davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 49)

“येस….माई आजी म्हणते ते बरोबर आहे” सायली एकदम ओरडली. “योजना असते तिथे मार्ग असतोच…आपल्या हातात पुरावा नाहीये पण वेळ आहे. दोन महिने…”

————————-आता पुढे ——————

कसले दोन महिने?” ईशा

 

अगं म्हणजे मूव्ही दोन महिन्यात रिलीज होतोय बरोबर? ते दोन महिने आहेत आपल्या हातात…” सायली

 

हो पण त्याचं काय?” अनिकेत

 

कोमलची कादंबरी आणि स्टोरी आधीच लोकांसमोर आणायची. मुव्ही रिलीझ व्हायच्या आधीच. ” सायली

 

ग्रेटहे लक्षातच नाही आलं…” सिद्धार्थ

 

पण नक्की काय करायचं?” अनिकेत

 

आणि कोण विश्वास ठेवेल ही कोमलची कथा आहे त्याच्यावर?” ईशा

 

आणि आपण ही स्टोरी पब्लिक मध्ये रिलीझ कशी करायची? काहीतरी माध्यम हवं ना….” अनिकेत

 

आम्हाला वाटतं आम्हाला आता निघायला हवं..” सुजयची काकू मधेच म्हणाली. “वाहिनी एकट्या आहेत ना घरी..तशी कामाला बाई येते ती दिवसभर असते त्यांच्यासोबत पण तरी निघायला हवं. त्यांना आम्ही नीटसं बोललो पण नाही एवढा वेळ लागेल म्हणून…”

 

आमच्याकडून जी मदत लागेल ती आम्ही करूच. नक्की…” सुजयचे काका उठत म्हणाले.

 

काका, प्लिजम्हणजे सॉरी तुमची अडचण आहे. पण अजून काही वेळ थांबता नाही का येणार? हवं तर तुम्ही फोन करून बघा ना, तशी काही अडचण असली तर मग निघाम्हणजे सुजयच्या आई वाटसुद्धा नाही बघणार..” सायली पटकन म्हणाली.

 

सायली अगं त्यांना निघायचंय तर निघूदे ना, त्यांना पुण्याला जायचंय परत..” बाबा

 

बाबा, मला कळतंयपण आता हे एवढं सगळं कळल्यावर एवढंही कळतंय की आता वेळ घालवून चालणार नाहीसुजयशी लग्न मी कधीही मोडू शकेन पण कोमलसाठी जे करायचं ते मात्र आता फार वेळ न घालवता. ही लोकं फार दुरून आलेत बाबाछू आणि अर्जुनच्या दिशेने बघत ती म्हणाली. “त्यांनी आपली मदत केली आहे सुजयचं सत्य सांगून. आता आपण त्यांना मदत करायची आहे.आज जितका वेळ लागायचा तितका लागुदेतपण आज ह्यावरचं उत्तर मिळाल्याशिवाय इथून कोणीच जायचं नाहीप्लिज सिद्धार्थ, काकाकाकूमी रिक्वेस्ट करते तुम्हाला…” सायली

सिद्धार्थने उत्तराखातर मान हलवली.

अगं रिक्वेस्ट नको करुस सायलीपण मी सकाळी आल्यावर ऑफिसला जाणार होतो..माझी रजा संपली आहे..त्याचं काय करू?”

 

हम्म….”सायली विचार करत म्हणाली. “एक काम करएके ला इमेल कर..तुला बरं नाहीये असं आणि सांग थोडं बरं वाटलं की घरून काम करेन..तुला काय फाईल्स आणि काय हवं असेल ते इमेल करायला सांग त्यालाआणि मला कॉपी कर मेलमध्येडोन्ट वरीआजचा सगळा दिवस आहे हातातवेळ मिळाला की आपण करू..आय विल हेल्प यु..ओके? ”

 

येस बॉस.. आणि जरा आईला पण फोन करून घेतो..” सिद्धार्थ

बाबा कौतुकाने लेकीकडे बघत होते..किती पटापट डिसिजन्स घेतले हिने आत्ता पाच मिनिटातसुजयच्या काकाकाकूंना थांबायला सांगितलंसिद्धार्थला बॉस म्हणून इंस्ट्रक्शन्स दिल्या..ऑफिसचं काम अफेक्ट होणार नाही ह्याचीसुद्धा काळजी घेतली

मोठी झाली मुलगी आपली वसू

बाबा आईशी हळू आवाजात बोलले तरी त्या स्वरातला अभिमान जाणवत होता.

काका, काकू तुम्ही थांबताय नातुमची काही मदत लागली तर तुम्ही लगेच अव्हेलेबल असाल म्हणून…” सायली

 

हो, थांबतो आम्ही फक्त एकदा वहिनींना फोन करून सांगतो…” काका

 

“”हम्मतर आपण मगाशी कुठपर्यंत आलो होतो?” ईशा

 

आपण ह्यावर विचार करत होतो की ही कथा लोकांसमोर आणायची कशी? ” सिद्धार्थ

 

मी सांगतोतुमची बाकी बडबड सुरु होती तेव्हा मी हाच विचार करत होतोइंटरनेटचा ह्यापेक्षा चांगला उपयोग दुसरा नाही..” अनिकेत

 

म्हणजे ?” सायली

 

एक ब्लॉग सुरु करायचा..त्याला कोमलचंच नाव देऊत्यावर ही कथा पोस्ट करायचीएकदम नाही, पार्ट बाय पार्ट.” अनिकेत

 

ए पण आपल्याला काही माहित नाहीये हा ब्लॉग बद्दल वगैरे …” ईशा

 

अगं बाई मग इंटरनेट काय नुसतं फेसबुक आणि व्हॉट्स अप साठी आहे का? शोधायचं गुगलवरथोडं डोकं वापरलं की सगळं येतं…” अनिकेत

 

अनि, तुला बघतेच मी आता, काय मीच मिळालेय का तुला सकाळपासून…”

ईशा आणि अनिकेत पुन्हा दुसऱ्या ट्रॅकवर जाणार हे बघून सायली मध्ये पडली..

तुम्ही दोघं ना खरंच मोठं नाही होणार कधी….आपल्याला आजच्या आज हे ठरवायचंय, कळलं का? अनि, काय म्हणत होतास तू?”

 

हा..तर ब्लॉग सुरु करायचात्याच्यावर कोमलची कथा पोस्ट करायचीपहिले काही भाग पोस्ट झाले की थोड्या दिवसातच ब्लॉग फेमस होईल..आणि हे मार्केटिंग करायचं काम माझंमाझा एक मित्र ब्लॉगर आहे, त्याची मदत घेतो मी. आणि आपल्या नेटवर्क मध्ये ह्या ब्लॉगची एवढी हवा करायची की लोकांनी जाऊन पहिले काही भाग तरी उत्सुकतेपोटी वाचलेच पाहिजेतआपण ही जाहिरात करायला युट्युबवर विडिओज सुद्धा टाकू शकतो काहीअसं केलं तर कोमलची कथा तिचंच नाव लावून लोकांसमोर येईल…” अनिकेत

 

हम्मइंटरेस्टिंगहे वर्क होईल असं वाटतंय…” सिद्धार्थ अनिकेतच्या बोलण्यावर विचार करत म्हणाला.

 

पण ह्या विषयावरचा सिनेमा येतोयआणि तिच कथा आधी लोकांसमोर येतेय ह्याचे परिणाम काय होतील ह्याचा विचार व्हायला हवा ना….काही लीगल प्रॉब्लेम्स तर नाही येणार?” सायली

 

सायली, अनि म्हणतोय ते बरोबर आहेआणि आपण का विचार करायचा? आपल्याकडे ओरिजिनल कथा आहे….आणि लीगल इशूज आले तरी शेवटी आपण त्यांच्याकडून ही कथा चोरली असं तर ते नाही ना प्रूव्ह करू शकणार? उलट ह्या मुव्ही साठीच जी कथा वापरली आहे ती लेखकाने चोरली आहे असं आपण म्हणू शकतो..” सिद्धार्थ

 

अरे पण विश्वास कोण ठेवणार? आपल्याकडेही पुरावा नाहीये ह्याचा की आपल्याकडून म्हणजे कोमलकडून ती कथा कोणीतरी चोरली आहे ह्याचा…” ईशा

 

ज्याने कथा चोरली आहे तोच तर मोठा पुरावा आहे ना ईशी…” सायली

 

आणि तो हे कसं सांगेल?” अनि

पुन्हा शांतता पसरली…सुजयकडून हे कसं वदवून घ्यायचं हाच प्रश्न होता.

लग्न झाल्यावर तरी तो सांगेलच ना अनि….” सायली समोर खिडकीतून बाहेर एकटक बघत म्हणाली.

म्हणजे?? “

बाबा, ईशा, सिद्धार्थ एकदमच म्हणालेआईच्या मनात पुन्हा धाकधूक सुरु झालीही मुलगी काय आता हे सगळं त्याच्याकडून वदवून घ्यायला लग्न करणार म्हणते की काय त्याच्याशी

सांगतेकाका…” सुजयच्या काकांकडे वळत ती म्हणाली, ” सुजयला प्लिज फोन लावाल का? त्याला त्याच्या घरी भेटायला येतोय सांगाआणि थोडं वरच्या आवाजात बोला लागलं तरसांगा की त्याच्या लग्नासाठी मुलगी बघितली आहे आणि तिला घेऊन तुम्ही त्याच्या घरी येतायलग्न करायचं नाही किंवा मी घरात नाही अशी काही कारणं ऐकून घेऊ नका. असशील तिथून घरी निघून ये आणि आम्ही पण तासाभरात पोहोचतो आहोत असं सांगा. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करा आधी नीट त्याच्याशी काय बोलायचं त्याचीत्याने आणखी काही प्रश्न विचारले तर जास्त सांगायचं नाही आणि भेटल्यावर बोलू असं सांगातो लग्नाचं मनावर घेत नाही, आईचा विचार करत नाहीये त्यामुळे तुम्ही चिडून ही स्टेप घेतली आहे असं त्याला वाटलं तरी चालेल. म्हणजे, तसंच वाटलं पाहिजे तर त्याला संशय नाही येणारजमेल ना तुम्हाला?” सायली सगळं एका दमात बोलली.

खरं तर तिचं तिलाच आश्चर्य वाटत होतंआत्ता काही वेळापूर्वी पुढे काय करायचं म्हणून डोकं धरून बसलो होतो आपण आणि आता सगळं किती पटापट सुचतंयसगळे प्रश्न संपल्यासारखे वाटतायततिने सुजयच्या काकांकडे पाहिलंतिने एवढं सगळं सांगितल्यामुळे त्यांची जरा गडबड उडाली होती..

काका, सॉरी मी एवढं पटापट सांगितलं तुम्हाला. मी लहान आहे तुमच्याहून आणि तुम्हाला अशा सूचना देतेय, पण माझ्या डोक्यात आलं तसं मी बोलत गेलेचालेल ना तुम्हाला?” सायली

 

मी सगळी मदत करायला तयार आहे पण हे फोन करून असं बोलायचं म्हणजे….त्याला संशय आला तर?” काका

 

नाही येणारसिद्धार्थ, तुला कळलंय ना मी आत्ता काकांना सांगितलं तेमग तू जरा सांग ना त्यांना समजावून प्लिज…” एवढं बोलून सायली बाबांकडे वळून म्हणाली, ” बाबा, आता पुढचं तुम्हाला सांगते….काका जी मुलगी सुजयला स्थळ म्हणून घेऊन जाणार आहेत, ती मुलगी म्हणजे मीच…आता काय करायचं, कोणी काय बोलायचं ते आपण ठरवून घेऊया… आत्ता सकाळचे ११ वाजत आलेत…सगळं प्लॅनिंग करून आज संध्याकाळीच आपण सुजयला भेटायचंय….”

सायलीचं बोलणं सगळेच उत्सुकतेने आणि कुतूहलाने ऐकायला लागले…जसजसं तिचं बोलणं पूर्ण होत आलं, तसतसं सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. ईशा, छू आणि सिद्धार्थ मान हलवून ‘नाही, हे वर्क होणार नाही’ असं म्हणत होते. आईच्या आणि सुजयच्या काका-काकूंच्या चेहऱ्यावर हे सगळं कसं निभावून न्यायचं ह्याची काळजी दिसत होती. बाबा आणि माई आजी मात्र सायलीच्या प्रत्येक गोष्टीत तिला साथ द्यायची असं ठरवून, तिच्याकडे विश्वासाने बघत होते….सायलीचं बोलणं ऐकता ऐकता अर्जुनच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र काही वेगळंच सांगत होते…त्याच्या चेहऱ्यावर हास्याची एक लकेर उमटली होती…

 

——————– ह्यानंतर साधारण एक तासाभरात —————–

सुजय अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता…सिद्धार्थने पाळत ठेवलेल्या त्याच्या लोकांनी आत्ताच त्याला बातमी दिली होती की सिद्धार्थ आणि त्याच्या बरोबर ट्रेनमधून उतरलेले ते दोघे, दुसऱ्या-तिसऱ्या कोणाच्या नाही तर सायलीच्या घरी गेलेत..त्यांची नावं कळू शकली नाहीत…पण ते कोण असतील आणि सायलीच्या घरी काय करत असतील हा प्रश्न त्याला भंडावून सोडत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला…अननोन नंबर होता.

“हॅलो…”

 

“सुजय?” पलीकडचा आवाज

 

“येस…हू इज इट?”

(पुढचं हिंदीतून झालेलं संभाषण, आपल्या सोयीसाठी मराठीतून)

“तू ओळखत नाहीस मला, पण मित्रा, मी तुला चांगलंच ओळखतो..”

 

“कोण बोलतंय?”

 

“तू जिला फसवून कटनीमधून पळ काढलास, तिची कादंबरी पळवून नेलीस, नंतर तिच्या खुनाचा कट रचलास, त्या कोमलच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचा, छूचा नवरा, अर्जुन…”

 

“क…का….काहीही काय बोलतोयस….”

 

“अरे मीच नाही, आता तर सायली आणि तिच्या घरचे.. सगळ्यांना कळलंय हे…त्यात तुझे काका- काकूसुद्धा आहेत…”

 

“तू…कोण आहेस नक्की…आणि कोण कोमल वगैरे …तुझा रॉंग नंबर लागलाय बहुतेक…”

 

“पोलीस दारावर आले तरी हेच बोलशील का……”

 

“काय चाललंय तुझं…काय काहीही बोलतोयस तू….मी नाही खरंच ओळखत ह्या पैकी कोणाला…”

 

“हो? असं असतं तर तू आधीच फोन ठेवला असतास ना…एवढा वेळ तरी कशाला बोलतोयस माझ्याशी ? हे बघ, मला काहीही पडलेलं नाही हा तुझ्याबद्दल…ह्यात मला माझा फायदा दिसला म्हणून मी तुला फोन केला…सायली आणि बाकी सगळ्यांना सगळं कळलं आहे….आज संध्याकाळी तुला ट्रॅप करण्याचा प्लॅन झालाय त्यांचा…आणि तुला ह्यातून अलगद बाहेर काढण्याचा माझा प्लॅन सुद्धा तयार झालाय…तुला इंटरेस्ट असेल तर सांग…”

 

“मग …ह्या…ह्यात तू..तुझा काय फायदा…आणि तू कु…कुठे असतोस कुठे….एकदम माझ्याबद्दल कुठून कळलं तुला…?”

 

“बाकी सगळं कळून तुला काय करायचंय? सध्या मी मुंबईत आलोय…त्या सिद्धार्थबरोबर मी आणि छू आज सकाळीच आलोय मुंबईला….”

 

“अच्छा…म्हणजे ते तुम्ही….”

 

“हे बघ,” त्याला मधेच तोडत अर्जुन म्हणाला,” मला वेळ नाही हा तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला…आम्हाला तुला कसं ट्रॅप करायचंय त्याचं प्लॅनिंग करायचंय…म्हणजे त्यांच्या बरोबर मलाही…ते सगळे आल्रेडी तयारीला लागलेत…आता मला पण जावं लागेल….सांग लवकर तुला माझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट आहे का ते…”

 

“आधी ह्यात तुझा काय फायदा ते मला कळलंच पाहिजे….तरच मी ठरवू शकेन…”

सुजयने आता सावध पवित्रा घेतला होता. सायलीला संशय आलाय असं त्याला वाटत होतंच. पण मग ती फार तर फार त्याला जाब विचारेल किंवा लग्न मोडेल वगैरे असं वाटलं होतं त्याला… पण ह्या फोनमुळे त्याच्यासमोर बॉम्ब फुटल्यासारखंच वाटत होतं त्याला…

“अरे तू करून देणार माझा फायदा…सायलीशी लग्न झालं तर एखाद करोडची जमीन मिळणार आहे ना तुला? आणि तसंही त्या कोमलची कादंबरी विकून तुला भरपूर फायदा झाला असेलच…तर त्यातले चाळीस लाख तू मला द्यायचे…त्याबदल्यात मी आज तुला सायलीचा तुला ट्रॅप करण्याचा प्लॅन तुला सांगेन…आणि ह्यातून तू सहीसलामत बाहेर कसा येशील आणि सायलीशी तुझं ठरलेलं लग्न कसं मोडणार नाही हा माझा पुढचा प्लॅन तुला सांगेन….लवकर सांग…तयार आहेस का ते…”

एक क्षणभर सुजयने विचार केला…ह्या अर्जुनला त्या जमिनीबद्दलही माहित होतं…त्याच्या बोलण्यावरून तरी त्याला सगळं माहित आहे हे कळत होतं…पण असं अनोळखी माणसाशी हे सगळं कसं बोलणार?

“तू माझ्या बाजूने का असशील पण? तुझी बायको तर त्या कोमलची फार जिवाभावाची मैत्रीण होती ना…मग तू तुझ्या बायकोच्या विरोधात जाणार?”

 

“हे बघ, मी कोणाच्याही बाजूने नाही आत्ता….हा म्हणजे आत्तापर्यंत मी माझ्या बायकोला प्रामाणिकपणे साथ दिली तुला शोधण्यासाठी…पण हे जमिनीचं आत्ताच कळलं मला..आणि कुठल्या लिमिटपर्यंत चांगलं वागायचं आणि नंतर स्वतःचा फायदा करून घ्यायचा मला चांगलं कळतं हा…बायको म्हणून काय तिला डोक्यावर नाही बसवलं मी….माझा एवढा मोठा फायदा होणार असेल तर मी मागे फिरणार नाही…आणि तसंही तिला काय, कुणालाच नाही कळणार मी तुला हे सांगितलंय ते…माझ्या बायकोच्या नजरेत मी तिला मदत करणारा तिचा हिरोच राहणार ना….”

आणखी एक क्षण विचार करून सुजय म्हणाला,

“ठीक आहे…मी तयार आहे…सांग काय प्लॅन आहे त्यांचा….”

 

“असं नाही मित्रा…फोनवर तर नाहीच नाही….दोन तासात भेट मला…कुठे ते तूच ठरव आणि मला नीट पत्ता दे आणि कसं यायचं ते सांग…मला मुंबईतलं काहीच माहित नाही हा …”

 

“ओके…मी दहा मिनिटात कळवतो तुला….पण प्लिज निदान थोडं तरी सांग मला…तू आज संध्याकाळबद्दल म्हणालास मगाशी..आता फार थोडा वेळ आहे ना….मलाही काही विचार करून ठेवता येईल…”

 

“सगळं सांगणार नाही मी…तुझे काका तुला फोन करतील तुझ्यासाठी मुलगी बघितली आहे आणि तिला घेऊन ते लगेच तुला भेटायला येतायत असं…ती मुलगी म्हणजे सायलीच..बास…आता नंतर तुझ्या घरी आल्यावर तुझ्याशी ते काय बोलणार आणि तुझ्याकडून सगळं कसं वदवून घेणार हा त्यांचा प्लॅन मी तुला भेटल्यावर सांगेन….एक लक्षात ठेव हा…तुला फक्त एवढंच कळून काहीच उपयोग होणार नाही…तुला ह्यातून सहीसलामत बाहेर पडायचं असेल आणि सायलीशी लग्न करून ती जमीन पदरात पडून घ्यायची असेल तर मला भेटावंच लागेल तुला…”

 

“ओके…भेटेन मी तुला…दहा मिनिटात तुला ठिकाण कळवतो…”
—————————————————————–

 

————————————-

————————————–

***********************************************************

 

(दोन महिन्यांनंतर )

सायली खिडकीपाशी एकटीच उभी होती, बाहेर एकटक बघतडोळ्यात काहीतरी हातातून निसटून गेल्याची खंत होतीआता काय करणार आहोत आपण? तिच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नव्हतंच..एक चुकलेला विचार….. आणि आता पुढे ती संधी कधीही येणार नाहीहताश होऊन तिने डोळे मिटून घेतलेआता वेळ गेल्यावर विचार करण्यात काय अर्थ होता म्हणा…सगळ्यांचं ऐकलं असतं तर….

तेवढ्यात मागे कुणाची तरी चाहूल लागली. तिने मागे बघितलं.

ईशी तू आत्ता इथे? ”

 

हम्मम्हटलं बघूया सौ. सायली सुजय साने काय करतायत नक्की? आमचं ऐकलं नाहीस ह्याचा पश्चात्ताप होतोय की नाही तुला ते बघूया म्हटलं…”

 

ईशा….मी परत सांगतेय तुला..आता मला वैतागायला होतंय..मला त्या नावाने हाक मारू नकोस…”

क्रमशः

*************************************

पुढचा भाग पोस्ट करायला आणखी दोन दिवस घेतेय…पुढचा भाग गुरुवारी…

6 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 49)

 1. sarika devrukhkar
  March 5, 2018

  bapre kahani me twist

  Like

 2. Sweetali
  March 5, 2018

  are bapre new twist….goood going…keep it up

  Liked by 1 person

 3. Shilpa Naik
  March 7, 2018

  are i hope ending happy karal 🙂

  Liked by 1 person

 4. sarika devrukhkar
  March 8, 2018

  HAPPY WOMEN’S DAY

  Liked by 1 person

 5. Ujvala
  March 9, 2018

  Thursday gela pan next part nahi aala

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on March 5, 2018 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: