अज्ञाताची चाहूल : (भाग : 29)

काय करावं काहीच सुचत नव्हतं सायलीला. ती तशीच उभी राहिली होती. विचार करून फोन करते, असं ईशा म्हणाली होती खरं, पण अजून तिचा फोनही आलेला नव्हता. जावं का निघून असंच, सुजयच्या आईला काहीही न सांगता? खरं तर असं पळून गेल्यासारखं करणं तिला पसंतच नव्हतं. पण आत्ता ईलाज नव्हता. सुजयने तिला इथे बघितल्यावर ती काय सांगणार…