davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 40)

बाबांना फार वाईट वाटलं…आईला शंका येत असणार हे त्यांनाही कळत होतं..त्यांना स्वतःला त्याबद्दल गिल्टी वाटत होतं पण सायली म्हणत होती तेसुद्धा अगदी खोटं नव्हतं…आईला कळल्यावर ती नक्की स्वतः पुढे येऊन लग्न मोडणार आणि खरं काय ते शोधायची काही गरज नाही असं सायलीला सांगणार…पण तरी तिच्यापासून हे सगळं लपवणं चुकीचंच होतं…म्हणून तर काल त्यांनी सायलीलाही सांगून टाकलं होतं की फार तर दोन दिवस…त्यानंतर आईला स्वतःहून सगळं सांगायचंय..पण आता मात्र आणखी एक क्षणही ते खोटं बोलू शकत नव्हते आईशी…..

“तू शांत हो आधी ….मी सायलीला बोलावतो…मग बोलू आपण ….”

—————————————————————–

“आई, कशी आहेस आता? आणि अशी कशी पडलीस? पाय बरा आहे का आता?” सुजय

“हो रे बाबा, बरी आहे मी…थोडी सूज आहे पायाला ..चालता येत नाहीये पण होईल हळूहळू ….काळजी करू नकोस…माझ्यामुळे सगळ्यांना अडकायला झालंय रे पण …काका-काकू मला त्यांच्याकडे नेणार होते पण आता त्यांनाच इथे थांबायला लागणार आहे….”

“हो….आई आणखी एक बोलायचं होतं जरा…”

“बोल ना मग….”

“आपल्या घरी ती सेल्सगर्ल आली होती ना, तीच जिला आत बोलवून तू पाणी वगैरे दिलंस….तिच्याबद्दल विचारायचं आहे…”

************************* भाग 39 पासून पुढे  *********************

भाग ३९ येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-Z5

 

हे जे काही तू बोलतेयस ना सायली, ते विचित्र आहे फार….” आई

 

मलाही पटलं नव्हतं खरं तरपण आता वाटतंय सायली जसं सांगतेय तसंच सगळं झालेलं असणारत्या सिद्धार्थला पण तिथे जाऊन तोच अनुभव आला….” बाबा

 

बरं ठीक आहेतुमची सगळ्यांची खात्री आहे ना? ठीक आहेपण मग इतक्या दिवसात मला हे सांगावंसं नाही वाटलं का सायली तुला? आणि तुम्हालाही मला हे माहित असायला हवं असं नाही वाटलं ना? ” आई बाबांकडे वळून म्हणाली.

 

वसू, असं खरंच नाहीये गंमी दोन दिवसांनी सांगणारच होतो तुला..सायलीला मी कालच तसं सांगून आलो होतो..” बाबा

 

आई, खरंच सांगणार होतो….तुला हे सगळं कळल्यावर तू पॅनिक होशील असं वाटलं, म्हणून असा विचार केला होता की सिद्धार्थला तिथे जे काही कळेल ते कळल्यावर मग सगळंच तुला सांगता येईल….” सायली

 

सिद्धार्थला तिकडे काय कळलं, ह्यापेक्षा तुझ्या लग्नाच्या बाबतीतलं सगळं मला कळणं महत्वाचं आहे सायलीतुम्हाला सगळ्यांना दिसत होतं ना, कळत होतं ना की मी लग्नाची सगळी तयारी सुरु केली आहे, तरी सांगावंसं नाही वाटलं कोणालाही ? आज मी सरळपणे विचारलं म्हणून मला कळलं, नाहीतर काय माहित उद्या लग्न लावायला गुरुजी घरी आल्यानंतरही कळलं असतं…”

 

आई तू प्लिज शांत हो ना, आणि असं नको ना म्हणूस….”

 

अगं काय शांत होऊ सायलीखेळ वाटला का हा तुला? आणि तुमच्या बाबतीत केलंय का गं आम्ही असं? घरातले सगळे निर्णय तुमच्याबरोबर बसून घेतो आम्ही….तुला हे सगळ्यांबरोबर बसून बोलावसं नाही वाटलं? ”

 

आई, मी तरी कधी काही लपवलंय का तुमच्यापासून? आत्तापर्यंत सगळं तर तुम्हाला सांगून, विचारून करत आलेय नामग ही एवढी मोठी गोष्ट नाही सांगितली ह्याला काहीतरी कारण असेल ना? प्लिज समजून घे नाआणि प्लिज बाबांना ह्यात ओढू नकोसत्यांना सुद्धा सुरुवातीपासून काहीच माहित नव्हतंआत्ता काही दिवसांपूर्वी, मी पुण्याला जायच्या आधी कळलंय त्यांना..आणि ते मला खूप वेळा सांगत होते तुला सांगण्याबद्दल..पण खरंच सांगते, तुला कळल्यावर तू पॅनिक होशील असं वाटलं मला, म्हणून सगळं खरं काय ते कळल्यावर तुझ्या शेजारी बसून नीट सांगणार होतो तुला….”

ह्यावर आई थोडा वेळ काहीच बोलली नाही.

सायलीने थोडंसं अस्वस्थ होत बाबांकडे बघितलं. बाबांच्या चेहऱ्यावरही प्रश्नचिन्हच होतं.

आईकाहीतरी बोल ना अगं….”

 

काय बोलू सायली अगं? मला किती मोठा धक्का बसलाय तुला अंदाज नाहीये. आत्ता एक तासापूर्वी सुद्धा मी फोनवर माझ्या मैत्रिणीशी तुझ्या लग्नाबद्दलच बोलत होते, म्हटलं, घरच्या घरी करणार असलो तरी सगळ्यांना कळवायला हवंच. तुझं लग्न ठरल्यापासून डोक्यात सतत हेच विचार….ही कामं राहिली आहेत, ही खरेदी करायची आहे, या याद्या करायच्यात, ह्या ह्या लोकांना कळवायला हवंतू आता लग्न करून लांब जाणार म्हणून हुरहूर, तुझ्या लहानपणच्या कितीतरी आठवणीतुझ्या बाबांच्या नकळत रात्ररात्रभर रडले पण ह्या सगळ्या विचारांनी….आणि आज माझ्या मुलीचं लग्न तिची काहीही चूक नसताना अशा कारणासाठी मोडतंय हे ऐकून मला काय वाटतंय हे तुला नाही कळणार सायली….आणि त्यात माझ्या घरात अगदी मोकळं वातावरण आहे, माझी मुलं मनात जे येईल ते सगळं मला येऊन सांगतात‘, हा माझा समजसुद्धा आज खोटा ठरलाय…”

आईचं बोलणं ऐकून सायलीलासुद्धा फार वाईट वाटलं. खरंच आईला आपण गृहीत धरलं का? तिला वाईट वाटेल म्हणून आपण तिला आधी सांगितलं नाही पण तरीही आत्तासुद्धा ती दुखावली गेलीच आहे. नकळत तिचे डोळे भरून आले.

आई, प्लिज असं नको ना म्हणूस माझ्याबद्दल खाली बसत आईच्या मांडीवर ती डोकं ठेवत म्हणाली….

 

वसू, रागावू नकोस गं..खरंच आमच्या कोणाच्याही डोक्यात असं काही नव्हतं. सुजयबद्दल सगळं काही खरं कळायची आम्ही वाट बघत होतो, उगीच असलं विचित्र काहीतरी अर्धवट तुला सांगण्यापेक्षा सगळं कळलं की आधी तुलाच सांगणार होतो, तुझी तयारी सुरु आहे हे दिसत होतं पण तरी नाईलाज होता गं….”

 

कळलं…..असूदेत ….”आई त्यांच्याकडे बघत एका हाताने खूण करत म्हणाली.

पण मग आता ठरलंय ना, लग्न करायचं नाहीये ते? मग ही सगळी उठाठेव कशाला? सांगून टाका सुजयच्या घरी की आम्हाला लग्न करायचं नाही म्हणून…”

सायलीने एक आवंढा गिळत बाबांकडे बघितलं. पुढे आई काय बोलणार हे त्या दोघांनाही माहित होतं. पण तरीही एक प्रयत्न तर करायलाच हवा होता.

अगं लग्न नाहीच करायचंयपण म्हणून खरं काय ते शोधून काढायचं नाही असं थोडंच आहे? तो सुजय खरा कोण आहे, कुठे राहतो, आणि मुख्य म्हणजे त्याने स्वतःची माहिती लपवून सायलीशी लग्न करण्याचा प्रयत्न का केला, हे सगळं तर कळायला हवं ना?”

 

अहो, पण गरज काय आहे ह्या सगळ्याची? आपला आणि त्याचा संबंध त्याचं सायलीशी लग्न ठरलं म्हणून आला होता नामग आता लग्न करणार नाही म्हटलं की झालंत्याच्याबद्दल आणखी शोधून काढून काय होणार आहे ? आणि तसंही आत्ता त्याच्याबद्दल जे काही कळलंय ते फार विचित्र आहे, खरं तर घाबरवून टाकणारं आहे..आणि अशा मुलाशी आपला आणि मुख्य म्हणजे सायलीचा काहीही संबंध असायला नको….ह्या सगळ्यापासून शक्य तेवढ्या लांब राहिलं पाहिजे….”

 

आई, पण तुला हे आपल्याला कळावं असं वाटत नाही का, की तो कोणत्या हेतूने हे सगळं करत होता, ‘तीबाई कोण आहे, कटनीला नक्की काय झालं असेल? बरेच प्रश्न आहेत त्याची उत्तरं मिळाल्याशिवाय असंच बॅकआऊट करणं बरोबर नाही ना….” सायलीने एक प्रयत्न करून बघितला.

 

काय बरोबर आणि काय चूक हे मला माहित नाही सायली, पण तू ह्या सगळ्यात पडायचं नाहीयेसकळलं?”

 

वसू..प्लिज ..अगं सिद्धार्थ कदाचित फार जवळ पोहोचलाय ह्या सगळ्याच्याआणि सायली त्या सुजयला भेटतही नाहीये घरात बसून आपल्या समोर ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा होणार असेल तर काय हरकत आहे?” बाबा

 

मला समजवायला जाऊ नका तुम्ही. ह्या सगळ्यात आपण पडायचं नाहीये आताआणि सायली, त्या सिद्धार्थला आत्ताच्या आत्ता तिथून परत यायला सांगतो मुलगा एकटा तिथे गेलाय, तिथे त्याला नक्की काय अनुभवायला मिळेल, कशी माणसं भेटतील ह्याचा काहीच अंदाज नाहीये कोणालाहीउद्या काही बरंवाईट झालं, तर स्वतःला कसं तोंड दाखवणार आपण ? त्याच्या घरच्यांना काय उत्तर देणार? ”

 

आईप्लिज…..”

 

वसूअगं…”

सायली आणि बाबा दोघेही एकत्रच बोलले….पण आई तिच्या म्हणण्यावर ठाम होती.

माझ्याशी बोलण्यात आता वेळ घालवू नकाअहो, आधी सुजयच्या घरी फोन करून कळवून टाका आपल्याला हे लग्न करायचं नाहीये म्हणून…”

आई खोलीच्या बाहेर गेली तसं सायली आणि बाबांनी हताशपणे एकमेकांकडे बघितलं. बाबा काही बोलायला जाणार तेवढ्यात आई खोलीत परत आली,

आणि संध्याकाळी चहाच्या वेळेपर्यंत तुम्ही त्यांना फोन केलेला नसेल तर मग मी करेन फोन…” आईने आता पर्यायच शिल्लक ठेवला नव्हता.

————————————–

काय करायचं आता?” ईशा

 

काहीच कळत नाहीयेआई एकदम ठाम होती तिच्या बोलण्यावर…”सायली

 

माई आजी, तू बोल ना मावशीशीती ऐकेल तुझं..” ईशा

 

पोरींनो, हे बरं आहे तुमचंम्हणजे आता हे सगळं मलाही माहित होतं असं कळलं की वासंती परत माझ्यावरही चिडणार…” माई आजी

 

काहीही काय माई आजी, तुझ्यावर कशी चिडेल मावशी? तू मोठी आहेस ना तुझं ऐकेल नातिची फक्त परवानगी मिळव हा सगळा शोध पूर्ण होईपर्यंत सुजयला काहीच न सांगण्यासाठीप्लिजप्लिज…”

तेवढ्यात बाबा माई आजीच्या खोलीत आले.

बाबा, काय झालं? आई ठीक आहे का? आय मिन, चिडली आहे का अजून?” सायली

 

शांतपणे बसून टीव्ही बघतेयतिच्या डोक्यात शंभर विचार चालू असणार आहेत नक्कीच, पण दाखवत नाहीये. रागावलीये का ते कळलं नाही, पण दुखावली गेल्यासारखी वाटतेयमी विचारलं तर म्हणाली इतके दिवस सायलीचं लग्न हाच विषय होता डोक्यातआता काय कामं करू काहीच सुचत नाहीये…..मलाही काही सुचत नाहीये आतामला वाटतं सायली, आपण नको ताणायला आताआधीच आईला न सांगितल्यामुळे ती नाराज आहे, त्यात तिचं न ऐकता आपण हे पुढे चालू ठेवलं तर ती काय करेल काहीच सांगता येणार नाहीतिच्या मनाविरुद्ध नको आता काहीआणि तसंही ती म्हणालीच आहे ना, संध्याकाळपर्यंत मी फोन केलेला नसेल तर ती स्वतः फोन करेल म्हणूनतसंही आपल्या हातात काहीच नाही आता…”

 

असं काय हो बाबा, एकदम असं उलटं काय बोलता तुम्ही….माई आजीतू बोल ना गं आईशीप्लिजआत्ता लगेच बोल…” सायली

 

अगो रागावली आहे हो ती….आणि हे जे सगळं कळलंय तिला ते काही साधं आहे का? अंधारातल्या सावल्याच ह्याकोणती आई आपल्या मुलीला ह्या अशा गोष्टींच्या मागे लागू देईल? काळजी वाटतेय हो तिला…”

 

यु टू माई आजी ? आता तू पण पार्टी बदलतेयस ना…” ईशा

 

तसं नाही गो पोरी…..ती आत्ता रागावली आहे, हे सगळं ऐकून घाबरली आहे, तिला काळजी वाटतेयमुलीचं ठरलेलं लग्न मोडणार, लोकं प्रश्न विचारणार,…आणि सगळ्यात जास्तसायलीला ह्यातून काही धोका असू नये ह्यासाठी आई म्हणून ती विचार आणि कृती करणारहे इतके सगळे विचार असणार आत्ता एका वेळी तिच्या डोक्यातपण कदाचित आणखी काही वेळ जाऊ दिला ना, की थोडी शांत होईल हो ती….डोक्यातले विचार चालूच असतील पण काहीतरी वेगळं ऐकायला, त्याच्यावर विचार करायला तयार होईल हो ती….आत्ता लगेच जाऊच नको तिच्यासमोर….दुपारची जेवणं झाली की ती आत जरा पडायला म्हणून जाईल ना, तेव्हा जा सायली तू…”

 

मी? ” सायली

 

होय गोतूच जायला हवंसअगो मुलगी ना तू तिचीतूच समजावू शकशील हो तिला….”

 

बरं जाईन मी …”

 

माईंच्या बोलण्याने माझ्याही होप्स वाढल्यात….बोल सायली तू आईशी…” बाबा

 

कॉफी घेणार आहे का कोणी? पण मी नाही करणार हा, सायले तू करमला तर मावशीचीच भीती वाटतेय आतामी नाही बाहेर येणार…”

 

हो आणते….आईला खरं तर जास्त गरज आहे कॉफीची….सगळ्यांसाठीच करते….आलेच…”

 

आणि सायले, आल्यावर आपलं अर्धवट राहिलेलं डायरी वाचन स्टोरी फॉर्म मधलं ते करू….”

 

हो चालेल…”

सायली कॉफी करण्यासाठी म्हणून बाहेर गेली. बाबासुद्धा तिथून बाहेर गेले. माई आजीच्या बोलण्यामुळे सगळ्यांनाच थोडी आशा वाटत होतीथोडा ताण कमी झाल्यासारखा वाटत होता.

—————————————

———————————————

रात्री झोपताना ठामपणे ठरवलेला विचार मात्र सकाळपर्यंत पूर्णपणे विरघळून गेला होता. मान्य आहे, लग्नासाठी आपल्याला त्याला अडकवायचं नाहीयेआपण करूसुद्धा पुढे कधीतरी लग्नपण आत्ता तरी अम्माला सोडून कुठेच जायचं नाही ते ठरलंय ना आपलं….ते सांगूच आपण त्याला….पण एक मित्र म्हणून त्याच्याशी आणखी मैत्री वाढवायला काय हरकत आहे? तो खोटा असला असता तर त्याने हे सांगितलंच नसतं की त्याला आपण आवडलो म्हणून तो इथे आला….

 

दुसऱ्या दिवसापासून ते पुन्हा भेटायला लागले. अम्माला यायलाही काही दिवस होते आणि छू सुद्धा चारपाच दिवसांनी येणार होती. तिच्या जगात या दोघींशिवाय तिसरं कुणी नसायचंच फारसं….वेळ मिळेल तेव्हा सकाळी ती शाळेत जायची, कधीतरी लायब्ररीमध्ये…. आणि मग नंतरचा सगळा वेळ रिकामाच असायचातो वेळ आता सुजयबरोबर जायला लागला….पुढच्या दोनतीन दिवसातच तिला त्याच्याबरोबर फिरायला जाण्याची, गप्पा मारण्याची, सगळं काही शेअर करण्याची सवयच लागली. या तीन दिवसात त्यांनी कटनीच्या आजूबाजूची आणखी काही ठिकाणं पालथी घातली. त्याच्याबद्दल आपल्याला नक्की काय वाटतंय हे तिला आता आणखी स्पष्ट होत होतं पण ते स्वीकारणं अवघड होतं. दिवसभर त्याच्याबरोबर फिरून, गप्पा मारून, एकमेकांबद्दल त्यांच्या लहानपणापासून आजपर्यंतच्या आयुष्याबद्दल, फॅमिलीपासून ते मित्रमैत्रिणींपर्यंत सगळं काही बोलून झालं तरीही तिच्याकडे त्याला सांगण्यासारखं बरंच काही राहिलेलं असायचं….त्याच्या मनातलं सगळं ती समजून घेऊ शकत होतीआणि आजपर्यंत तिला समजून घेणारं त्याच्यापेक्षा समंजस माणूस तिला भेटलेलं नव्हतं. प्रत्येक दिवशी रात्री ती स्वतःला विचारायची….काय चाललंय आपल्या मनात नक्की? गेल्या काही दिवसात एखाद्या माणसाला आपण इतक्या जवळून ओळखायला लागलोयउद्या तो निघून जाईल तेव्हा काय होईल मग? राहू शकणार आहोत का आपण त्याला न भेटता?

 

एकदा सकाळपासूनच खूप पाऊस लागला होता. एकूण दिवसभर पाऊस थांबेल अशी चिन्हं दिसत नव्हती. मागच्या दोनतीन दिवसांप्रमाणे आजही सुजय शाळेजवळ तिला भेटायला आला. आज गावाच्या टेकडीपाशी असलेली एक छानशी नदी ती त्याला दाखवणार होती. नदीजवळ एक छान मंदिर सुद्धा होतं. पण पावसाची चिन्हं असल्यामुळे काय करावं हे कळत नव्हतं. थोडा विचार करून कोमलनेच मग कुठे जायचं ते ठरवलं. सुजयच्या सहवासाची आता इतकी सवय झाली होती की आजचा दिवस आपण घरी एकटीने बसून कंटाळवाणेपणाने घालवायचा हा विचारच तिला सहन होत नव्हता.

 

त्या ठिकाणी आल्यावर सुजयला लगेचच लक्षात आलं.

अरेच्चा, दोनतीन दिवसांपूर्वीच इथे येऊन गेलो की आपणहे मैदानाच्या समोर विष्णूवराह मंदिर परवा कोमलला इथेच सांगितलं ना आपण आपल्या मनातलं सगळं इथे खरं कशासाठी आलोय वगैरे….पण मग आता पुन्हा इथेच कसंकाय….?”

समोरची गेटवरची पाटी नजरेसमोर आली तसं त्याच्या मनातले विचार अर्धवटच राहिले…”प्रजापती निवास “…

(“सायले, प्रजापती निवास..? ह्याचा रेफरन्स आला तर …”

“हम्म…”)

ये किसका घर हैप्रजापती निवास ?”

 

वैसे तो हमाराही है….”

बोलताबोलता कोमलने त्याच्याकडे पाहिलं आणि तिचं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव बघून तिला एकदम लाजल्यासारखंच झालं..

हमारा ….मतलब मेरा और अम्माका घर तिने स्पष्ट केलं.

 

तो हम लोग तो आये थे ना उस दिन यहावो मंदिर भी गये थे….तो उस दिन तो तुमने कुछ नही कहाआय मिन देखा भी नही इस तरफ…..” त्याला आता आणखी प्रश्न पडत होते.

 

वो क्योंकी मुझे ये जगह इतनी पसंद नही है …..लेकिन आज बारिश हो रही है और कहा जा भी नही सकतेतो सोचा यहा आयेंगेवापस विष्णूजी की मंदिर भी होके आयेंगे बारिश रुकेगी तब…”

 

और तुम्हारा सरनेम तो व्यास है ना….तो ये प्रजापती निवास…..?” आपण कदाचित जरा जास्तच प्रश्न विचारतोय हे जाणवून तो लगेचच पुढे म्हणाला, “सॉरीआय मिनमैने ऐसेही एकदमसे पूछ लिया….”

 

नही, इट्स ओके….मैने बताया ना तुम्हे, मेरी अम्मा मामाजी के घर गयी है, तो उनका सरनेम है प्रजापती. मतलब मेरी अम्मा का शादी के पहेले का सरनेमये घर है वो मेरी नानाजी ने बनाया था उनके बच्चोके लिये..मतलब मेरी अम्मा और मामाजी के लियेलेकिन नानाजीके जानेके बाद मेरी मामीजी इस पुरे घर पे कब्जा करना चाहती थीमामाजी मेरी अम्माके साथ थे….वैसे तो एक घर में दो फॅमिलीज नही रह सकतीलेकिन अम्माको इस घर का आधा हिस्सा चाहिये था….मतलब मार्केट प्राईस का आधा हिस्सा..मुझे और अच्छा पढानेकेलीयेमुझे विदेश भेजना चाहती थी वो लेकिन पैसेही नही जमा हो पायेऔर ये घर ….मामीने मामाजी और मेरी अम्माको दूर करनेकेलीये दुसरे शहर में घर बसायाअम्माने पैसो के लिये बहोत बार कोशिश की मामीसे बात करनेकीलेकिन मामीजी बस यही केहेती रही की आधा हिस्सा चाहिये तो कोर्टमें जाओ, वकील से बात करो अब मामी कैसी भी हो, मामाजी और अम्माके बीच बडा गेहेरा रिश्ता हैअम्मा वैसे तो बहोत प्रॅक्टिकल हैमामी की जगह और कोई होती तो वो अपना हक कभी नही छोडतीलेकिन खुदके भाईके खिलाफ कोर्टमें जाना तो ठीक नही था….तो तबसे इस घरका मॅटर वैसाही पडा हैना तो ये घर मामाजी को नसीब हुआ नाही हमें….”

 

ओकेतो मतलब मामाजी का सरनेम प्रजापती है?”

 

हामतलब अम्मा का भी शादी के पहेले का….”

 

या….ऑफकोर्स…..”

 

ये सब की वजह से मेरा कभी मन नही करता यहा आनेका…..अब वैसे तो इस घर को थोडा नया बनानेकी जरुरत हैएक तो यहा कोई होता नही हैतो ठीक से मेंटेनभी नही हो पाता हैपडोसीभी छोडके चले गये है..”

त्या घराबद्दल, अम्माबद्दल, मामाजींबद्दल सांगताना दोन तास सहज निघून गेले.

अब हमें निकलना चाहियेमंदिर जाके फिर वापस लौट जायेंगे….”

 

हा….चलते हैवैसे वो अंदर जो कमरा है, वहा क्या है?” सुजय

 

वहा….तो वैसे कुछ भी नही है…..बस कुछ पुराना समान….मतलब देखने जैसा….” पण तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच तो त्या खोलीत जाऊन पोहोचला होता

ती म्हणाली ते खरंच होतं. ह्या खोलीत तसं काहीच सामान नव्हतं. पण खोलीत एक प्रकारचा ताजा वास होता….संपूर्ण घरात प्रत्येक खोलीत धुळकटलेला वास भरून राहिला होता. अर्थात कचरा, माती कुठेच दिसत नव्हतीतसं आजूबाजूला फारशी रहदारी नव्हती, वस्ती नव्हती त्यामुळेही घरात फारशी धूळ येत नसेल कदाचितपण तरी वापरात नसलेल्या वस्तूंना एक प्रकारचा ठेवणीतला वास असतोच. तसा वास येतच होता घरात प्रत्येक ठिकाणीफक्त ह्या खोलीत मात्र तसं नव्हतं. जणू काही येणंजाणं असावं कोणाचंतरी….

क्या हुआ? तुम यहा क्यो आये? निकलना है ना?” मागून तिचा आवाज आला.

 

हाऐसेहीपुरा घर देखाबस ये कमरा रह गयातो इसलिये….वैसे ….ये कमरा थोडा अलगसा है ना? जैसे रेग्युलर युज मैं है ऐसे लगता है….”

ह्यावर ती काहीच बोलली नाही. पुढे जाऊन त्याने खोलीची खिडकी उघडली. समोरचं दृश्य फारच सुंदर होतं. घराच्या मागच्या बाजूला सगळी हिरवळच हिरवळ होती आणि स्वच्छ निळं आकाशसमोर एक छोटी टेकडी होती. तिथे छान टुमदार घरं होतीचित्रातल्या पुस्तकात बघतो तशी….घराबाहेर छोटी मुलं खेळत होती….पावसाने जरासा विसावा घेतला तशी ती बाहेर आलेली होती ….त्यांच्या हसण्याखिदळण्याचा आवाज इथपर्यंत येत होता……अगदी जिवंत दृश्य

कितना फ्रेश लग रहा है यहा….”

 

हम लोग निकले अब? बारिश फिरसे सुरू होगी तो अंधेरा भी जल्दी होगा….”

पण त्याचं लक्षच नव्हतं. तो मनाशी काहीतरी विचार करत होता असं वाटत होतं.

सुजय…..”

 

कोमल, एक बात केहेनी है…..वैसे तो सुबहसे केहेना चाहता था लेकिन व्हेदर इतना खराब और बोरिंग था, एकदम डलतो कुछ बतानेका मन नही हुआ लेकिन अब यहा आके, एकदम फ्रेश लग रहा हैबाहर देखोकितने खुश है ना सब लोग….बच्चे खेल रहे हैसब ग्रीन ग्रीन दिख रहा है….तो एकदम सब कुछ केहेनेका मन हुआ….”

 

हम जाते जाते बात कर सकते है….”

 

प्लिजऔर बसटेन मिनिट्स…..”

 

ओकेक्या केहेना है?”

 

तुमसे वोही बात फिरसे करनी हैमुझे पता हैतुमने कहा की तुम तुम्हारी अम्माको छोडकर नही जाना चाहती और इसलिये तुम अभी शादीके बारेमें नही सोच सकती….लेकिन क्या तुमएक मिनिटके लिये ये अम्माको छोडके जानेवाली बात भूलकर सिर्फ तुम्हारे शादीके बारेमें नही सोच सकती?”

 

ऐसे कैसे हो सकता है सुजय? जब मैं मेरे शादी के बारेमें सोचुंगी तब अम्माकी बात तो आयेगी ना….”

 

आय नो….मैने कहा की जस्ट इमॅजिन की अम्माको छोडके जानेवाला प्रॉब्लेम है ही नहीतो क्या तुम शादी करती मुझसे?”

तो पुन्हा एकदा तिला लग्नाबद्दल विचारत होता आणि यावेळी डायरेक्ट लग्नाबद्दल….तिने पटकन त्याच्याकडे पाठ फिरवली. त्याच्याशी लग्न करण्याचा विषय निघाल्यावर लाजेने चूर झालेला तिचा चेहरा तिला त्याला दिसू द्यायचा नव्हता….तिने मनाशी पक्कं ठरवलं होतं खरं तर की लग्नाचा विषयच आत्ता डोक्यात आणायचा नाहीपण तरीही त्याने इतक्या अनपेक्षितपणे हा प्रश्न विचारला होता की तिच्या मनाने खरंच लग्नाचं ते सुंदर चित्र आणलंच डोळ्यांसमोरत्याच्या प्रश्नाचं उत्तर ती देणार तर नव्हतीपण म्हणून स्वतःच्या मनाशी का खोटं बोलायचं? ज्याच्याशी इतकं शतजन्माचं नातं असल्यासारखं वाटतं त्याच्याशिवाय आणखी कोण असणार परफेक्ट मुलगा?

मॅडम ….प्लिज ये पझल सॉल्व्ह करदो….”

त्याच्या आवाजाने ती तिच्या विचारातून बाहेर आली. मागे वळून बघितलं तर तो मगाशी उभा होता तिथे नव्हताचसमोरच्या भिंतीवर काहीतरी लिहीत होता, अगदी वरच्या कोपऱ्यात. खोलीतल्या दोन खुर्च्या त्याने एकावर एक ठेवल्या होत्या आणि त्यावर चढून खोलीतच पडलेल्या एका विटेच्या तुकड्याने तो काहीतरी लिहीत होता….

 

सुजय वेड्सअसं लिहून तो थांबलातिच्याकडे मागे वळून बघितलं. तिने मानेनेच नाहीअसं म्हटल्यावर त्याने एक खिन्न असं स्माईल दिलं आणि त्यापुढे एका मुलीचा चेहरा काढला.

(“ओह …हे स्वतः सुजयनेच लिहिलं होतं तर…” ईशा )

काश तुम्हारा नाम लिख सकता,…लेकिन तुम्हारे परमिशनके बिना नही …” बोलतबोलतच तो खाली उतरला.

 

सॉरी आय मिन….यु नो माय आन्सर….अम्माको बाजूमे रखके ऐसे कोई भी डिसिजन मैं नही ले सकती….”

 

आय अंडरस्टॅंडलेकिन जो मैं बताना चाहता था वो येही है….पहेले तुम तुम्हारी लाईफ का डिसिजन लेलोइफ युअर आन्सर इज येसतो फिर तुम्हारी ये जो परेशानी है वो हमारी परेशानी हो गयी ना हम लोग कोई ना कोई सोल्युशन ढुंढेंगे की अम्मा और तुम दूर नही जाओगी…..लेट मी टेल यु फ्रँकलीमैनेही कहा था की कुछ दिन रेहेके दोस्ती करनी है और फिर शादी के बारेमें डिसिजन लेना हैबट आय हॅव्ह टेकन माय डिसिजन नाऊमुझे तुमसे शादी करनी है और ये दोस्ती वगैरा…….आय मिन …. मैं और नही झूट बोलना चाहता….लेकिन अगर अब भी तुम्हे ऐसे लगता है की तुम शादी के लिये रेडी नही होतो फिर….मैं निकल जाऊंगा यहासे….कुछ दिन और यहा रेहेके भी क्या करना है फिर?”

 

मैं क्या कहू …..आय जस्ट डोन्ट अंडरस्टॅंड…..अम्मा और छू को छोडके आज तक कभी भी कोई इम्पॉर्टन्ट डिसिजन नही लिया मैनेऔर इतना बडा डिसिजन वो दोनो यहा नही है तब कैसे ले सकती हू?”

दोन मिनिटं खोलीत ऑकवर्ड अशी शांतता होतीशेवटी तीच पुढे म्हणाली,

निकले अब? मंदिर जाते है और फिर वापस…”

 

हा….मैं यहा और दसपंधरा मिनट्स बैठू, इफ यु डोन्ट माईंड? काफी फ्रेश लग रहा है यहा….”

 

ओकेमैं मंदिर जाती हू फिर ….वो विंडो बस बंद करनी है और घर का लॉक बाहर के कमरे मैं हैवो लगा लेनाबादमे मंदिर आओफिर जाते है….”

 

ओके…” तो खिडकीच्या बाहेर बघत म्हणाला.

तिचा लग्नाचा विचार नाही हे कळल्यावर त्याचा मूड अगदीच गेला होता, तिला कळत होतंपण काय करणार?

 

ती तिथून गेल्यावर पाचेक मिनिट्स तो तिथेच बसून होता. काही वेळापूर्वी त्यानेच वर भिंतीवर लिहिलं होतं, त्याकडे त्याचं लक्ष गेलंदुसऱ्याच्या घरात हे असं काहीतरी लिहिणं पण बरोबर नव्हतंपण आता उठून ते पुसायलाही त्याला कंटाळा आला होता,…आणि पुसणार तरी कशाने? तो आज त्याचा रुमालही विसरला होता..आणि ह्या घरात काय मिळणार पुसायला? नकळत त्याची नजर खोलीभर फिरू लागली….समोरच्या टेबलाला दोन ड्रॉव्हर्सच्या खाली एक खण होता, त्याचं दारही तुटलेलं होतं. आधी त्याने ड्रॉव्हर्स बघितले, त्यात काहीही नव्हतंमग खणात काय आहे हे बघण्यासाठी तो खाली गुडघ्यावर वाकून बसलाआत कशालातरी एक कापड गुंडाळलेलं दिसत होतं….हे कापडच काढून घेऊ आणि मग नीट झटकून पुन्हा लावून ठेवू..नाहीतरी ठेवणीतलंच दिसत होतंआत हात घालून त्याने ती वस्तू बाहेर काढली आणि मग त्यावरचं कापडसुद्धा…..

——————————————–

देवळाच्या दिशेने चालताना तिच्या डोक्यात त्याचेच विचार घोळत होते, तो आत्ता जे काही म्हणाला होता त्याचे….त्याचं म्हणणं कुठेतरी पटत होतं तिलातिचे बाबुजीही म्हणायचे….कुठल्याश्या विचारात ती सापडलेली दिसली की म्हणायचे, ऐसे उल्झनमे मत रेहेना कभी….जो डिसिजन लेना है ले लो ….बाकी सारे जवाब अपने आप मिल जाते है….सुजय आज असंच काहीसं म्हणाला होतापण म्हणून असं एकदम लग्नाचं ठरवून टाकायचं? काय हरकत आहे पण? कायमचं लग्न न करता राहायचं असं थोडंच ठरवलंय आपण? जेव्हा लग्न करू तेव्हा अम्माबद्दल, ती एकटी कशी राहणार नाही ह्याबद्दल विचार करावाच लागणार आहे….छूच्या घरचेसुद्धा आता वर्षभरात तिचं लग्न करतीलच….आणि सुजय आत्ता जे म्हणाला ते तर सगळ्यात महत्वाचं आहेतो उद्याच्या उद्याच कदाचित निघून जाईलआपल्याला परत भेटणारही नाही ….चालेल आपल्याला? तो आता आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय….

 

देवळात जाऊन शांतपणे दहा मिनिटं बसल्यावर विचारांना एक दिशा मिळालीआता ती तिच्या अम्मासारखा विचार करत होती, प्रॅक्टिकल….तिने ठरवलं, सुजय आपल्याला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून आवडलाय तर पुढे जायला काहीच हरकत नाही, पण त्याला काहीही सांगायच्या आधी अम्माशी बोलायला हवंत्याला सांगूया आणखी काही दिवस फक्तअम्मा परत आली की लगेच तिच्याशी बोलूआजच फोन करून तिला लवकर परत यायला सांगायला हवं….सुजय इथे असेपर्यंत आली तर भेट होईल त्यांचीही….

 

स्वतःचा ठाम विचार झाल्यावर तिलाही बरं वाटलंआता सुजय आल्यावर त्याला सांगूया हे….मगाशी एवढंसं तोंड करून बसला होताआता कळी खुलेल त्याची….पण अजून आला कसा नाही? जाऊदेआपणच जाऊयानिघाला असेल तर वाटेत भेटेलच….

 

पुन्हा एकदा गाभाऱ्याच्या दिशेने नमस्कार करत ती उठली आणि मग पळतच प्रजापती निवास च्या दिशेने निघाली….कधी एकदा हे सुजयला सांगते असं तिला झालं होतं

——————————————

———————————————

सुजय अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. सायलीचा फोटो त्याने आईला पाठवून तिच्याकडून कन्फर्म करून घेतलं होतं की हीच मुलगी आपल्या घरी आली होतीपण आता त्याला प्रचंड अस्वस्थ वाटत होतं….हजार प्रश्न पडले होते ते तर वेगळेच….सायली आपल्या घरापर्यंत जाऊन कशी पोहोचली? आईला तिने योगिताबद्दल आणि माझ्याबद्दल विचारलं म्हणजे माझ्याबद्दल सगळंच तिला माहिती असावं….सगळंच म्हणजे नक्की काय? नक्की काय माहित करून घ्यायला आली होती ती आपल्याबद्दल? आईकडून तिला फारसं काही कळलेलं नसेलच, कारण आईलाच तेवढी माहिती नाहीपण तरीही सायलीला नक्की काय माहित असेल माझ्याबद्दल? माझ्यापासून लपवून ती माझ्या घरी गेली म्हणजेच तिला माझा संशय आलेला असणार किंवा अशी काहीतरी माहिती मिळाली असेल जिची खात्री करून घ्यायला ती गेली असेल….पण अशी माहिती कोण देणार तिला? योगिता? छे….वाटत नाही असं….

 

पण मग सगळ्यात महत्वाचंजर सायलीला संशय आलाय तर ती लग्न का करतेय? मला सरळ प्रश्न का विचारत नाहीये? पुण्याहून येताना तिचं आणि ईशाचं एकूण वागणं, हावभाव सगळं विचित्र संशयास्पद वाटलं होतंआणि आधीसुद्धा आपल्या मनात हा विचार येऊन गेला होताच ना, की लग्न ठरलं असूनसुद्धा सायली स्वतःहून फार वेळा फोन करत नाही किंवा फार फॉर्मल, तुटक बोलते….पण तेव्हा आपणच असा विचार केला की आधीच्या मुलींना जे अनुभव आले ते सायलीला येऊन माझ्याबद्दल संशय येऊ नये, म्हणून आपणच फार वेळा तिला भेटण्याचं टाळलं, मग ती तरी कशी एकदम मोकळेपणाने बोलेल..थोडा वेळ लागेलच तिला….पण म्हणजे हे कारण नसेल का तिच्या तुटक वागण्याचंजेवढ्यास तेव्हढं बोलण्याचं? नक्की काय चाललंय तिच्या मनात ? आणि आधीच्या मुलींना जे अनुभव आले ते तिला आले असतील का?

 

प्रश्न खूप होते आणि उत्तरं कशाचीच नव्हती….विचार करून करून तो थकला तसा त्याचा डोळा लागला आणि तो सोफ्यावरच आडवा झाला…..

 

क्रमशः

5 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 40)

 1. Anonymous
  September 5, 2017

  Rutu,
  1 month completed. Please post next part. Eager to know what next?

  Liked by 1 person

  • rutusara
   September 6, 2017

   I am really sorry to keep you waiting….next part surely coming in this week….Thanks:)

   Like

 2. Shradha
  September 6, 2017

  Please post next part.

  Liked by 1 person

  • rutusara
   September 6, 2017

   Lavkarach….yaach aathavadyat …..thanks 🙂

   Like

 3. Shradha
  September 11, 2017

  next part???

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on August 5, 2017 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: