davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 39)

पण तो मुलगा – सुजय, आज शाळेतही आला होता हे छूला सांगितलं तर कसली संतापली होती…पण ती म्हणत होती ते सुद्धा पटलं मला….काल म्हणे तो मित्राला भेटायला म्हणून आमच्या गावात आला आणि आज काय, तर गावातल्या सगळ्या शाळा बघायच्या होत्या त्याला…दोन्ही कारणं मला पटली नाहीच आहेत खरं तर…दोन्ही ठिकाणी तो भेटला हा योगायोग कशावरून असेल? छू म्हणाली तसं तो मला भेटण्यासाठी तर येत नसेल? पण ती म्हणाली तसं त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे वगैरे असं नाही वाटत मला….साधा, सरळ तर आहे…त्याच्याशी बोलताना सुद्धा फार मोकळं वाटतं…असं वाटतं की मनातलं सगळं मी त्याच्याशी बोलू शकेन…छू आपली त्या दिवशीचं भांडणच पकडून बसली आहे…म्हणूनच तिच्या मनात अजून इतका राग आहे त्याच्याबद्दल….आता फोनवर किती आणि काय, काय समजावणार तिला…परत आली की बघू….तोपर्यंत तो सुजय तरी इथे राहील का काय माहित…..

 

पण एक प्रश्न राहून राहून मनात येतोच आहे….दोन दिवस आमची भेट झाली हा खरंच योगायोग होता की तो मलाच भेटायला आला होता?

************************* भाग ३८ पासून पुढे *****************

भाग ३८ येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-XW

 

जवळपास दीड वर्षांपूर्वीकटनी नावाच्या एका गावात एका दुपारी

——————————————–

अरे बेटा, करू क्या मैं इतने दिन वहा जाकर? “

 

मामाजी आपको कबसे बुला रहे है ना अम्मा…..तो जाके आईए ना थोडे दिन के लिये….”

 

उसकी बीवी बात भी नही करती ठीक से, तुम जानती हो ना…”

 

उससे क्या फरक पडता है? आप बस ध्यान मत देनामामाजी के लिये तो जाईये…”

 

रेहेने दो ना बेटातुम्हे भी तो अकेले रेहेना पडेगाऔर फिर मामा तुझे भी तो बुला रहा हैतो जायेंगे बादमे कभी...”

 

अम्मामैं क्या छोटी बच्ची हूं? थोडे दिन अकेले नही रह सकती? वैसे भी मैं भी तो दो दिन के लिये जा रही हूं….और फिर छू भी तो है यहा…..मैं मामाजी से बात करुंगी, बोलूंगी के मैं बादमे कभी आऊंगी…वो बुरा नही मानेंगेआप अब इस प्लॅन मैं कोई चेंज नही करेंगी, ठीक है?”

 

और आंटीजी, आपको तो इतनी अच्छी कंपनी भी है बस मैं….आपकी बेस्ट फ्रेंड मीरा चाची ….”

छू तेवढ्यात आत येत तिच्या नेहेमीच्या मिस्कील स्वरात गालात हसत हसत म्हणाली….

छू….मैं इतनी मुश्किल से अम्मा को कन्व्हिन्स कर रही हूं….और तू आके सब बिगाड रही है? अम्माको सिर्फ कंपनी चाहिये बस मैंऔर अम्मा, मीरा चाची इतनी बुरी नही है….आप बस आप दोनोका जिस टॉपिक पे झगडा होता है, वो टॉपिक ही नही ओपन करना है….”

 

ठीक है बेटा, जाऊंगी मैंकब निकलना है?”

 

कल आपको दस बजे बसस्टॅन्ड पे छोडती हू मैंमीरा चाची मिलेगी हमें वहाफिर आप दोनो आराम से चले जानाऔर अम्मा, याद रखना आपको पहेले उतर जाना हैनही तो चाची के साथ आगे चले जायेंगी आप…”

 

हाहापता है मुझेऔर तुम दोनो कब निकलोगी फिर?”

 

उसके बाद एक ही घंटेमे ….वहा इंदौर मैं छू का कुछ काम है…फिर एक दिन वहा रहेंगे…और उसके अगले दिन सुबह छू वापस आयेगी और मैं जबलपूर जाऊंगी शादी के लिये….”

 

और कहा रहोगी वहा? इंदौर मैं?”

 

छू के चाचाजी रहते है ना वहा, उनके घर …..”

मग दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अम्मा मामाकडे गेली आणि कोमल आणि छू इंदौर लादुसऱ्या दिवशी छू चं तिथलं काम झाल्यावर त्या इंदौरच्या फेमस सराफा बझार मध्ये गेल्या, तिथले खास पदार्थ खाण्यासाठीतिथेच त्यांना सुजय भेटलाम्हणजे डायरीत आधी लिहिलं होतं, तसा भेटलादहीवड्याची प्लेट अंगावर सांडली म्हणून छू त्याच्याशी भांडलीकोमल मध्ये पडलीमग कसंतरी तिला समजावून दोघी तिच्या काकांच्या घरी परत आल्या….दुसऱ्या दिवशी सकाळी मग छू कटनीला परत गेली आणि कोमल लग्नासाठी जबलपूरला गेली…जवळपास दिवसभराचा प्रवास होता…इतका लांबचा प्रवास करून कोमल इतकी दमली होती की रात्री लग्नाच्या हॉलवर संगीत होतं, खालच्याच मजल्यावरपण तिथेही जायला तिच्या अंगात त्राण नव्हतं. ती थोडीशी जेवली आणि मग झोपून गेली.

 

दुसऱ्या दिवशी सुजय तिला भेटला. लग्नात दिवसभर कुठे कुठे दिसत राहिला, संध्याकाळी पुन्हा भेटला तेव्हा बोलताबोलता तिने त्याला सांगितलं, आपण कटनीला राहत असल्याचंपण तेव्हा तिला कल्पनाही नव्हती की हा मुलगा दोन दिवसांनी पुन्हा कटनीला तिला भेटणार आहे….

—————————————————–

दुसऱ्या दिवशी ती जबलपूरहून निघून कटनीला परत आली. येईपर्यंत संध्याकाळ झाली होती. अम्मा तर घरात नव्हतीच, पण छू सुद्धा नव्हतीतिच्या मामेभावाच्या लग्नासाठी आणखी दुसऱ्याच गावाला गेली होती. पण ठीक आहे, उद्याच तर येतेय तीआजचा दिवस काढला की झालं

 

जेवून ती झोपायला गेली. खरं तर ती दमली होती, पण तरीही तिचा लगेच डोळा लागला नाही….दोन दिवस लग्नात केलेली धमाल आठवत होतीपण त्याहीपेक्षा बिदाईच्या वेळेला डोळे लाल होईपर्यंत रडणारी ती वधू आठवली. खरं तर ती तिची कुणीच लागत नव्हती, महाराष्ट्रातल्या पुण्याहून त्या नवख्या शहरात आलेली ती मुलगी, उद्या हिच्या बरोबरचे सगळे, तिच्या घरचे, तिचे मित्रमैत्रिणी नातेवाईक तिला इथे एकटीला ह्या नवीन लोकांमध्ये सोडून परत जाणार तेव्हा त्यांची आणि हिची काय अवस्था होईल? त्यांचं लव्हमॅरेज असलं तरी ती त्याच्या एवढ्या सगळ्या मोठ्या कुटुंबाला तर नक्कीच ओळखत नसणारबिदाईच्या वेळेला ती नकळत वधूपक्षाचीच होऊन गेली, नकळत तिचे डोळे भरून आले होतेपण आत्ता ते सगळं आठवायचं काय कारण होतं? ती रडणारी वधू काही केल्या डोक्यातून जातच नव्हती. मुलगी कितीही शिकलेली असूदेत, कुठल्याही प्रातांतून आलेली असूदेतहे बिदाईचं रडणं मात्र जातच नाही तिच्या नशिबातून…..पुढे कधीतरी माझंही लग्न होईल…..मग मी पण अशीच रडणार….अम्मा एकटी पडेल मी गेल्यावर…..तिला मध्ये चक्कर आली होती दोन वेळा, म्हणून मामाजींकडे पाठवताना सुद्धा तिला कोणाचीतरी सोबत आहे हे बघूनच पाठवलं….पण जेव्हा मी लग्न करून इथून जाईन, त्यानंतर ती पूर्णपणेच एकटी पडेल….कोण असेल मग तिच्या सोबतीला?

 

आज ना उद्या, ही वेळ येणारच आहे…..छूच्या घरचे तर लग्नासाठी कधीपासून तिच्या मागे लागलेतअम्मा तशी जुन्या विचारांची नाहीमी माझ्या पायांवर नीट उभी असल्याशिवाय, मी इंडिपेन्डन्ट झाल्याशिवाय ती माझ्या लग्नाचा विचारही करणार नाही, पण म्हणून आणखी किती दिवस? एक किंवा दोन वर्षमग नंतर काय? अम्मा, माझं घर, माझं आणि बाबूजींचं स्वप्न…..हे सगळं असंच सोडून लग्न करून निघून जाऊ मी? शक्यच नाहीपण छू च्या अम्मा सारखी माझी अम्मा पण नंतर माझ्या मागे लागली लग्नासाठी, तर मग काय करू मी? किती दिवस तिला थोपवून धरू?

 

डोक्यातल्या विचारांनी नकळत तिचे डोळे पेंगायला लागले आणि तेवढ्यात लग्नात भेटलेला तो मुलगा, त्याचा चेहरा एकदम डोळ्यांसमोर आला तिच्या आणि तिच्या मनातले आधीचे विचार एकदमच थांबले. खरं तर आवर्जून लक्षात ठेवावं असं काहीच नव्हतं त्याच्या बाबतीत, पण का कुणास ठाऊक, आज दिवसभर मध्ये मध्ये तो तिला आठवत होता, काल सकाळी नाश्त्याच्या वेळेला त्याच्याशी बोलणं झालेलं ते आठवत होतं, लग्नात त्याचं तिच्याकडेच लक्ष आहे, हे तिला जाणवलं होतं, ते आठवलं….

 

नाईटलॅम्पच्या उजेडात घड्याळाकडे लक्ष गेलं आणि मग नकळतच तिला झोप लागली.

————————————————–

दुसऱ्या दिवशी सकाळी काही सामान आणायला ती किराणा स्टोअर मध्ये गेली आणि ती तिथून सामान घेऊन निघणार तेवढ्यात समोर तो मुलगा दिसला. आत्ताच पाच मिनिटांपूर्वी बसमधून उतरला होता आणि पाणी विकत घायला ह्या दुकानात आला होता

( “सायले , म्हणजे बहुतेक सुजय तिथे आधीच आलेला असणार….कदाचित लग्नाच्या घरातून कुणीतरी त्याला ह्या मुलीची माहिती सांगितली, हा तिथे गेला असेल आणि कदाचित तिचं घर त्याला कळलं असेल तर त्याने तिचा पाठलाग केला असणार आणि मग त्या दुकानात तिला भेटण्याचं नाटक केलंबघ ना, तो बसमधून उतरल्या उतरल्या त्याला ती तिथे भेटणं, हा योगायोग वाटतो ना…..म्हणजे माझा असा अंदाज आहे फक्त….

“हम्म….पुढे बघूया काय होतंय ते…मग कळेल थांब.”)

बोलताबोलता तिला त्याचं नाव कळलं सुजय. त्याने सांगितलं की त्याचा एक मित्र ह्या गावात राहतो, त्याला भेटायला तो आला होता. पण मग परवा लग्नात मी ह्याला माझ्या गावाचं नाव सांगितलं, तेव्हा हा का नाही बोलला की त्याचा मित्रही तिथे राहतो म्हणून? तिच्या मनात येऊनच गेलं लगेच. तिने विचारलं सुद्धा मित्र कुठे राहतो ते, त्यावर तो म्हणाला की पत्ता तर मलाही माहित नाही, पण त्याला फोन केल्यावर तो घ्यायला येईल.

 

मग बोलता बोलता ती लायब्ररीमध्ये जात असल्याचं त्याला कळलं. त्यावर त्यानेही यायची तयारी दाखवली. तिला त्याचं वागणं थोडं वेगळं वाटलं खरं तरमित्राला भेटायला आलेला मुलगा अचानक आपण भेटल्यावर आपल्याबरोबर लायब्ररीमध्ये का येईल? पण कुणाशी एकदम फटकून वागण्याचा तिचा स्वभावच नव्हता. आणि खरं तर त्याला टाळायचं कसं असा प्रश्न तिला पडला. त्याच्याशी बोलताना विषय शोधावे लागत नव्हते हे मात्र खरं.लायब्ररीतून बाहेर पडल्यावरसुद्धा ते दोघे बराच वेळ वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत होते….अचानक घड्याळाकडे लक्ष गेल्यावर ती भानावर आलीदुपारच्या जेवणाची वेळही टाळून गेली होती….मग मात्र घाईघाईने त्याचा निरोप घेऊन ती घरी परत आली.

 

दिवसभर सुजयचे विचार तिच्या डोक्यात घोळत राहिले. हळूहळू तिच्या मनात एक अपराधीपणाची भावना निर्माण झाली. एका अनोळखी मुलाशी आपण इतका वेळ गप्पा मारल्या, उगीच एवढा वेळ बोलत बसलो त्याच्याशीदोन दिवसांचीसुद्धा ओळख नाही आपली..उगीच स्वतःबद्दल कशाला सांगत बसायचं कोणाला? मनातल्या मनात स्वतःला नावं ठेवत ती झोपायला गेली. जाऊदे, आता परत कुठे भेटणार आहे तो? आणि भेटला तरीही आपण फक्त चौकशी करून आपल्या कामाला लागायचं, उगीच गप्पा मारत बसायचं नाही….तिने मनाशी ठरवलं….खरं तर छू मुळे झालंय हे सगळं आज येणार असं म्हणाली होतीती आली असती तर कदाचित आपण गप्पा मारत घरातच बसलो असतो किंवा तिला घेऊन बाहेर गेलो असतो आणि मग त्या सुजयशी एवढा वेळ गप्पा मारण्याची वेळच आली नसतीउद्या फोन करायलाच हवा तिला….

————————————————

मग दुसऱ्या दिवशी सकाळी ती शाळेत गेली. मुलांना हिंदी शिकवण्यासाठी. शाळेत आत्ता नवीन शिक्षकांची गरज नव्हती. पण तरी ती कधी कधी जायचीआणि तिला तिथे सगळेच ओळखायचेमुलांना तर तिच्याकडून शिकायला आवडायचंच……तिचं तिथे नुसतं असणंच फार प्रसन्न करणारं असायचं. त्यादिवशी वर्ग संपवून ती वर्गाबाहेर पडली आणि समोर तो सुजय उभा. तिने काही विचारायच्या आतच त्याने सांगितलं की तो गावातल्या शाळा बघायला बाहेर पडला होता आणि तिला वर्गात शिकवताना बघून तिच्याशी बोलायला म्हणून तो बाहेर थांबला होता. तिला खरं तर ते विचित्र वाटलं आणि काल मनाशी ठरवल्याप्रमाणे तिने त्याची फक्त जुजबी चौकशी केली. पण तिचा हा निश्चय फक्त पाचच मिनिट्स टिकला असेल. तिने शिकवलेल्या कवितेचा काही भाग नीट न कळल्यामुळे एक मुलगा वर्गातून बाहेर येऊन तिला त्या ओळींचा अर्थ विचारू लागला आणि मग त्याला ती कविता समजावून सांगण्याच्या निमित्ताने सुजयशी तिचा संवाद पुन्हा सुरु झाला, तिच्या नकळतच…. पुन्हा एकदा त्यांनी खूप गप्पा मारल्याशाळेतून निघून ते घरापाशी पोहोचेपर्यंत

 

त्याच्याबरोबर बोलण्यात तिचाही वेळ चांगला गेला होता. बऱ्याच दिवसांनी आपल्या आवडीच्या विषयांमध्ये रमणारं आणि त्याहीपेक्षा आपले विचार इतक्या चांगल्या पद्धतीने कळणारं कोणीतरी आपल्याला भेटल्यासारखं तिला वाटलं. विचारांमध्ये तफावत होती, पण म्हणून त्याने तुझं चूक आणि माझं बरोबर असं केलं नाही. हा अनुभव तिला नवीनच होता. प्रत्येक माणूस हा आपली बाजू किंवा विचार कसे बरोबर आहेत हे पटवून द्यायचा आटोकाट प्रयत्न करत असतो… मग ते घरात असो की बाहेर समाजात….अगदी तिच्या घरात सुद्धा अम्माचं उदाहरण होतंच की…तिचे विचार समजून न घेता अम्मा स्वतःचेच विचार बरोबर आहेत असं म्हणून तिच्यावर लादायचा प्रयत्न करायची…पण ह्या सुजयच्या बाबतीत मात्र तिला वेगळाच अनुभव आला….गेल्या दोनच दिवसात हा मुलगा आपल्याला खूप कळायला लागलाय, तिला वाटून गेलं.

 

आजही संध्याकाळी ती ह्याच सगळ्या विचारात होती…..तेवढ्यात फोन वाजलाछू चा फोन….

छूकहा है तू….? कल आनेवाली थी ना….?” ती ओरडलीच छू वर

 

सॉरी यार ..मैं यहा लिटरली फस गयी हू, पता है?” छू च्या आवाजात फार उत्साह नव्हता.

 

क्या मतलब?”

 

अरे वो शादी मैं कुछ दूर के रिश्तेदार आये थे, उन्होने मेरे लिये एक रिश्ता बोला है….” छू

 

अरे वा छू….नॉट बॅड ….रिश्ता वगैरा…”

 

अब बस भी करेगी….जैसे तू जानती ही नही….मैं तेरे हर बात में तेरा साथ देती हू और तू ….” छू

 

अरे बाबा, बस मजाक कर रही थी….मैं तेरा साथ नही दूंगी क्या? सुन, इतना टेन्शन क्यो ले रही है? अम्माबाबूजी को बोल दे ना की तुझे दोतीन साल जॉब करनी है….”

 

अरे बोल रही हू कबसे मैं ये लोगोसे कोई सुन नही रहा मेरी बात …. अब दो दिन के बाद वो लडके के घर जाने की बात हो रही है…..है भगवान, मैं यहा नही आती तो ही अच्छा होता…” छू

 

मतलब तू कल भी नही आयेगी? ओह गॉड अच्छा सुनअब सब लोग बोल रहे है तो तू जाके मिलके आ वो लडके को….डिसिजन तो तेरा ही होगा ना बादमे….”

 

हम्म….और अब जाना तो पडेगा….शायद और तीनचार दिन लग सकते है मुझे वापस आनेमे तू बताऔर क्या चल रहा है वहा?” छू

मग तो मुलगा तिथे आल्याची बातमी छूला कळल्यावर ती खवळलीच.

तुने क्यों इतनी देर बात की उससे ? एक तो ठीक से जानती भी नही उसको तूऔर एक बात बता मुझे, उसने तुझे जो भी कुछ बताया, तुझे सब सच लगा क्या? मैं तो यहा बैठके भी बोल सकती हू वो लडका तेरे पीछे आया है यहा तक….”

 

छू, ऐसे नही है यारतू एक बार बात करेगी ठीक से तो तुझे भी पता चलेगाअच्छा लडका है वोऔर कोई अच्छा है तो उसको ऐसे ही बुरा समझके उससे बात करना ठीक है क्या?”

मग त्या दोघींची पुन्हा थोडा वेळ ह्या विषयावर चर्चा झाली पण अर्थात एकमेकींची मतं पटली नाहीच

(” सायले, तुझ्या काय तीस्वप्नात आली होती का हे सगळं सांगायला? तू एवढं सगळं कसं काय सांगू शकतेयस? जणू काय, तेव्हा काय काय घडलं, ते तिथे काय बोलले हे सगळं ऐकायला तू तिथेच होतीस असं वाटतंय हे सगळं ऐकून…”

 

ईशा, सिद्धार्थने फोनच्या मेमरीचा प्रश्न सोडवून मग नंतर आपल्याला डायरीतली पुढची पानं पाठवली होती ना…”

 

हो, मग त्याचं काय ? ती पानं अधाशासारखी वाचली आपणकिती तुटक होतं त्यात सगळं….एका ओळीचा, दुसऱ्या ओळीला काही पत्ता नही मी म्हटलं पण तुला की हे त्या मुलीचा वेळ जात नव्हता म्हणून तिने लिहिलं असणारआपल्याला उपयोग नव्हता त्याचा…”

 

त्याचा उपयोग मी कसा करून घेतला, हे मी नंतर एक्सप्लेन करेन तुला ईशीहे सगळं एका स्टोरी फॉर्म मध्ये मी तुला सांगतेय ना, त्यासाठी त्या डायरीतल्या पानांचाच उपयोग झालायबरं आता पुढचं सांगू का?”

 

अर्थात, सांग…पण तरी तुला त्या अर्धवट तुकड्या तुकड्याने लिहिलेल्या पानांमध्ये ही एकसंध स्टोरी कुठे मिळाली काय माहित….”)

मग छू येत नही तोपर्यंत रोज शाळेत जायचं तिने ठरवलं..दुसऱ्या दिवशीसुद्धा सुजय शाळेत आला होतापुन्हा त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. आत्तापर्यंतच्या आयुष्यात छू शिवाय इतर कुणाशी इतक्या गप्पा मारलेल्या सुद्धा तिला आठवत नव्हत्या. तीन दिवसांची ओळख हळूहळू मागच्या कितीतरी वर्षांपासूनची आहे की काय, असं वाटायला लागलं.

——————————————————

मग दुसऱ्या दिवशी शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती..त्याला तर त्याने कहरच केलातो स्वतः एका म्हाताऱ्या माणसाचा वेष करून शाळेत आला होताजाड चष्मा, लांब दाढी

(“सायले, म्हणजे तो फोटोसिद्धार्थ जेव्हा पहिल्या दिवशी त्या प्रजापती निवासला गेला होता, तिथल्या बाहेरच्या खोलीतल्या फोटोफ्रेममध्ये त्याला दोन फोटो मिळाले होते, एक सुजयचा आणि दुसरा म्हातारा माणसाच्या वेषातल्या सुजयचा

 

हम्म….हा तोच फोटो असणार ते वर्णन डोळ्यासमोर आल्यावरच लक्षात येतं“)

त्याचा तो वेष बघूनच तिला हसू आवरेना. शाळेतल्या फोटोग्राफरकडून तिने त्या वेशातले त्याचे फोटोज काढायला लावले..

 

त्यातली एक कॉपी फोटोग्राफरने त्यालाच दिली आणि दुसरी चुकून फॅन्सी ड्रेसच्या फोटोजबरोबर शाळेकडे गेली. ती दुसऱ्या दिवशी गुरुजींनी तिच्याकडे परत दिली, त्याला देण्यासाठी….

——————————-

त्यानंतरचा दिवस….ती सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार होत होती, तेवढ्यात दार वाजलं. समोर सुजय उभा होता.

तुम? यहा?”

 

हा सॉरी बिना बतायें आयाअक्चुअली मुझे वो यहा का जो फेमस मंदिर है, वहा जाना है..लेकिन अकेले जानेमे बहोत बोअर भी हो रहा हैतो सोचा अगर तुम फ्री हो और इफ यु डोन्ट माईंड मी आस्किंग, तुम आ सकती हो मेरे साथ?”

त्याने एकदम असं विचारल्यावर तिला काय बोलावं हे सुचेनाच. एकतर, आतापर्यंत तो तिला बाहेर भेटला होता, अचानक भेटल्यासारखा. मागचे दोन दिवस शाळेत मात्र तो ठरवून आला होता, पण बाकी सगळे लोक होते त्यांच्याबरोबर. आज त्याच्याबरोबर असं ठरवून बाहेर जायचंठीक वाटेल का? जाऊदे, त्यापेक्षा त्याला असं सांगूया की आपल्याला शाळेत जायचंय म्हणूनपण काय हरकत आहे एक दिवस गेलं तर? त्याला इथली फारशी माहिती सुद्धा नाही..आणि त्याच्याशी बोलण्यात वेळसुद्धा चांगला जातो ….दोनतीन तास बाहेर जाऊन आलं तर काय हरकत आहे?

आय गेस तुम्हे ठीक नाही लगाइट्स ओके आय अंडरस्टॅंड….हमारी बस कुछ ही दिनो की पेहेचान है और…”

 

नही, नहीमैं आज स्कूल जानेवाली थी लेकिन आ सकती हू शायद थोडे टाईम के लियेतुम्हे वो विष्णू मंदिर जाना है नामुझे भी वहा गये एक साल हो गया, इसी बहाने मैं भी मंदिर होके आऊंगीवोही सोच रही थी..”

(“ईशी तुला आठवतंय ना…सुजयच्या फेसबुक प्रोफाईलवर त्याचा एक फोटो होता…एका मंदिराच्या बॅकग्राऊंडवर काढलेला….आपण काहीतरी करून त्या मंदिराचं नाव शोधून काढलं होतं….”

 

“ओह येस….विष्णू-वराह मंदिर….सायली, म्हणजे ते हेच मंदिर असणार…”

 

“हो, असंच वाटतंय…”)

आजचा आणखी एक दिवस असाच गेला, वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यातआधी विषय जनरल होते, एखादं आवडलेलं शहर, किंवा पुस्तक, मुव्ही वगैरे ..मग हळूहळू स्वतःबद्दलतो तिला पुण्यासारख्या शहराबद्दल सांगत होता, शहरातली धावपळ, स्पर्धा, रुटीन, सगळंच….मग एकमेकांचं लहानपणशिक्षण….

 

हळूहळू विषयांची दिशा एकमेकांची स्वप्न, ध्येय, त्यासाठी चालू असणारे प्रयत्न वगैरे ह्याकडे वळलीतो स्वतःबद्दल सगळं काही सांगत होतात्याला आयुष्यात काय व्हायचंय, त्याची स्वप्न, त्याच्या आईच्या त्याच्याकडून अपेक्षा वगैरे सगळंचपण तिचं मन मात्र सावध झालं होतंतिने आणि बाबूजींनी पाहिलेलं स्वप्न, …आजपर्यंत अम्मापासूनसुद्धा लपवून ठेवलेली गोष्ट आज बोलताबोलता ह्या सुजयला चुकून सांगितली असती तर…..

(“अशी कुठली गोष्ट असेल सायले, जी तिने तिच्या अम्माला पण सांगितली नाही?”

 

“काय माहित, बघू पुढे काही संदर्भ लागतोय का ते …”)

अँड व्हॉट अबाऊट यु? तुम्हे देखके तो ऐसे लगता है की तुम सपनोकी दुनिया मैं ही रेहेती होआय मिन, हर वक्त कुछ तो भी सोचती रेहेती हो ऐसा लगता हैआय एम शुअर तुम्हारी अँबिशन्स भी बहोत बडी होगी …..”

 

सुजय, अक्चुअली कितना लेट हो गया है ना, मैने सोचा था दो घंटेमे वापस आयेंगे, हम लोग बाते करने बैठ गये और शाम के पाच बज गये, देखो….मुझे निकलना चाहिये अब…”

 

हासच हैवक्त का पता नही चला बिलकुलवैसे मैं सबसे साथ इतनी बाते नही करता हूबहोत कम लोग है जिनसे इतनी सब बाते करता हू मैंएक मेरा दोस्त संतोष और दुसरे मेरे चाचाजीपूना मैं ही रेहेते है….वैसे एक ही बात करनी है और ….अगर तुम्हे लेट नही हो रहा है तो…”

 

ओकेबोलो…”

 

आय डोन्ट नो, तुम्हे मेरी बात पसंद आयेगी की नही….बट आय रिअली लाईक यु….ऍज अ फ्रेंड ..….आय मिन….फ्रेंड से भी कुछ ज्यादाहम लोग शादी में मिले अँड आय जस्ट कुडन्ट फर्गेट यु….ऐसे लगा की मुझे तुमसे मिलके तुमसे बहोत सारी बाते करनी चाहिये…. फ्रेंडशिप करनी चाहियेमुझे ऐसे क्यो लगा आय रिअली डोन्ट नोबट उस वक्त जो दिमाग में आया मैने बस वोही किया…. बॅग पॅक कीऔर मेरे दोस्त की बेहेन के घरसे, मतलब वोही जिसकी शादी हुई अभी, उस घरसे थोडी इन्फॉर्मेशन निकाली तुम्हारे बारेमें…. उस दिन तुम्हे मैने बताया की मैं अभी बस से उतरा हूसॉरी लेकिन वो झूठ कहा था मैनेअक्चुअली मैं सुबह ९ बजे ही कटनी आया था और तुम्हारे घर के बाहर ही खडा था लेकिन डायरेक्ट्ली तुम्हारे घर आने की हिम्मत नही हुई मुझेफिर तुम जब बाहर निकली तब तुम्हारे पीछे आया मैं और उस शॉप में तुमसे मिला….”

(“सायले, बघ मी मगाशी हेच म्हणत होते….तो आधीच तिची माहिती काढून आला होता

 

हम्म….”)

त्याने इतकं अचानक हे सांगितलं की तिला त्यावर नक्की कसं रीएक्ट व्हायचं हे सुचलंच नाही….

 

वो तेरे पीछे पीछे आया है छू फोनवर म्हणाली होती ते आठवलं. पण एक मात्र नक्की, त्याचा राग नाही आला तिला….

आय नो, मैने ऐसे सब अचानक बोल दिया, तुम्हे समझ नही आ रहा होगा, अब जो मैं बोल रहा हू वो सच है या तुम दोतीन दिन जिस सुजयसे मिली, वो सच है बट ट्रस्ट मीलास्ट दोतीन दिन हमने जो बाते की, मैने जो भी कुछ शेअर किया तुम्हारे साथ, सब सच है…..मेरा प्रोफेशन, मेरे अँबिशन्स इन फॅक्ट मैं ऍज अ पर्सन सब कुछ तुम्हे जितना पता है, वैसा ही हैआज बस मैं ये बताना चाहता था की मैं यहा, कटनीमें तुमसे मिलने आया हूतुम्हे और जानने केलीये और प्लिज डोन्ट गेट मी रॉंगतुमसे एक बहोत अच्छा नाता जोडने….अगर तुम्हे ये सब पसंद नही है तो प्लिज मुझे बोल दो….मुझे बुरा तो लगेगा बट इफ यु डोन्ट विश टू मीट मी अगेन, मैं चला जाऊंगा….लेकिन इफ यु आर इंटरेस्टेड इन टेकिंग धिस फ्रेंडशिप अ स्टेप फरदर, इफ यु आर अल्सो इंटरेस्टेड इन नोइंग मी बेटर, मैं यहा कुछ दिन और रुक जाऊंगा……मैं और बस दसबारा दिन हू यहा…..अगर तुमने हाकहा तो यहा रहुंगा ,नही तो मेरे दोस्तो के साथ मध्य प्रदेश की हमारी ट्रिप कंटिन्यू करुंगा…..और प्लिजऐसे नही है के मैं शादी के लिये पूछ रहा हू तुम्हे. लेकिन हा, मेरा इरादा तो येही रहेगा की अगर कुछ दिन के बाद हम दोनोको ऐसे लगता है की वी आर मेड फॉर इच अदर, तो …….”

 

आय थिंक मुझे अब निकलना चाहिये….”

बऱ्याच वेळाने तिचा आवाज आला पण त्याचं बोलणं मधेच तोडूनती ह्या सगळ्यावर काहीतरी बोलेल अशी त्याची अपेक्षा होती. पण तिच्या चेहऱ्यावरील हावभावावरूनही त्याला काहीच अंदाज आला नाही. ती रागावली आहे का? नाही, पण असं वाटत नव्हतं अजिबात, खरं तर ती गालातल्या गालात मिश्किलपणे हसतेय की काय असंच पटकन वाटून गेलं त्याला….पण म्हणजे ती रागावली नव्हती तर मग तिला काहीतरी बोलायला काय हरकत होती? आपलं बोलणं असं मधेच तोडलं त्याचा अर्थ काय?

 

त्याचं बोलणं अर्धवट तोडून ती निघून गेली खरी….पण तो जे काही बोलला ते विसरणं एवढं सोपं नव्हतं. त्याचा मित्र वगैरे कोणीही इथे राहत नसल्याचा संशय तिला आधी आला नव्हता का? शाळा बघायला आल्याचं त्याने सांगितल्यावर तेही तिला विचित्र वाटलं होतंच कीखरं म्हणजे हा मुलगा काहीतरी कारण काढून आपल्याला भेटायचं निमित्त शोधतोय हाही विचार तिच्याही नकळत तिच्या मनात आला होताच की….पण तरीही आज त्याच्या तोंडून ते ऐकताना तिला ते सगळं नव्यानेच कळल्यासारखं का वाटलं होतं? आणि त्यात त्याची बोलण्याची पद्धत….चांगलीच तयारी केली होती त्याने हे सगळं बोलायचीखरं तर प्रॅक्टिस केली होतीआणि तो इतका पाठ केल्यासारखा ते बोलत होता की ते लगेच कळून येत होतंम्हणूनच त्याचं बोलणं होताहोता तिला पटकन हसूच आलं होतंतिने ते पटकन लपवण्याचा प्रयत्न केला खरा, पण कदाचित तिचं गालातल्या गालात हसणं त्याच्या लक्षात आलं होतं

 

त्या रात्री तिला झोपच लागली नाहीसारखं त्याचं बोलणं आठवत होतं, आत्तापर्यंत त्याच्याबरोबर मारलेल्या गप्पा, त्याच्याबरोबर घालवलेला वेळ, सगळं सगळं आठवत होतंतिलाही त्याच्याबरोबर वेळ घालवायला आवडत होताच. कदाचित आत्तापर्यंत एखाद्या मुलाशी इतकं मनमोकळं ती कधीच बोलली नव्हती म्हणून आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या वेळा भेटून गप्पा मारलेल्या सुजयविषयी मनात एक नाजूक कोपरा निर्माण झाला होता.

 

पण त्याच्या बोलण्यातला शादीहा शब्द आठवला आणि मग तिला कसंतरीच झालं. त्याच्याशी मैत्री वाढवायची ती त्याच्याशी लग्न करण्याच्या हेतूने? मग अम्माचं काय? पण मग उद्या तीच माझ्या मागे लागेल, लग्न करण्यासाठी किती दिवस पुढे ढकलणार मी? ते काही असूदेतपण अम्माला एकटीला सोडून मला लग्न करून कुठेही जायचं नाही….मग जर लग्नाचा विचारच नसेल तर त्या सुजयला पुन्हा पुन्हा का भेटत राहायचं? त्याला आशेवर का ठेवायचं? नकोच ते….आपण बरं आणि आपलं आयुष्य बरंआपल्याला अजून बाबूजींना दिलेलं प्रॉमिस पूर्ण करायचंयते होईलच म्हणा आताआणखी २३ दिवस फार तर ..पण नंतर काय करायचं? बाबूजींच्या इच्छेप्रमाणे शाळेत शिकवायचं की अम्माच्या इच्छेप्रमाणे एखाद्या कंपनीमध्ये जॉबसाठी अप्लाय करायचं? सगळंच ठरवायचंय….आणि ते जास्त महत्वाचं आहे …..उद्या सुजय भेटला की त्याला सांगून टाकूआपले मार्ग वेगळे आहेत म्हणून…..

 

(“सायले, एक विचारू? हे सगळं डोळ्यांसमोर आणताना सुजयबद्दल तुझं काय मत झालंय?”

 

हम्म….एक्सकॅटली हेच मी तुला विचारणार होते….बघ ना, आत्तापर्यंतच्या एकूण वर्णनातून तो असा फ्रॉड, मुलींना फसवणारा किंवा आणखी काही निगेटिव्ह शेड असणारा असा अजिबात पुढे येत नाहीये ना….एक साधा मुलगा, त्याला एका लग्नात ती मुलगी भेटली, त्याला ती आवडली, तिच्याशी मैत्री वाढवण्याच्या आणि पुढे दोघांनाही मान्य असेल तर तिच्याशी लग्न करण्याच्या हेतूने तो तिच्या मागे तिच्या गावात आलात्याला फसवायचं असतं तर त्याने तिला हे कधीच सांगितलं नसतं की तो तिच्याशी मैत्री करायला म्हणून आलायकदाचित स्वतःची ओळखही त्याने खोटी सांगितली असतीआणि बाकी कारण काहीच दिसत नाही, म्हणजे एखादी श्रीमंत मुलगी असेल तर कदाचित तिच्याकडून पैसे उकळण्यासाठी मैत्री केली असं म्हणू शकतो पण ही मुलगी इतकी सामान्य घरातली आहे, की असंही म्हणता येत नाही….”

 

हो ना, मी पण तोच विचार करतेयम्हणजे बघ हा, ही डायरी वाचायला घेतली तेव्हा मी सुजयच्या विरोधात होतेपण आता हे सगळं वर्णन ऐकताना मी त्याच्या बाजूने विचार करायला लागलेयम्हणजे एखादा मुव्ही बघताना कसं आपण हिरो आणि हिरॉईन च्या बाजूने विचार करतो की हे एकत्र येउदेत….तसं वाटतंय अगं मला, म्हणजे त्या मुलीची बाजूही अगदी कळतेयपण तरीही असं कुठेतरी वाटतंय की सुजयही किती मनापासून विचारतोय तिला, त्यांचे विचार जुळतायत तर त्यांनी पुढे गेलं पाहिजेनिदान मैत्री तरी आणखी वाढवायला हवी….मला गम्मत वाटतेय अगंआता मी सुजयच्या बाजूने विचार करतेय आणि तो मला खरंच जेनुइन मुलगा वाटतोय….सायले, खरंच तो इंनोसन्ट असेल आणि ह्या कटनीमध्ये जाऊन उगीचच कशाततरी अडकला असेल आणि कदाचित म्हणून आत्ता आपल्याशी खोटं बोलावं लागत असेल असं असेल का गं?”

 

डोन्ट जम्प टू कन्क्लुजन्स ईशीपुढचं वाचल्यावर मग कळेल …”

 

हो, होसांग….”)

———————————————–

बाबा, आईला काय झालंय नक्की?” अनिकेत

 

म्हणजे ? काय झालं ?” बाबांनी पेपरमधून डोकं काढत विचारलं..

 

सकाळपासून बघतोय….चिडचिड करतेय ती खूप….तुमची कामं तुम्हाला करता येत नाहीत कासगळ्यासाठी आई कशाला हवीयेअसं मला ओरडली मगाशी….आणि मी तर उलट आज सकाळी लवकर उठलोय, माझा चहा पण करून घेतला मीचमगाशी भीमाबाईंना पण उगीचच ओरडली…”

 

अरे बापरे म्हणजे माझ्याबद्दलच काहीतरी असणारमला म्हणाली होती अंघोळ आणि पूजा आटपून घ्या मग ते ग्रहमखाच्या सामानाची लिस्ट करायची आहे असं काहीतरीपण मी पेपर हातात घेतला आणि विसरलोउठावं लागणार आता…”

 

ते असेल कदाचितपण मला वाटतंय अजून काहीतरी कारण आहे….ती चिडली की बोलता बोलता सांगून पण टाकते तिच्या चिडण्याचं कारण आज काहीच कळत नाहीये…”

 

बघतो….” बाबा सोफ्यावरून उठत म्हणाले

आई आत बेडरूम मध्ये काहीतरी सामान काढून बसली होती.

वसू….काय करतेयस?” बाबा

 

मी काय करणार? फार तर फार घरातली कामंज्यांनी करायला हवं ते काहीच करत नाहीत…” आई

 

अगं हो….किती चीडशील? सॉरी आता जातो मी लगेच अंघोळीलाआणि मग आल्यावर लगेच आपण लिस्ट करायला घेऊग्रहमखाची करायची आहे ना?”

 

लग्न होणार आहे का पण नक्की ?”

आईचा तो प्रश्न आणि तिचा स्वर ऐकून बाबांना त्यावर काही बोलायची हिम्मतच झाली नाहीपण काहीतरी उत्तर तर द्यायला हवं होतं..

म्हणजे? असं काय विचारतेयस?”

 

स्पष्टच विचारतेय….काय चाललंय तुमचं आणि तुमच्या मुलीचं? मागचे काही दिवस मला शंका येतेयमी बोलूनही दाखवलं तसं तुम्हाला..पण तुम्ही काहीतरी सांगून मला गप्प केलंतपण आता बासमी मूर्ख वाटतेय का तुम्हाला? ”

 

वसूप्लिज असं काय बोलतेयस अगं? तुला माहित आहे, तू ह्या घरातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहेस ..तू शांत हो आधी किती चिडली आहेस….”

 

सगळ्यात महत्वाची व्यक्ती? घरातली सगळी कामं करायला पुढे असते म्हणून? ”

 

अगं असं नाहीये ….मी, मुलं आम्ही सगळे तू म्हणशील तसं वागतो नाआणि मनापासून तसं वागतो अगं..तू ठरवलेलं सगळं आपल्या घरासाठी परफेक्ट असतंत्या अर्थाने महत्वाची व्यक्ती म्हटलं मीतुझ्याशिवाय आमच्या कोणाचंही पानही हलत नाही ..”

 

म्हणून आजकाल माझ्या नकळत सगळं लपूनछपून चाललेलं असतं का तुमचं?”

ह्यावर बाबा काही बोलायला जाणार तेवढ्यात आईच पुढे म्हणाली,

इतके दिवस मी बोलतेय, विचारतेय तुम्हालाकी अहो, सायलीच्या लग्नाची तयारी करायला हवीएक आठवड्यावर लग्न आलंयतर तुम्ही काय म्हणालात दर वेळी ? अगं करतोच आहे, अगं करूया, मी करतोही ईशा, मला म्हणाली होती, सायली पुण्यात आहे तर आम्ही पुण्यात खरेदी करून घेऊ जमेल तेवढीकाल हात हलवत परत आल्यात दोघी पुण्याहून मला वाटलं होतं राहायला आली आहे म्हणजे निदान आता तरी त्यांची तयारी जोरात सुरु होईल निदान सायलीचे कपडे, तिची तयारीह्यात तरी त्या इंटरेस्ट दाखवतीलसकाळपासून दोघीजणी खोलीत आहेतबाहेर फिरकल्याही नाहीयेत….मी मगाशी गेले होते तर बाहेर आवाज येत होता त्यांचाकुठलीतरी डायरी वाचतायत….काय चाललंय हे सगळं? आणि तुमचं सुद्धा काहीही वेगळं चाललेलं नाहीयेमी तयारी, खरेदी हा विषय काढला की हो, हो आज करूया एवढंच म्हणता तुम्हीपण कोणीच काहीच करत नाहीयेएक आठवड्यावर लग्न आलेलं असताना आपली अजून तयारीही सुरु झालेली नाहीयेआणि सायलीला सुद्धा मी बघतेयलग्न ठरलेल्या मुलीसारखी अजिबात वागत नाहीये तीमैत्रिणींबरोबर हसणंखिदळणं नाही, सुजयबद्दल स्वतःहून काहीच बोलत नाही….काहीतरी विचारात असते, ईशाशी काहीतरी सारखं बोलणं चालू असतं पण ते पूर्वीसारखं मजामस्करीचं नसतं….काहीतरी चालू आहे नक्की….नक्की लग्न करायचं आहे ना सायलीचं ? नसेल करायचं तर मला तसं सांगा तरी, मी एकटीच वेड्यासारखी धावपळ तरी नाही करणार…”

बोलताबोलता आईच्या गळ्यातून एकदम हुंदका आला आणि डोळ्यातलं पाणी तिने पदराने पुसलं..

 

बाबांना फार वाईट वाटलंआईला शंका येत असणार हे त्यांनाही कळत होतं..त्यांना स्वतःला त्याबद्दल गिल्टी वाटत होतं पण सायली म्हणत होती तेसुद्धा अगदी खोटं नव्हतंआईला कळल्यावर ती नक्की स्वतः पुढे येऊन लग्न मोडणार आणि खरं काय ते शोधायची काही गरज नाही असं सायलीला सांगणारपण तरी तिच्यापासून हे सगळं लपवणं चुकीचंच होतंम्हणून तर काल त्यांनी सायलीलाही सांगून टाकलं होतं की फार तर दोन दिवसत्यानंतर आईला स्वतःहून सगळं सांगायचंय..पण आता मात्र आणखी एक क्षणही ते खोटं बोलू शकत नव्हते आईशी…..

तू शांत हो आधी ….मी सायलीला बोलावतोमग बोलू आपण ….”

—————————————————————–

आई, कशी आहेस आता? आणि अशी कशी पडलीस? पाय बरा आहे का आता?” सुजय

 

हो रे बाबा, बरी आहे मीथोडी सूज आहे पायाला ..चालता येत नाहीये पण होईल हळूहळू ….काळजी करू नकोसमाझ्यामुळे सगळ्यांना अडकायला झालंय रे पण काकाकाकू मला त्यांच्याकडे नेणार होते पण आता त्यांनाच इथे थांबायला लागणार आहे….”

 

हो गं ..मला कळतंय मी परत आलो असतो लगेच पण आत्ताच दोन दिवसांची रजा झालीये…”

 

नाही रे असूदेत….तू तुझं काम सांभाळ आधी…..”

 

हो….आई आणखी एक बोलायचं होतं जरा…”

 

बोल ना मग….”

 

आपल्या घरी ती सेल्सगर्ल आली होती ना, तीच जिला आत बोलवून तू पाणी वगैरे दिलंस….तिच्याबद्दल विचारायचं आहे…”

 

क्रमशः

One comment on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 39)

  1. Anagha
    July 31, 2017

    Goshht chhan aahe pan ek varshahhun adhik kaal dar pudhachya bhagachi waat baghavi lagat aahe…

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on July 13, 2017 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: