गावात सगळीकडे फिरून कधी रात्रीचे उशिरा परत आलो, की ती काय म्हणायची आठवतंय? असं अनोळखी ठिकाणी रात्रीचं उशिरा फिरू नये. अंधारातल्या बऱ्याच सावल्या आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या असतात. आणि जरा गोंधळलेलं माणूस दिसलं की त्याचा ताबा घेतात ….असं काहीतरी. मग रात्री कितीतरी उशिरापर्यंत रामरक्षा आणि बाकी कुठली कुठली स्तोत्रं म्हणत बसायची. आपल्या कपाळावर देवाचा अंगारा वगैरे लावायची. ..”

 

हो ना, ” ईशा ते ऐकताना लहानपणीच्या आठवणीत रमून गेली होती. ” आपण अगदी लहान होतो, तेव्हा घाबरायचो ती अशी काही बोलली की. किंवा तिच्या भुताच्या वगैरे गोष्टी ऐकून. मग थोडं आणखी मोठं झाल्यावर तिच्या काळजी करण्याला हसायचो, असं काही नसतं वगैरे आपणच तिला सांगायचो. , पण बरोबर आहे तू म्हणतेस ते. तिला माहीत असलेलं सगळं कदाचित ऐकीव असेल, पण काहीतरी नक्कीच सांगू शकेल ती. पण आपण आपल्यासाठी विचारतोय ते मात्र सांगायचं नाही तिला. काय माहीत, आपल्या आयांना तिच्याकडून काहीतरी कळलं तर गडबड होईल. “

 

डन. बरं आता आपण जाऊया का मुव्ही बघायला? “

 

सायले? खरं बोलतेयस? “

 

मग काय? आता एवढ्यात झोप लागणार नाही तर म्हटलं मुव्ही बघूया. आणि मला आता जाग आल्यामुळे भूक पण लागलीये. फ्रीज मध्ये ब्रेड आणि चटणी आहे. सॅन्डवीच करूया का? “

 

यस….यसआय एम सो हॅपीचल जाऊया ….” ईशा


 

रात्रीच्या जवळपास साडेतीन वाजता त्या दोघी झोपण्यासाठी परत खोलीत आल्या.

सायली, आता झोपच येत नाहीये.” ईशा

 

हो, पण झोपायला तर हवंच. तुला काय शहाणे, तू खोटीनाटी कारणं देऊन रजा घेऊन आली आहेस बाई. मला जायचंय ना उद्या ऑफिसला…” सायली

 

तुझ्यासाठीच आले ना धावतजाऊदेतपण ना मला एक विचारायचंयतुला काय वाटतं, ‘तीका येत असेल? कशासाठी?” ईशा

 

माहीत नाही. पण खरंच, का येत असेल ह्याच्यावर कधीच नाही ना विचार केला आपण?”

 

तो करायला हवा ना….” ईशा

 

अगं पण ती कोण आहे, म्हणजे हे सगळं नक्की काय आहे, कुठून येते, कधी जाते, काहीच माहित नाही आपल्याला….ती का येते हे कोण आणि कसं सांगणार?” सायली

 

हम्मते आहेच….पण ते कळायला हवं…” ईशा

 

हे बघ, आपण असं धरूया की सुजयचा आणि तिचा काहीतरी संबंध आहे. ओके? मग ते चांगले संबंध असतील किंवा बिघडलेले, बरोबर? ती मला भेटायला येते, म्हणजे येत असावी कारण माझं आणि सुजयचं लग्न ठरलंय. जेव्हा जेव्हा आम्ही दोघे भेटतो, तेव्हा तेव्हा ती येते. जर त्यांचे संबंध चांगले असतील किंवा जर ती त्याची वेलविशर असेल तर कदाचित ती मला फक्त सुजयची होणारी बायको ह्या दृष्टीने बघायला येत असेल. यु नो, कौतुकाने वगैरे. पण जर त्यांचे संबंध चांगले नसतील किंवा …..”

 

अगं काय बोलतेयस तू सायले?” ईशा मधेच तिला तोडत म्हणाली. “त्यांचे संबंध वगैरे असं म्हणतेयस जसं दोन नॉर्मल माणसांबद्दल आपण बोलतो. इथे मुळात ती माणूस नाहीच आहे, भूत आहे, म्हणजे असणार. “

 

हो मान्य आहे. पण जर तीखरंच भूत असेल तर भूत होण्याआधी ती माणूसच असणार ना? त्यावेळी ती आणि सुजय कदाचित भेटले असतील. त्यांचा आधीचा काहीतरी संबंध असू शकतो ना? आणि सुजयच्या बाबतीत तर आपण गृहीत धरलंय ना की हे सगळं कदाचित त्याच्या भूतकाळाशी रिलेटेड असू शकतं, फेसबुक प्रोफाईल? आठवतंय ना? ” सायली

 

हम्म ते आहेच….शी यारआय रिअली कान्ट बिलिव्ह धिस….आपण खरंच भूतबित असं सगळं बोलतोय का? आपल्या रिअल आयुष्याबद्दल ? तिसरं कुणी असं काही बोललं असतं तर एक मिनिटासाठी तरी विश्वास ठेवला असता का त्याच्यावर आपण? आणि आपणच आत्ता असं सगळं बोलतोय….शी मला नाही पटत….” ईशा

 

बोलताना मला पण पटत नाहीमी स्वतःच कनव्हीन्स्ड नाहीये असल्या भूताबिताच्या बाबतीत. ..पण आत्ता आपल्याला असं गृहीत धरूनच पुढचा विचार करावा लागणार. तू मगाशी म्हणालीस ना, ‘तीका येत असावी? त्यावरून मी हा सगळा विचार करायला लागले. हे बघ, त्यांचे संबंध चांगले असतील तर ती नुसतीच मला बघायला वगैरे येत असावीपण जर त्यांच्यात काही प्रॉब्लेम्स असतील किंवा पूर्वी झालेले असतील, तर तिला कदाचित आमचं लग्न व्हायला नको असणार. म्हणून ती येत असेल इथे…” सायली

 

असं असेल तर तिच्यापासून धोका असू शकतो ना….तिने तुला काही केलं तर? ” ईशा

 

पण अजून काही केलं का नाही मग? तीनचार वेळा तरी आलीये तीमग काहीच का नाही केलं तिने? नक्कीच काहीतरी वेगळ्या हेतूने येतेय ती…..” सायली

 

कदाचित तिला आपल्याला काहीतरी सांगायचं असेल, सुजयपासून सावध करायचं असेल……”ईशा

 

असं असू शकेल कदाचित……पण काय सांगायचं असेल तिला?” सायली

 

आज काय काय झालं ते तुला आठवत नाहीये ना, ती काहीतरी बोलत होती असं म्हणालीस ना, पण काय म्हणाली ते कसं कळणार? ” ईशा

 

काहीच कळत नाहीये. जाऊदेत चल उद्या विचार करू सगळ्यावर. पण ईशा लवकर काहीतरी पुढचं पाऊल उचलायला हवं हा….बाबा उद्या परवा येतील आणि मग लग्नाबद्दल परत सगळं बोलणं सुरु होईल….पुढे काय करायचं ते लवकर ठरवायला हवं. उद्याच. ” सायली

 

हम्मतू ते काय काय पॉइण्ट्स लिहून ठेवलेत ना, ते बघू उद्या परतचल झोपूया….” ईशा

—————————

सायलीला स्वप्न पडत होतं बहुतेक. चेहऱ्यावर केस पुढे आलेला एक चेहरा. चेहरा नीट दिसत नव्हता पण पांढराफटक असावा. तिच्या अगदी जवळ आला होता. सायलीने कूस बदलली तरीही दुसऱ्याही बाजूला तो चेहरा होताच. हळूहळू तो चेहरा तिच्या अगदी जवळ आला. इतका जवळ की त्यातून ऐकू येणारे हुंकारासारखे आवाजही सायलीला नीट ऐकू येत होते. सुरुवातीचे शब्द म्हणजे नुसताच भसाड्या आणि घाणेरड्या आवाजाचा गोंधळ होता. पण हळूहळू त्यातले शब्द स्पष्ट होऊ लागले.

…...…...…...……”

सायलीला त्याचा अर्थच कळत नव्हता. पण धीर करून विचारावंसं वाटलं तरी तोंडातून एक शब्द फुटत नव्हता.

….………..….…..…”

दुसरा एक शब्द ऐकू आला. त्यापुढे ऐकू आली ती एक भयानक किंकाळी. तो आवाज इतका जीवघेणा होता की सायली तशीच तार स्वरात ओरडत बेडवर उठून बसली.

ईशा दचकून जागी झाली.

सायले, स्वप्न पडलं का? काय झालं?”

स्वप्नंच असावं…..पण काहीच अर्थ कळत नाही

का, काय झालं? काय स्वप्न पडलं तुला? ”

ईशाने बेडजवळचा टेबललॅंप लावला.

ईशी,,,,पटकन काहीतरी लिहायला आण जा….’तीआली होती स्वप्नात माझ्याआणि काहीतरी बोलली..लिहून ठेवूया…”

ईशा धावत जाऊन सायलीची डायरी आणि पेन घेऊन आली.

सायलीने एक क्षण डोळे मिटले……….तो घोगरा आवाज तिच्या कानात साठला होता. त्यातला एक एक शब्द नीट आठवून तिने डायरीमध्ये लिहून काढला

......….…”

 

..…...”

 

हे काय लिहिलयस? काहीच कळत नाहीये. ” ईशा

 

अगं पण ती हेच बोलत होतीमला आता आठवतंय. मगाशी ती आली होती तेव्हाही हेच बोलत होती. आणखीही काही बोलत होती ते मात्र माहित नाही मला. पण आत्ता स्वप्नात ती हे दोन शब्द नक्की बोलली. आणि हेच शब्द ती आधीही बोलली होती…” सायली

 

नक्की स्वप्न पडलं तुला की ती आली होती?” ईशा

 

काहीच कळत नाहीये. कदाचित स्वप्नात पण आली नसेल ती. मी ऐकलेत ना हे शब्द मगाशी तिच्याकडून. कदाचित झोपेत मलाच परत आठवले असतील.” सायली

 

पण ह्याचा अर्थ काय?” ईशा

 

काहीच कळत नाहीये…..” सायली पुन्हा पुन्हा त्या लिहिलेल्या शब्दांकडे निरखून पाहत होती. “ईशा, हे बघ हे वरचे शब्द बघजे काय आहे तेतुला आठवतंय साखरपुड्याच्या दिवशी रात्री वरच्या खोलीत मी खिडकी बंद करायला गेले होते, तेव्हा तीआली होती. तेव्हा ती असंच काहीतरी म्हणाली होती. किंवा हेच शब्द असावेत कदाचित….आत्ता हे शब्द वाचल्यावर मला तसं वाटतंय

 

..................” ईशाने ते मोठ्याने वाचलं. “सायले, ‘तीकुणीतरी आफ्रिकन किंवा हिब्रू वगैरे असावी. काय बोलते काहीच कळत नाही…..”

त्या परिस्थितीतही दोघी खळखळून हसल्या. पाच मिनिटानंतर सायली म्हणाली,

जोक्स अपार्ट ईशी, पण ह्या अक्षरांचा अर्थ लावायला हवा. कदाचित ती खरंच काहीतरी सांगत असेल आपल्याला…”

 

कक आणि टट ह्याचा काय अर्थ लावायचा सायले?” ईशा

 

हे बघ, तिचा आवाज नीट आठवून बघितला की असं वाहत्या वाऱ्याचा आवाज कसा वाटतो ना, तसं वाटतंम्हणजे वारा वाहताना कसा घु, घु ,घु….असा आवाज येतो आणि त्या प्रवाहात ती ते बोलते असं वाटतं….म्हणजे मला तुला नीट सांगता येत नाहीये….पण असं वाटतं की त्या वाऱ्यासारख्या आवाजात तिचा आवाज मिसळला जातोय आणि आपल्याला डबल डबल ऐकू येतोय…..तू पण ऐकला होतास ना तिचा आवाज कालच….मला फोन केलास आणि मी बाथरूम मध्ये होते आणि तुला तिचा आवाज आला….आठवून बघ ना जरा सायली

 

हो गंतू म्हणतेयस ते बरोबर आहे….असंच ऐकू येतं तिचं बोलणं….एखाद्या वादळामध्ये कुणी उभं असेल, आजूबाजूला सगळी उलथापालथ झालीये आणि प्रचंड वाऱ्यामुळे नीट श्वास घेणंसुद्धा कठीण झालं असेलआणि त्यात आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर आपला आवाज कसा त्या वाऱ्याच्या आवाजात मिसळला जाईलआणिआणि….हो.. होबरोबर आहे सायले, कदाचित डबल ऐकू येईल आपल्याला…..” ईशा

 

ईशी, तू तर एखाद्या कादंबरीच्या लेखकाला पण लाजवशील….एवढं चांगलं बोलत जाऊ नकोस हाखरं वाटत नाही ..मला एक मिनिट वाटलं की तीच आली की काय तुझ्या अंगात…..”

ईशाने तिच्या पाठीत एक धपाटा घातला ..

ओके,…टाईमपास नंतर करू. हे बघ आता ह्या अक्षरांबद्दल बोलायचं झालं तर आपल्या अंदाजाप्रमाणे ते आपल्याला दोन वेळा ऐकू आलंयम्हणजे खरे शब्द असणार….क ट न ई …” सायली

 

क ट न ई …..क ट न ई………पण म्हणजे काय? ह्याचाही अर्थ नाहीच लागत आहे….” ईशा

 

थांब पुढची अक्षरं बघू……म म ….….……. म्हणजे म आ ह ई …..” सायली

सायलीने ते शब्द पुन्हा पुन्हा उच्चारले तसा ईशाच्या डोक्यात प्रकाश पडला…….

माही …..माही असा शब्द आहे हा सायले…..आणि आत्ता तू पुन्हा पुन्हा बोलत होतीस तेव्हा आठवलं, काल फोनवर मी हीच अक्षरं ऐकली होती….तू पुन्हा पुन्हा म्हटल्यामुळे तो एक शब्द असल्यासारखं ऐकू आलं आणि म्हणून कळलं मला….”

 

यसबरोबर आहेमाही…..माही हे नाव असतं ना? मुलीचं…. म्हणजे मला तरी तसंच वाटतंयआणखी कुठल्या संदर्भात मला तरी माही असं ऐकल्याचं आठवत नाही…..कुणाचं नाव असेल हे? ” सायली

 

कदाचित तीचं असेलकिंवा आणखी कुणाचं….कसं कळणार आपल्याला……?” ईशा

 

कळेल….पण ईशा ह्या सगळ्याचा अर्थ स्पष्ट होतोय आता…’तीने परत परत येउन आपल्याला हेच शब्द सांगितलेम्हणजे कदाचित तिला काहीतरी सांगायचंय आपल्याला….तिच्याबद्दल….तिला मदतीची गरज असेल का? ” सायली

 

किंवा तिला आपल्याला काहीतरी माहिती देऊन सावध करायचं असेल ?” ईशा

 

हम्म….तसंही असेल….आता ही माही कोण हे शोधून काढायला हवं….शी यार, मला अंधुकसं आठवतंय ती मला आणखी काही सांगत होती, कदाचित काहीतरी दाखवत असावीपण मला नाही आठवत …

 

जाऊदे, आपल्याला आत्ता हे कळलंय ते पण काही कमी नाही….चल झोप आताथोड्या वेळात उठायचीच वेळ होईल…” ईशा

————————

सकाळी चहा घेताना सायलीला खूपच फ्रेश वाटत होतं. आजही झोप झालेली नव्हती. रात्रभरात बरंच काही घडून गेलं होतं, तरीही. ….तिने आणि ईशाने जो शोध सुरु केला होता, त्याला अप्रत्यक्षपणे कुणाचातरी पाठींबा मिळतोय, कुणीतरी आपल्याला माहिती पुरवतय, असं तिला वाटत होतं. अर्थात तीच्या येण्यामागचं कारण अजूनही पक्कं कळलेलं नव्हतंच. पण आत्तापर्यंत तिने त्यांना इजा पोहोचेल असं काहीच केलेलं नव्हतं. तेवढ्यात ईशा बाहेर आली. चहा घेताना बोलण्यासाठी दुसरा कोणताही विषय नव्हता दोघींकडे.

सायली, आता पुढे काय करायचं? आपल्याला जे कळलंय, त्यावरून पुढे काय शोध घेणार आहोत आपण? ” ईशा

 

ते मलाही कळत नाहीये….पण मला असं वाटतंय की तिच्या येण्याचा हेतू तरी स्पष्ट झालाय. तिला कदाचित मदतीची गरज आहे किंवा तिला आपल्याला काहीतरी सांगायचंय. आपल्याला काही करण्याचा तिचा हेतू नसावा, असं आत्ता तरी वाटतंय. ” सायली

 

हो, पण तरीही तीकोण आहे, काय आहे, हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तो पर्यंत ती आपल्याला काही करणार नाही, असं गृहीत धरायला नको आपण….आणि आपला शोध म्हणशील तर आपल्या लेवलला सुरु ठेवलाच पाहिजे. आणि खरं तर आणखी कुणी आपल्याला ह्यात मदत करणार असेल तर कदाचित आपल्याला आपली दिशा सापडेल किंवा निदान आपला शोध आणखी फास्ट घेता येईल.” ईशा

 

अगं पण कुणाची मदत घेणार? अनिकेतचं म्हणशील तर तो नक्की काय मदत करू शकतो, मला कळत नाही. घरात बसून इंटरनेट वरून काहीतरी माहिती काढणं, एवढं तो छान करू शकेल. पण बाहेर जाऊन कुणाची माहिती वगैरे काढणं मी त्याला नाही सांगू शकत. अजून लहान आहे गं तो तसा….” सायली

 

माहितीये मला….अनिबद्दल नाही बोलत आहे मी. एक तिसरीच व्यक्ती आहे. तुझ्याही ओळखीची. आपण तिघे आत्ता भेटतोय आणि पुढचा प्लान ठरवणार आहोत. आमचं बोलणं झालंय आत्ताच. तू एकदीड तास उशिरा जा ऑफिसला. आणि चल आता तयार होऊया….”

ईशा बोलताबोलता उठलीसुद्धा.

ईशा, एक मिनिट, काय चाललंय? कोणाला सांगितलं आहेस तू ह्याबद्दल? मला काहीच नाही बोललीस तू ह्याच्याबद्दल?” सायली

आपण भेटू तेव्हा तुला कळेलच ना. सरप्राईझ असेल तुझ्यासाठी….”

ईशा आत गेलीसुद्धा.

कोण असेल माझ्या ओळखीमध्ये आम्हाला मदत करणारं? सायलीने खूप विचार करून बघितला. पण तिला काहीच अंदाज आला नाही.

सायले, लवकर ये….”

ईशाचा आतून आवाज आला तशी ती उठली आणि चहाचे कप आत घेऊन गेली.

——————————–

ईशा अंघोळ करून बाथरुममधून बाहेर आली तेव्हा सायली तिच्या ड्रेसिंग टेबलसमोर बसली होती. विचारमग्न. समोरच्या आरशातून ती मागे कुठेतरी बघत होती.

सायली, , काय बघतेयस एवढं आरशात? छान दिसतेयसमी सांगते ना…..”

तिच्या बोलण्यावर सायलीकडून काहीच प्रत्य्युत्तर आलं नाही. ईशाने बघितलं, सायली अजून तशीच विचारमग्न होती. आरशातून कुठेतरी रोखून बघत होती.

सायलेईशाने तिला हलवलं…” काय झालं? कुठे हरवलीयेस?”

 

ईशा मला ना सारखं असं वाटतंय की तिथे काहीतरी आहे….”सायली आरशातून समोरच्या भिंतीकडे बोट दाखवत होती…”कुणीतरी मला सांगत होतं तिथे जाऊन बघ, असं सारखं वाटतंय मला….पण नीट आठवत नाहीये….काल ती आली होती, ती सांगत होती का मला असं? काय असेल तिथे?”

सायलीने दाखवलेल्या दिशेने ईशाने मान वळवून बघितलं..

क्रमशः

8 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 17)

 1. Anonymous
  May 14, 2016

  Mast suspense aahe

  Like

 2. Mayuri ghoap
  May 16, 2016

  Chan….pudhchya bhag lvkr yeu dya ….exicited

  Like

  • rutusara
   May 16, 2016

   nakkich …lavkarat lavkar pudhcha bhag post karnyacha prayatna karte…dhanyawaad 🙂

   Like

 3. UJVALA
  May 21, 2016

  good

  Like

 4. Shradha K
  May 23, 2016

  pudhacha bhag taka pls..

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on May 14, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: