अज्ञाताची चाहूल : (भाग : 50)

“हम्म…म्हटलं बघूया सौ. सायली सुजय साने काय करतायत नक्की? आमचं ऐकलं नाहीस ह्याचा पश्चात्ताप होतोय की नाही तुला ते बघूया म्हटलं…”

“ईशा….मी परत सांगतेय तुला..आता मला वैतागायला होतंय..मला त्या नावाने हाक मारू नकोस…”

——————————आता पुढे ———————–

 

ओके..राहिलं….आता बायकोलाच ते नाव नकोसं झालं असेल तर बिचाऱ्या त्या नवऱ्याने तरी काय करावं?” ईशा आता दात काढत म्हणाली.

 

ईशी…..” सायलीने आता रागाने तिला उशी फेकून मारली.

 

सॉरी सॉरीआता ईशाला हसू आवरत नव्हतं…”पण बघ ना म्हणजे तू घेतलेले सगळेच निर्णय बरोबर ठरतीलच असं नाही नातेच मला तुला सांगायचं होतं…..” ती सायलीने पुन्हा फेकून मारलेली उशी चुकवत म्हणाली..”आता हेच बघ ना, आम्ही सगळे किती सांगत होतो तुला की काकाकाकूंची ऍनिव्हर्सरी आपण इथेच घरी करूया..पण तू ठाम होतीस पुण्याला करण्याबद्दल. आता तुला पुण्यालाच का जायचं होतं त्यासाठी मला माहित नाही…” ईशा पुन्हा फिदीफिदी हसत म्हणाली..

 

ए बावळट, मला पुण्याला त्यांची ऍनिव्हर्सरी करायची होती कारण ते पुण्याला सारसबागेत पहिल्यांदा भेटले होतेआणि काय चाललंय गं तुझं ईशीदोन महिने होऊन गेले तरी तुझ्याच डोक्यातून तो सुजय जात नाहीये ते बघ आधीपरत मला त्याच्या नावावरून चिडवलंस तर बघ…” सायली आता खरंच चिडली.

 

सॉरी गं सायलेचिडतेस काय? मी असा टाईमपास नेहेमीच करते, तुला तर माहित आहे ना…” ती सायलीच्या गळ्यात पडत म्हणाली.

सायली काहीच बोलली नाही..तिने मान दुसरीकडे फिरवली

काय झालंय तुला एवढं चिडायला?” ईशा

 

एक म्हणजे दोन महिने होऊन गेले सुजयचा चॅप्टर बंद होऊन तरी तू थांबतच नाहीयेस…” सायली

 

“चिडू नकोस गं पण मी असाच टाईमपास करत असते तुला माहित आहे ना…आणि सुजयचं नाव घेतल्यावर मला काय आठवतं माहित आहे, कोमलला जाऊन बरोबर एक वर्ष झालं, त्या दिवशी जे,जे घडलं ते…सकाळी सकाळी छू, अर्जुन, सिद्धार्थ, सुजयचे काका -काकू सगळे घरी आले होते…छूकडून सगळं कळलं आपल्याला आणि मग आपण सुजयविरुद्ध प्लॅन केला…त्याला ट्रॅप करण्याचा…”

 

“खरंच गं..तो दिवस विसरताच येणार नाही…ए ईशी ह्या सगळ्याचा विडिओ आहे माझ्याकडे…विसरलीस तू?”

 

“सायले…खरंच गं..खरंच विसरले मी…बघूया का एकदा तो व्हिडीओ परत?” ईशा

 

“ए…मी बघण्यासाठी नव्हतं म्हटलं…मला वाटलं तू विसरलीस म्हणून विचारलं फक्त…त्यात त्या सुजयचं तोंड बघितलं की आजचा सगळा दिवस खराब जाईल माझ्यासाठी…” सायली

 

“बघू गं…काही खराब जात नाही दिवस…कुठे तुझ्या मोबाईलमध्ये आहे ना…”

ईशाने सायलीच्या हाहातून मोबाईल खेचून घेत म्हटलं….भरभर सगळे व्हिडीओज चेक करत ती त्या व्हिडीओपाशी येऊन थांबली आणि तो ऑन केला…सायलीसुद्धा तिच्याही नकळत ईशाच्या बाजूला येऊन तो बघायला लागली…

—————————————————————–
सायली, ईशा, सिद्धार्थ, बाबा, सुजयचे काका- काकू, छू आणि अर्जुन सगळे सुजयच्या घराबाहेर उभे होते…तेव्हा सिद्धार्थने व्हिडीओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. सुजयचे काका काकू दरवाजासमोर उभे राहिले….बाकी सगळे थोडे आडोशाला..

सुजयने दार उघडलं. काका-काकूंना आत घेतलं..सुजयच्या चेहऱ्यावर एक स्माईल होतं, हलकंसं..त्याच्या देहबोलीत कॉन्फिडन्स होता.

“काका, काय काढलंय तुम्ही माझ्या लग्नाचं? फोनवर मस्करी करत होतात ना माझी?”

 

“मस्करी कशाला करू आम्ही? तुलाच सगळी मस्करी वाटतेय…आई कधीपासून वाट बघतेय तुझ्या लग्नाची..म्हणून आज मुलगी बघून आम्ही तिला घेऊन आलोय…तू तिला भेटला आहेस..तुला ती आवडली आहे असं आम्हाला वाटतं…दोघे तयार असाल तर पुढ्च्या चार दिवसात ठरल्याप्रमाणे लग्न करून टाकू तुमचं…” काका

 

“काय बोलताय काका …” सुजयने धक्का बसल्यासारखं दाखवलं पण ते त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं…

 

“सायली, आणि सगळेजण आत या बरं…” काकू

 

“स…सायली? म्हणजे?” सुजय

सायली आत आली आणि तिच्या मागोमाग बाकीचे सगळेच…

“हाय सुजय…तुला आश्चर्य वाटलं असेल ना…मी आणि तुझे खरे काका-काकू एकत्र कसे? मला सगळ्या गोष्टी कळल्यात. मी फार बडबड करत बसणार नाही, पण एवढंच सांगते, हा सिद्धार्थ कटनीला जाऊन आला आणि कोमलच्या मैत्रिणीकडून, ह्या छूकडून आम्हाला सगळ्या गोष्टी कळल्यात…”

 

“क…काय बोलतेयस तू…आणि कोण कोमल वगैरे…” अर्जुनने सांगितलं होतं तेच आठवत सुजय बोलत होता..

 

“कशाला खोटं बोलतोयस सुजय…आमच्याकडे फक्त काही पुरावा नाही म्हणून इकडे आलोय नाहीतर डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेलो असतो…हे बघ……शेवटी काही झालं तरी कोमलला न्याय मिळालेला हवाय मला…तू त्या जमिनीसाठी माझ्याशी लग्न करतोयस ना…मला सगळंच कळलंय…फक्त तुझ्या तोंडून सगळं ऐकायचंय.”

अर्जुन म्हणाला होता ते खरं होतं तर…सायलीला सगळंच कळलं होतं…आता पुढे ठरल्याप्रमाणेच बोलायला हवं..

अर्जुनकडे एक चोरटी नजर टाकली त्याने…एवढ्या सगळ्यांसमोर तो त्याला काय खाणा-खुणा करणार? पण अर्थात त्याने सांगितलंच होतं सुजयला हे असंच बोलणं होणार आणि मग त्यावर काय बोलायचं हे सुद्धा बोलणं झालं होतं त्यांचं…

“सायली काय बोलतेयस तू…कोण कोमल …काय आहे हे सगळं? कसली कथा?’

 

“मागच्या वर्षी ह्याच दिवशी कोमल गेली सुजय …आणि त्या आधी चार महिने तिची कथा चोरीला गेली …आणि मला माहित आहे, ह्या सगळ्यामागे तूच आहेस…आणि म्हणून तू आम्हाला खोटं नाव सांगितलंस आणि तुझ्या काका-काकूंना आणि आईला फसवलंस .एक लक्षात ठेव, कोमलच्या बाबतीत माझ्याकडे कोणतेही पुरावे नसतील पण लग्नाच्या बाबतीत खोटी माहिती सांगून आम्हाला फसवल्याबद्दल मी पोलीस कम्प्लेंट करूच शकते तुझी..”

 

“कसला पुरावा? तुमच्याकडे काहीही पुरावा नाहीये मी तुम्हाला फसवल्याचा…”

हे बोलताना आपण किती हुशारीने ह्यातून सहीसलामत बाजूला होतोय ह्याबद्दलचा अभिमान त्याच्या स्वरात जाणवत होता.

“फोटोज आहेत आमच्याकडे साखरपुड्यातले…त्याहून मोठा पुरावा काय असणार?” सायलीचे बाबा समोर येत म्हणाले..

 

“काका, पण त्यामुळे मी तुम्हाला फसवलं असं नाही ना होत…मी सांगेन पोलिसांना मी माझी खरी -खरी माहितीच सांगितली होती आणि त्यावरच आमचं लग्न ठरलं होतं…मग काय करणार तुम्ही? ह्याबद्दलचा पुरावा तर नसेल ना तुमच्याकडे?”

सुजय आता अगदी मालिका-सिनेमांमधल्या व्हिलनसारखा बोलत होता..सायली आणि बाकीचे काय बोलणार हे त्याला अर्जुनकडून कळलंच होतं पण ह्यावर त्याच्याकडे उत्तरं तयार होती हे मात्र सायलीला माहित नव्हतं…आली आहे मोठी मला जाळ्यात पकडायला…इथून जाताना हात हलवत जाशील आता….अर्थात लग्न मोडल्यात जमा होतं त्यामुळे ती जमीन पदरात पडून घ्यायला आणखी वाट बघावी लागणार…परत लग्न जमवा आणि ते होईपर्यंत वाट बघा…पण तरी ह्या बाबतीत जवळजवळ पकडले गेलो असताना आपण सुटतोय ह्याबद्दल स्वतःबद्दलचा अभिमान, आपल्याविरुद्ध कुणीही काहीही करू शकत नाही हा कॉन्फिडन्स, आणि आता ह्या सगळ्यामुळे चेहऱ्यावर लपवता येत नसलेलं छद्मी हसू….सगळं आता त्याच्या चेहऱ्यावर वाचता येत होतं.

 

सायली आणि ईशाने अस्वस्थपणे एकमेकींकडे बघितलं.

“आम्ही त्या सुजयला भेटलोय आणि त्याने कबूल केलंय सगळं…” ईशा

 

“पण त्याच्याकडेसुद्धा पुरावा नाहीच आहे ना….मी त्याला भेटलो, मदत मागितली…काय पुरावा आहे त्याच्याकडे? मी सांगेन मागे झालेल्या भांडणाचा बदला घेतोय माझ्यावर असे आरोप करून….मग ? पुढे काय कराल तुम्ही?” सुजयच्या आवाजात आता मग्रुरी डोकावत होती…

आता शांतता पसरली. सुजयच्या काकांनी बोलायला सुरुवात केली.

“सुजय, आईला हे क…..”पण काकांना मधेच तोडून तो म्हणाला, ” काका तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हा…ह्या लोकांना घेऊन आलात तुम्ही? माझ्याविरूद्ध? आणि आईची भीती घालू नका हा मला…मी बघेन तिला काय सांगायचं ते…. आणि “

एक खाडकन सणसणीत कानाखाली बसली आणि तो एकदम भानावर आला.

 

समोर सायली उभी होती….सुजयच्या डोळ्यांवर चढलेली फाजील आत्मविश्वासाची धुंदी खाडकन उतरली…तो स्वतःच्या कौतुकात इतका रमला होता की काकांशी बोलताना सायली समोर येऊन उभी राहिली हेही त्याला कळलं नव्हतं…सायलीच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत त्याच्यात नव्हती.

“लाज नाही वाटत स्वतःच्या काकांशी असं उद्धटपणे बोलायला? आणि तेही स्वतःची चूक…सॉरी चूक नाही गुन्हा असताना ?”

तिच्या नजरेला नजर न देता तो अडखळत म्हणाला,

“कसला गुन्हा? जमत असेल तर प्रूव्ह करून दाखव….प्रूव्ह झाला तर तो गुन्हा असतो…”

अर्जुनचं वाक्य होतं हे… त्याने किती परफेक्ट सांगितलं होतं कुठल्या वाक्यावर काय बोलायचं ते…कदाचित नाहीतर सायलीसमोर गडबडून जायला झालं असतं..

“आणि प्रूव्ह करता नाही आलं तर तो गुन्हा नसतो? म्हणजे आत्तापर्यंत एवढं सगळं करून तू नामानिराळा? तू कोमलला लग्नाचं प्रॉमिस करून पळून आलास, तिची कादंबरी चोरलीस, तुझ्या त्या फ्रॉड मित्राने त्या कथेला स्वतःचं नाव लावून त्या प्रोड्युसरला ती विकली आणि एवढंच नव्हे तर तिला फोन करून तू तिला बोलवून घेतलंस आणि तिच्या खुनाच्या कटात सहभागी झालास, तुझ्या त्या मित्राच्या माणसांनी तिला प्रेशराईझ केलं कम्प्लेंट मागे घे म्हणून आणि तिने नकार दिला तेव्हा तिला जबरदस्तीने विष पाजलं, त्याआधी तिच्याकडून तिचीच सुसाईड नोट लिहून घेतली….एवढं सगळं करून आमच्या सगळ्यांसमोर तोंड वर करून बघायलाही तुला लाज वाटली पाहिजे…”

सायलीचा एक-एक शब्द कानावर पडत गेला तसे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले… फोन करून तिला बोलवून घेतलं वगैरे हे सगळं सायली इतकं ठामपणे कसं सांगतेय….हे सगळं तिला माहित आहे हे अर्जुनने आपल्याला सांगितलं नव्हतं…उलट दुपारी आपण त्याला भेटलो तेव्हा आपणच तर त्याला सांगितलं, कोमलला त्या दिवशी फोनवर काय काय सांगितलं होतं , ती यायला कशी तयार झाली वगैरे आणि मग पुढे काय काय झालं …हे सगळं आपण अर्जुनला सांगितलं ….मग सायलीला हे…..त्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला…त्याने झटकन मान वळवून अर्जुनकडे बघितलं…तो त्याच्याकडे डोळे रोखून बघत होता…

“आता दातखीळ बसली वाटतं तुझी…हे सगळं मला कसं कळलं, असाच विचार करतोयस ना….किंवा कळलंच असेल तुला आत्तापर्यंत…माझ्या आईला म्हटलं होतं मी…तुझ्या तोंडून कबूल करून घेईन सगळं…आणि थँक्स टू अर्जुन…त्याच्या डोक्यात हा सॉलिड प्लॅन आला, तू त्याला फसलास आणि तो तुला ह्यातून सहीसलामत बाहेर काढेल अशी खात्री पटल्यावर स्वतःच्या तोंडाने सगळं सांगितलंस त्याला…आणि पुरावा मिळाला आम्हाला… त्याने तुमचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलंय …शिवाय जिथे तुम्ही भेटलात तिथे ही मुलगीसुद्धा होती…” तिने छूकडे बोट दाखवत म्हटलं, “ही छू, कोमलची बेस्ट फ्रेंड….तिच्याकडेही तुमचं व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे. तर ज्या रेस्टोरंटमध्ये तुम्ही भेटणार होतात ना, तिथल्या मॅनेजरला आधीच कॉन्टॅक्ट करून, सगळी कल्पना देऊन आम्ही हे सगळं नीट रेकॉर्ड होईल अशी सोय करून घेतली होती तिथे…अर्जुन त्या जागेवर आधीपासूनच बसून होता तुला आठवत असेलच …तुला हवं तर बघू शकतोस तू अर्जुनकडे सगळं रेकॉर्डिंग आहे व्यवस्थित…आम्ही इथे तुझ्याकडे पुरावा मागायला नाही आलोय तर तुझ्याविरुद्धचा पुरावा दाखवायला आलोय तुला ….

————————————————-

“ईशी बास गं…” सायलीने पुढे येत तो व्हिडीओ पॉझ करत म्हटलं. “पुढचं सगळं कशाला आठवायचं आता? ”

 

“अगं बंद काय केलंस? मला त्यानंतरचा सुजयचा चेहरा बघायचा होता….”ईशा

 

“ईशा बास ना आता…तू आल्यापासून किती कटकट करते आहेस यार….” सायली

 

“मी काय केलं आता? उगीच माझ्यावर चिडचिड करतेयस हा…तू पण आलीस ना व्हिडीओ बघायला माझ्या बाजूला ? मग ह्यात मी काय कटकट केली? ”

 

“मग काय? कशाला त्या सुजयचा विषय काढलास गं?”  सायली

 

ओकेमी परत त्याच्यावरून तुला असं चिडवणार नाहीसॉरीआता चिडण्याचं दुसरं कारण? नाही, खरं कारण वेगळंच आहे, मला कळतंय … ” ईशा

 

आईबाबांना द्यायचं सरप्राईझ फसणार बहुतेक म्हणून….किती दिवस मी हे प्लॅन करत होते…”

 

हेच ते…” तिला मधेच अडवत ईशा म्हणाली,” म्हणूनच मी मगाशी म्हटलं, तू घेतले सगळेच निर्णय बरोबर असतील असं नाही नासुजयच्या वेळी तू ठरवलंस ते आम्ही सगळ्यांनी ऐकलं की नाही? अगदी मोठ्या माणसांनी पण तुझं ऐकलं.. तसं त्या प्लॅनसाठी अर्जुनला सुद्धा क्रेडिट द्यायलाच हवं…पण तरी …आणि ते सगळं ठरलं होतं तसं झालंमग तुला वाटायला लागलं की तू ठरवलेलं सगळं बरोबर असतंच..आता आत्ताचंच बघ ना.. आम्ही सगळे तुला सांगत होतो की आपल्या-आपल्या मध्ये हे सरप्राईझ प्लॅन करू…इथेच घरी करू किंवा कुठेतरी बाहेर जाऊ सगळे त्यानिमित्तानेपण तू तुझाच विचार लादलास आमच्या सगळ्यांवरतरी मी सांगत होते की माझ्या आईला ह्या सगळ्यात नको घ्यायला, तिच्या पोटात काही राहत नाही म्हणूनपण तू कुठे ऐकलंस? तू ना त्या सुजय प्रकरणापासून ओव्हरकॉन्फिडन्ट झाली आहेस, माहितीये?”

 

आता त्याचा काय संबंध आहे ईशा? वाटेल ते बोलू नकोस उगीचआणि आपण लॉन्ग वीकेंडला सगळे जाणार आहोतच ना बाहेरत्यांच्या ऍनिव्हर्सरीच्या सुमाराला हे ठरवलं असतं तर त्यांना शंका आलीच असती, तसंही सरप्राईझ स्पॉईल झालंच असतं….”

 

पण मग आता काय झालंय वेगळं?” ईशा

 

हो गंअनिने आईला मावशीशी फोनवर बोलताना ऐकलंयसारसबागेबद्दल बोलत होत्या दोघी काहीतरीनक्की मावशीने आईला सांगितलंय की सारसबागेत सरप्राईझ प्लॅन केलंय ते…”

सायलीच्या आवाजात आपला प्लॅन फसल्याची खंत पुन्हा डोकवायला लागली..

हम्मम्हणाला मला तोघराच्या बाहेर भेटला आत्ता मी आले तेव्हा…” ईशा

 

एक मिनिटपण तू आत्ता इथे कशी काय? म्हणजे आज शनिवार आहे बरोबर आहे पण तू येणार नव्हतीस ना ह्या वीकेंडलामग?”

 

तेच तरपण गोष्टच अशी आहे की मी तिकडे बसून फोनवर तुला सांगण्यात काय मजा? म्हणून निघूनच आले डायरेक्ट….वुई हॅव्ह अ रिझन टू सेलिब्रेट…” ईशा

 

ईशी….” सायली मोठे डोळे करत म्हणाली…” माझ्या आधी नंबर लावलास तर….कोण गं? ऑफिसमधला का कोणी?.”

 

,…तसलं काही नाहीये…” ईशा

 

सांग नाआता ठरवलं आहेस ना, मग सांगायला काय लाजायचं?” सायली

 

सायले, डोकं फिरवू नकोस हामला काहीतरी वेगळं सांगायचंय आणि असली फालतू बडबड केलीस ना तर न सांगता परत जाईन मीमग बस विचार करत…” ईशा

 

आता का? कळलं का मला किती वैतागायला होतं असेल तेतरी मी तुला असं हवेत चिडवत होतेतू तर त्या सुजयवरून चिडवतेस मला…” सायली आता भांडणाच्या स्वरात म्हणाली..

 

ए बाई मी सॉरी म्हटलं ना तुलाआता काय भांडणार आहेस का माझ्याशी?” ईशा

 

असं कासॉरी म्हटलं की झालं का? किती कटकट होते डोक्याला माहित आहे का?” सायली

 

“परत तेच? कटकट होत असेल तर मग जातेच मी….कोमलबद्दल काही सांगायचं होतं मला..पण जाऊदेत…”

ईशा मागे वळायला लागली तसं सायलीने धावत जाऊन तिला अडवलं

मॅडम मी हात जोडून तुमची माफी मागतेजाऊदे गं ही चिडवाचिडवी काय सांगायचंय तुला?” सायली ऐकायला अधीर झाली होती.

 

खरं तर दोन बातम्या आहेत माझ्याकडेकोमलने लिहिलेल्या वेगवेगळ्या लेखांची एक यादी आणि कॉपी, शाळेच्या सध्याच्या हेडसरांचं पत्र वगैरे आपण मध्य प्रदेशच्या एज्युकेशन बोर्डच्या शिक्षण समितीला पाठवलं होतं ना, त्यातले दोन लेख सिलेक्ट झाले आहेत….एक सहावीच्या अभ्यासक्रमात हिंदीच्या पुस्तकात आणि एक नववीच्या हिंदीच्या पुस्तकातआता ह्या वर्षी अभ्यासक्रम बदलतो आहे ना, त्यामुळे आता नवीन पुस्तकं येतील त्यात हे लेख असतील सायले, कोमलच्या नावानेतिने लिहिलेली एक लघुकथा सहावीला आणि मनुष्य स्वभावावर भाष्य करणारा लेख नववीलाही खूप मोठी गोष्ट आहे सायलेशाळा ही कोमल आणि तिच्या बाबुजींपासून क्षणीही वेगळी करू शकणार नाही अशी गोष्ट होतीतिने लिहिलेले लेख अभ्यासक्रमात इन्कलुड होणं ही खूप मोठी गोष्ट आहे,…”

 

माय गॉडकाय बातमी आणली आहेस ईशापण तुला कसं कळलं? ”

 

अगं आमच्या ऑफिसमध्ये एक नवीन कलीग आलायएम.पी चा आहे, इंदौरचाकाल त्याच्याशी बोलताना इंदौर, जबलपूर ही सगळी नावं ऐकली आणि काही महिन्यापूर्वीची आपली धडपड आठवली, कोमल, छू सगळ्यांची आठवण झालीमग संध्याकाळी घरी आल्यावर छूला फोन केलातेव्हा तिच्याकडून कळलंकालच शाळेत हेडसरांना पत्र आलं होतं ह्याबद्दलचंती म्हणाली होती एकदोन दिवसात तुला पण फोन करणार आहे हे सांगायला पण मला कळल्यावर मला राहावलंच नाहीम्हटलं आपण भेटून सेलिब्रेट करायला हवं..”

 

ईशी माझा मूडच बदलून टाकलास गं ह्या बातमीनेपण आणखी दुसरी कुठली बातमी?” सायली

 

कालच रात्री अग्यात की खोज मेंच्या मुव्हीच्या सगळ्या टीमला बोलावलं होतं एका हिंदी न्यूज चॅनेलवर मुलाखतीसाठी…मागच्या आठवड्यात मुव्ही रिलीझ झाला आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय त्यानिमित्ताने …सुरुवातीला लेखकाच्या नावावरून थोडा घोळ झाला होता पण नंतर त्याबद्दल फारशी चर्चा झाली नाही किंवा होऊ दिली नाही आता ह्यात लेखक म्हणून रामानंद व्यास (बाबूजी ) आणि कोमल व्यास ही नावं आहेतदुर्दैवाने हे दोघेही हयात नाहीत पण त्यांच्याबद्दल कुणालाच काहीच माहित नाहीतर त्याच्याबद्दल सांगण्यासाठी रिक्वेस्ट करण्यात आली डिरेक्टरला….काल पहिल्यांदा कोमल आणि बाबुजींबद्दल लोकांना कळलं सायलेआपलं नाव कुठे येणार नाही ह्याची खबरदारी आपण घेतली आहे पण तो डिरेक्टर बोलताना काय म्हणाला माहित आहे? कोमल एका बाबतीत मात्र लकी होतीतिने मिळवलेले मित्रमैत्रिणीज्यांनी ती गेल्यानंतरही ही मैत्री कायम लक्षात ठेवली आणि तिच्या मेहनतीला न्याय मिळवून दिलाह्या सिनेमाच्या यशात त्यांचाही मोठा वाटा आहे असं म्हणाला…”

 

खरंच? मग मला का नाही सांगितलंस तेव्हाच? मी बघितलं असतं ना टीव्हीवर…” सायली

 

अगं उद्या परत दाखवणार आहेत …..उद्या आपण सगळ्यांनी एकत्र बघूयाआणि कोमलच्या कटनीच्या शाळेला दत्तक घेणार आहेत तेशाळेत कॉम्प्युटर लॅब, मुलांसाठी आधुनिक प्रयोग शाळा, लायब्ररी, मुलांच्या शाळेत जेवण्याची सोय वगैरे अशा सोयी करणार आहेत आणि त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरु केली आहे..त्या संदर्भातली एक व्हिडीओ क्लिप शेअर केली त्यांनी. ” ईशा

 

म्हणजे कोमलचं आणि बाबूजींचं स्वप्नं पूर्ण होणार तर….ईशी…प्रत्येक टप्प्यावर अशी चांगली माणसं मिळणं किती महत्वाचं असतं नाही? कोमल माणसांच्या बाबतीत खरंच लकी असावी…बघ ना, छू सारखी मैत्रीण, अम्मा-बाबुजींसारखे एकमेकांची उणीव भरून काढणारे पालक…आणि आणखी एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या? हे मोठं प्रोडक्शन हाऊस… कोमलचं स्वप्नं पूर्ण करणं हेच तिचं लेखिका म्हणून मानधन असल्याचं सांगत त्यांनी ते पूर्ण करण्याची जबाबदारी उचलली….कदाचित दुसऱ्या कुठल्या प्रोड्युसरने नसती उचलली…कोमल लकी आहे ते ह्या बाबतीत…सुजय भेटला त्यानंतर काही काळ मात्र तिच्या सगळ्याच ग्रहांनी तिच्याकडे पाठ फिरवली होती हेच खरं.. पण आज खऱ्या अर्थाने आपला ह्या अज्ञाताच्या वाटेवरचा प्रवास पूर्ण झाला बघकोण कुठली कोमल, तिचं स्वप्नं इतके दिवस आपलं स्वप्नं झालं होतंकोमल असायला हवी होती ईशी, ती असायला हवी होती आत्ताहे स्वप्नं पूर्ण होताना बघण्यासाठी …” सायली

 

हम्म….खरं आहे…” ईशा

 

ईशा, ज्या दिवशी हे सगळं होईल ना, म्हणजे शाळेला दत्तक घेणार वगैरे, त्या दिवशी आपण तिथे जाऊया का गं, कटनीला? मला कधीपासून ते सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघायचंयआत्तापर्यंत कोमलच्या डायरीत वाचलं होतंतिचं घर, शाळा, ते मंदिर, लायब्ररी….प्रजापती निवास सोडून सगळं बघायचंय मला ….आणि छू ला पण भेटता येईल ना..” सायली

 

ओह येसहे मला का नाही सुचलंखरंच जाऊया आपणएवढ्या महत्वाच्या दिवशी कोमलसाठी आपण जायलाच हवं….बरं पण मॅडम आता बाहेर जाऊया का माई आजी बाहेर हॉलमधेच बसली आहेचल नाआणि मावशी आणि काकांच्या ऍनिव्हर्सरीचा दुसरा काही प्लॅन करता येतोय का ते बघूया…”

 

हा एवढा एक इमेल पाठवायचाय, तेवढं करून येते…”

सायलीने बोलताबोलताच समोरची खुर्ची तिच्या टेबलासमोर ओढली आणि ती तिचं काम करण्यात गुंतली.

 

ईशा लगबगीने दरवाजापाशी गेली पण मग एकदम काहीतरी आठवल्यासारखं झालं आणि मागे वळली, सायलीच्या बेडवर काहीतरी पानं पडली होती, तिच्या अक्षरातलीमगाशी आल्यावरच बघितली होती तिने. पण बोलण्याच्या नादात ती बघायचं विसरली होतीआता जाऊन कुतूहलाने तिने ती पानं उचललीहो, सायलीचंच अक्षर होतं ते

. बाबूजींना हेडसरांनी स्पर्धेसाठी कादंबरी लिहायला सांगितली आणि बाबूजींनी तशी सुरुवात केली

. कादंबरीचं काम अर्धवट राहिलेलं असतानाच त्यांचा अचानक मृत्यू. मग कोमलने हे काम हातात घेतलं.

. सुजय आणि कोमल आधी इंदौरच्या सराफा बाजार मध्ये आणि मग लग्नात भेटलेसुजयला ती आवडली आणि तिच्या मागे तो कटनीमध्ये आला..चारपाच दिवसांच्या मैत्रीनंतर कोमल त्याच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी तिने होकार दिला.

. ह्याच वेळी सुजयला त्या कादंबरीबद्दल कळलं आणि त्याने ती वाचण्यासाठी तिच्याकडून मागून घेतली.

. दुसऱ्याच दिवशी अम्माचा ऍक्सीडेन्ट

. सुजय कोमलला फसवून तिची कादंबरी घेऊन पळून आलात्या मित्राला त्याने ती विकली.
तो मित्र होता सिनेक्षेत्रातला लेखक…सुजयच्या कॉलेजमध्ये होता म्हणून त्यांची ओळख….घरी गडगंज…ह्याआधीही त्याच्यावर कथा चोरल्याचे, किंवा जुन्या मूव्हीजमधले काही प्रसंग जसेच्या तसे कथेत उचलल्याचे, किंवा जुन्या मुव्हीच्या कथेच्याच धर्तीवर नवी कथा लिहिण्याचे असे छोटे-मोठे आरोप पेपरमध्ये वाचले होते…कोमलची कथा तर त्याने जशीच्या तशी घेऊन त्यावर एक सिनेमा करण्यासाठी ह्या मुव्हीच्या प्रोड्युसरला संपर्क केला…कथा अर्थात मुव्ही साठी अतिशय योग्य होती…हा मुव्ही सुपरहिट होणार हे कथेवरूनच कळत होतं…पुढच्या चारेक महिन्यातच मुव्हीची स्टारकास्ट आणि बाकी सगळ्या गोष्टी ठरवल्या गेल्या आणि पेपरमध्ये ह्याबद्दल मोठी जाहिरातही दिली गेली. पुढच्या वर्षी हा मुव्ही येतोय अशी…

. कटनीहून परत आल्यावर केलेल्या ह्या सगळ्या गुन्ह्यांमुळे सुजय नकळत तुटक वागायला लागला, घरी, मित्रांबरोबर, सगळ्यांबरोबरच….सोशल नेटवर्किंग साईट्स वरसुद्धा त्याने अपडेट्स टाकणं बंद केलं जुन्या मित्रांशी संबंध तोडून टाकलेपहिल्या पंधरा दिवसातच प्रशांतला ह्या सगळ्यामध्ये आणखी काहीतरी घडलं असल्याचा संशय आला आणि त्याने सुजयच्या काकांना थोडाफार अंदाज दिला..पण त्याने त्यांना भेटून आणखी डिटेल्स देण्याआधीच तो ऍक्सीडेन्ट मध्ये गेला.

. जवळपास तीन आठवड्यांनंतर कोमलने सुजयविरुद्ध पोलीस कम्प्लेंट केली. आधी त्याबदल्यात काहीच हालचाल झाली नाही….पण चारेक महिन्यानंतर पेपरमध्ये न्यूज आली, ह्या विषयावरचा सिनेमा येतोय अशा आशयाचा….कोमलने पुन्हा एकदा कम्प्लेंट केली . ह्यावेळेला प्रोड्युसरविरुद्ध त्या प्रोडक्शन हाऊस मधून चौकशी व्हायला लागली तसं सुजयच्या त्या लेखक मित्राला कळलं…मीडियासमोर सगळं स्पष्टीकरण द्यायची जबाबदारी प्रोड्युसरने लेखकावर टाकली.  आता हे प्रकरण चिघळलं तर आपलं नाव खराब होईल आणि आर्थिक नुकसानसुद्धा होईल हे लक्षात आल्यावर त्या मित्राने सुजयला कॉन्टॅक्ट केलाकोमलला फोन करून माफी मागून तिची कादंबरी परत घ्यायला ये म्हणून तिला बोलवायला सांगितलंपुढे काय होऊ शकतं ह्याचा सुजयला अंदाज आला होता पण अर्थात ह्या सगळ्यात तो सुद्धा अडकणार होता त्यामुळे, त्याने जास्त विचार न करता मुंबईत बसून तिला फोन केलाभेटायला प्रजापती निवासला बोलावलंशिवाय अशा वेळेला बोलावलं जेव्हा तिच्या बरोबर कुणीही येऊ शकणार नाहीपुढचं सगळं त्या मित्राने केलं त्याच्या माणसाला हाताशी धरून..कोमलला जबरदस्तीने विष पाजलंतिला प्रजापती निवास मध्ये नेऊन टाकलं, आत्महत्येची खोटी नोट लिहिली..

. एवढं सगळं झाल्यावर आता मागचं सगळं उगाळून काढणारं कुणीच राहिलं नव्हतं..सुजय आता निर्धास्त होऊन आईने बघितलेल्या मुलींना लग्नासाठी भेटायला तयार झाला. पण लग्न ठरलं आणि काही वेळा त्या मुलीला भेटल्यानंतर त्या मुलींना विचित्र असे भास व्हायला लागले, कधी विचित्र आवाज, कधी कुणीतरी दिसल्याचा भासह्याचा संबंध सुजयशी असल्याचा संशय आल्यावर लग्न मोडायचंअसंच योगिताशी ठरलेलं लग्न मोडलं…आणि सुजयला शंका आली, लग्न ठरताना त्याचा भूतकाळ काही विचित्र रूप घेऊन त्याच्या लग्नाच्या मध्ये येतोय अशी… 

. माथेरानला कामासाठी गेलेला असताना अचानकपणे त्याच्याच वयाचा, त्याच्यासारखी बॅकग्राऊंड असलेला, त्याचंच नाव असलेला जुहूला राहणारा सुजय साने त्याला भेटलापाठोपाठ सायलीचं स्थळ त्या मॅरेज ब्युरोत त्याने बघितलंआणि मग त्याच्या डोक्यात पुढचा प्लॅन शिजायला लागला.

१०. लग्न केल्यावर त्याच्या नावावर होणारी करोडोची जमीन त्याला दिसत होती…त्यासाठी तरी लग्न करणं भाग होतं.. सगळ्या शक्यता लक्षात घेऊन आता त्याने सगळी तयारी केलीदुसऱ्या सुजयला तयार केलं. फेसबुकवर काही खोटे प्रोफाईल्स तयार करून त्यातून स्वतःच्या प्रोफाईलवर कमेंट्स लिहिल्या, पोस्ट्स शेअर केल्यास्वतःच्या बाबतीत सगळं काही नॉर्मल असल्याचं भासवण्यासाठी. सायलीची सगळी माहिती काढली.

११. लग्न ठरल्यावर सायलीला भेटण्याचं त्याने शक्य तेवढं टाळलं. तरीही दोनतीन वेळा आलेल्या अनुभवांवरून सायलीला आणि तिच्या बहिणीला संशय आलात्यांनी शोध घ्यायचं ठरवलं..

१२. आधी सुजयच्या बाजूला राहणारी आजीतिच्याकडच्या मोलकरणीला भेटण्यासाठी लपतछपत केलेले प्रयत्न, मावशीचे मिस्टर म्हणून भेटलेले ते काका, त्यांना शोधण्यासाठी केलेलं त्या भाजीवालीचं खोटं कौतुक, पोस्टऑफिसमधून कौस्तुभचा आणि नंतर योगिताचा पत्ता काढून तिला भेटून सुजयच्या खऱ्या घरापर्यंत पोहोचण्याची कसरत असं एक एक करत सायलीला पुरावे मिळत गेले सुजयने खोटी ओळख सांगितली असल्याचे आणि तो काहीतरी लपवत असल्याचेपण पक्का धागा मिळत नव्हता.

१३. सायलीलाही भास होतच होतेतिने आणि तिच्या बहिणीने ऐकू आलेल्या त्या आवाजांचे अर्थ लावत कटनीबद्दल माहिती काढलीसायली सुजयच्या खऱ्या आईपर्यंत जाऊन पोहोचली आणि कटनीमध्ये काहीतरी घडलं असल्याचा संशय पक्का झाला.

१४. सिद्धार्थ कटनीला गेलाप्रजापती निवास मध्ये छूने कोमलची डायरी आणि फोटो ठेवलेला होता. त्या डायरीमधल्या पानांचा अर्थ लावता लावता सायलीला कोमलबद्दल थोडंफार कळलं, सुजयचा आणि तिचा काहीतरी संबंध असल्याचं कळलं..छूबद्दल पहिल्यांदाच कळलं

१५. डायरीत वाचल्याप्रमाणे कोमलच्या बाबतीत सुजयकडून काहीतरी गुन्हा घडला असल्याचं संशय आला आणि त्यामुळे सिद्धार्थ तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचलाकोमलने सुजयविरुद्ध केलेली कम्प्लेंटबद्दल त्याला कळलं आणि कोमलचा पत्ता मिळाला.

१६. सिद्धार्थ कोमलच्या घरी येऊन गेल्याचं छू कोमलच्या घरी गेल्यावर बाजूच्या बाईने तिला सांगितलंछू त्याच्याबरोबर मुंबईला आली आणि सुजयचं सत्य सगळ्यांसमोर आलं.

१७. कोमलच्या नावाने ब्लॉग सुरु करून तिची कथा ही सगळी टीम पार्ट बाय पार्ट त्यावर शेअर करायची असं ठरवून सगळे पुढ्च्या कामाला लागले. दरम्यान सुजयला मोठ्या हुशारीने, प्लॅन करून ट्रॅप करण्यात आलं. त्याने आणि त्याच्या लेखक मित्राने कोमलची कादंबरी चोरली आणि तीच कथा ह्या सिनेमात वापरली गेली हे त्याने स्वतःहून अर्जुनला सांगितलं, आणि तो फसला. आता त्याच्यावर आणि त्या मित्रावर केस उभी राहिली, कादंबरीची चोरी आणि कोमलच्या खुनासाठी. दरम्यान खऱ्या लेखकांचं नाव लावून तोच सिनेमा प्रदर्शित करणार असल्याचं जाहीर झालं आणि मग ती कथा ब्लॉगवर टाकण्याची गरजच उरली नाही….पण तरीही कोमलच्या नावाने ब्लॉग सुरु केलाच…तिने लिहिलेले बाकीचे लेख आणि बाबूजींनी लिहिलेले लेख त्यावर एक एक करून पोस्ट करण्यात येणार आहेत…पुढे त्यांनी लिहिलेलं काहीही कुणी चोरून स्वतःच्या नावाने छापू नये म्हणून केलेला एक छोटा प्रयत्न.. 

१८. डायरेक्टरने कोमल आणि तिच्या कथेवर विश्वास दाखवला. आणि ह्या येणाऱ्या मूव्हीचे लेखक म्हणून बाबूजी आणि कोमलचं नाव सगळ्यांसमोर आलं..ज्यायोगे शाळेसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे उभे करण्याचं त्यांचं स्वप्नं साकार झालं.

सायले, हे काय लिहिलंयस? आणि कशासाठी?”

 

कोमलसारखं मी पण आता लिहिणार आहे ईशी…” सायली

 

काय? सायले, प्लिज नको हा….तू बडबड कर फक्ततशीच चांगली वाटतेस….लिहिण्याच्या बाबतीत कोमलच्या जवळपासही फिरकणार नाहीस तू…” ईशा

 

मला माहीतच आहे ते….पण ईशी, मी म्हटलं प्रयत्न करायला काय हरकत आहे? आपली स्टोरी काय कमी आहे का? म्हणून सगळे पॉईंट्स लिहून ठेवत होते. म्हटलं उद्या खरंच कथा लिहायचा विचार केला तर काही विसरलो असं नको व्हायला…” सायली

 

सायले….प्लिज हा ह्या सगळ्याच्या बाबतीत सिरीयस नको होऊसतू ऑफिसमध्ये जाऊन बॉसिंग कर..ते चांगलं जमेल तुला….पण मला एक सांग, ह्या स्टोरीला नाव काय देणार आहेस, म्हणजे जर कधी चुकून माकून प्रकाशित केलीच आपण तुझी गोष्ट तर…?” ईशा सायलीला चिडवत म्हणाली.

सायलीसुद्धा त्याच मूड मध्ये होतीबऱ्याच दिवसात असल्या बिनबुडाच्या हवेतल्या गप्पा झाल्याचं नव्हत्या ईशीबरोबर….

हो गं ईशी, मग एक चांगलं नाव हवंच ना आपल्या स्टोरीलाम्हणजे मी लिहिलेली स्टोरी एवढी हायफाय आणि नाव कसंतरीच असं नको ना व्हायला..” सायली

 

सायले, जोक्स अपार्टखरंच काय नाव देशील तू ह्या कथेला?” ईशा

 

बाबूजींनी दिलेलं नाव आपल्या कथेलाही साजेसं नाही का ईशी? फक्त मी एक बदल करणार त्यात…’अज्ञाताच्या शोधातअसं नाही तर अज्ञाताची चाहूलअसं नाव देणार मीकारण अज्ञाताची चाहूल लागली आणि मगच पुढचं सगळं घडलं ना…”

 

वाछान नाव आहे…’अज्ञाताची चाहूल‘….मस्तपण सायले, तुझ्या कथेत एक गोष्ट राहून गेलीये…” ईशा

 

कोणती गोष्ट?”

 

सिद्धार्थ आणि सायलीचं पुढे काय झालं?” ईशा सायलीला डोळा मारत म्हणाली.

 

ईशा…” सायली हात उगारत म्हणाली.

 

अगं चिडतेयस कशाला? मी गोष्टीतल्या सिद्धार्थबद्दल विचारलं….” ईशा गालातल्या गालात हसत म्हणाली.

 

पण मी गोष्टीत असं कुठे म्हटलंय की सिद्धार्थ आणि सायलीमध्ये काही होतं असं?” सायली

 

पण एखादा मुलगा एवढी रिस्क घेऊन एखाद्या मुलींसाठी असं काही करतो म्हटल्यावर वाचकांना हे कळणारचमग त्याचाही शेवट काय हे पण कळायलाच हवं ना तुझ्या स्टोरीच्या वाचकांना?”

 

ओके. सायली सिद्धार्थला तो काही विचारण्याआधीच नाहीसांगते. डायरेक्ट्ली नाही पण असंच सहज बोलताबोलताती त्याला सांगते की आपण खूप चांगले फ्रेंड्स आहोत पण ह्यापेक्षा पुढे जायचं असेल तर त्या दृष्टीने मी तरी विचार केलेला नाहीसायलीला तीन महिन्यांसाठी सिंगापूरला जायचंय, तिथल्या क्लायंटसोबत त्यांच्या ऑफिसमधून काम करायला आणि तिच्या टीममधले आणखी तीन लोक तिला जॉईन करणार आहेत, त्यात सिद्धार्थ पण असेलबघूया ह्या तीन महिन्यात काही पुढे सरकतंय का त्यांच्यात….” सायली

 

हम्म..हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय आधी. पण म्हणजे आमच्यासारख्या बिच्चाऱ्या वाचकांना कळणारच नाही का, पुढे त्यांचं काय झालं ते?” ईशा आपला मुद्दा सोडायला तयार नव्हती

 

नाहीपण फारच अगदी त्यांना सायली आणि सिद्धार्थबद्दल पुळका आलाच असेल ना, तर थोडं थांबा म्हणावंअज्ञाताची चाहूल पार्ट २लिहायला घेते आता त्यांच्यासाठी…”

सायली आता पुन्हा ईशावर वैतागायला लागली. खरं तर कंटाळून बाहेर जायला म्हणून उठलीच. पण ईशाने तिचा हात धरून तिला थांबवलं.

सिद्धार्थ चांगला आहे गं सायलीआणि त्याने बोलून नसेल दाखवलं तुला पण त्याला तू जेनुइनली आवडतेसतुला पण माहित आहे तेमग विचार करायला काय हरकत आहे? अरेंज्ड मॅरेज ब्लाईंडली करायला गेलीस आणि काय अनुभव आला माहित आहे. म्हणून लव्ह मॅरेज कर असं नाही…..पण सिद्धार्थला तू चांगला ओळखतेसमावशीकाका सगळेचआता ह्या मधल्या सगळ्या प्रकारानंतर त्याचं पण घरी येणं वाढलंय..घरातल्यासारखा झालाय तो अगदीसगळ्यांचं मत घेऊन मग ठरवू शकतेस ना तू..” ईशा

 

ईशा, मी म्हटलंय तुला आधीचमला थोडा ब्रेक हवाय गं..मला नाही आत्ता लगेच हे लग्नबिग्न ह्याचा विचार करायचायथोडा मोकळा श्वास घ्यायचायम्हणून तर आय एम रिऍली लुकिंग फॉरवर्ड टु धिस सिंगापुर प्रोजेक्ट….मध्ये असा फोकस गेल्यासारखा झाला होता, पण आता पुन्हा कामावर काँसंट्रेट करायचंयसिंगापुरचं प्रोजेक्ट मला सुक्सेसफूली कम्प्लिट करायचंयसिद्धार्थ मला आवडतोखरंच आवडतोआणि आता आम्ही खूप जास्त चांगलं ओळखायला लागलोय एकमेकांनापण म्हणून लगेच हे लग्न-लग्न नाही सुरु करायचंय मलाप्लिज यार तू तरी समजून घे नाआणि सिंगापुरहुन परत आले की पुन्हा ही लग्नाची मोहीम सुरु होणारच आहेआणि मी नाही केली तरी आई गप्प बसणार आहे का? तेव्हा विचार करेन मी नक्कीपण प्लिज आत्ता नाही…”

 

ओके….डनबरं चल ..माई आजीला भेटूया बाहेरआता सरप्राईझचा वेगळा प्लॅन करायला लागणार…” ईशा

 तेवढ्यात अनि आत आला आणि त्याने खोलीचं दार आतून लावून घेतलं..

..दार कशाला लावतोयस? ” सायली

 

अगं एक बातमी आहे…” अनि

 

आता आणखी कोणती बातमी? मी दिल्यात तिला सगळ्या बातम्या …” ईशा

 

मी आत्ता आत घरात आलो ना परत, तेव्हा आई, माई आजीला सांगत होती. सकाळी मावशीचा फोन आला होता तेव्हा सगळ्या जुन्या गोष्टी आठवत होतो. पुण्यात असतानाचे दिवस सगळे डोळ्यांसमोर आले म्हणालीदर मंगळवारी सारसबागेतल्या गणपतीला जायचो असं सांगत होती माई आजीलाअगं म्हणजे एवढंच बोलत होत्या त्या दोघीसारसबाग ऐकून आपल्याला वाटलं की मावशीने आईला आपलं सरप्राईझ सांगितलं ..पण त्या वेगळंच बोलत होत्या. ” अनि

 

अनि, गाढव कुठला…” सायलीने त्याच्या पाठीत एक धपाटा घालत म्हटलं, “मी एक तासभर अशी विचार करत उदास बसून होते, एवढे दिवस मी प्लॅन करत होते, ते सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या विरुद्ध जाऊन…म्हटलं आता काय नवीन प्लॅन करायचा?”

 

एनीवे, आता सगळं ठरलंय…..येस….आता नेक्स्ट विकेंडमावशीकाकाऍनिव्हर्सरी….”

ईशा आणि अनि बडबड करत बाहेर निघून गेले पण सायली मात्र विचार करत खोलीतच रेंगाळली. फिरत फिरत पुन्हा खिडकीपाशी गेलीआज किती छान वाटत होतं..मनात एक आंतरिक समाधान होतं..आज कोमलही आनंदी असेल. तिने खिडकीबाहेर पाहिलंआज हवा किती मोकळी वाटत होती. नकळत तिची नजर वर आभाळाकडे वळलीछान निरभ्र दिसत होतं आकाश. त्या आकाशाकडे ती बघतच राहिली डोळे भरून. नकळत त्यावर एक चेहरा तरळलाओळखीचा चेहराकोमलचा….त्या चेहऱ्याकडे बघता बघता सायलीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले

कोमल, आज हवी होतीस तूस्वतःचं स्वप्नं पूर्ण होताना बघण्यासाठीतू नकळत खूप दिलं आहेस मलाहीहे सगळं झालं नसतं माझ्या आयुष्यात, तर माझ्यातल्या ह्या मीला कधी ओळखूच शकले नसते मी…. आपल्या सगळ्यांमध्येच असा किंवा अशी मीअसते, आव्हानांना सामोरी जाणारी, सत्याचा शोध घेणारी, माघार न घेणारी….माझ्यातल्या ह्या मीला मी जिवंत ठेवू शकले तुझ्यामुळेथँक्स कोमल…”

समोर दिसणाऱ्या आकाशात तरळणाऱ्या कोमलच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू फुटलंसं वाटलं आणि नकळत सायलीच्याही ओठांवर हसू आलंडोळे पुसून ती मागे वळली..

 

एक वर्तुळ आज पूर्ण झालं होतं. आता करण्यासारख्या पुढे बऱ्याच गोष्टी होत्या, त्याची तयारी करायला हवीसगळ्यात आधी आईबाबा ऍनिव्हर्सरी, मग दोन दिवस सगळ्यांची मिळून एकत्र ट्रिप…नुसती धमाल करायची , त्यानंतर कटनीची एक ट्रिप मग तयारी सिंगापूरची…आणि मग कदाचित पुन्हा लग्नाची मोहीम….पण कुणाशी? जाऊदे…कशाला आत्ता विचार करायचा…आधी आई-बाबांचं सरप्राईझ प्लॅन करायला हवं..

 

ओठांवरचं हसू तसंच ठेवत ती बाहेर जाण्यासाठी दरवाजाकडे वळली आणि तेवढ्यात मगाशी ईशाने वाचलेले ते कागद दिसले बेडवर. ईशाचं आणि तिचं मगाशी झालेलं बोलणं आठवलं आणि तिला हसूच आलं..बाजूलाच पडलेलं एक पेन तिने उचललंआणि त्या कागदावर सगळ्यात वरती मोठ्या अक्षरात लिहिलं..

अज्ञाताची चाहूल‘.

आणि सगळ्यात खाली लिहिलं…

समाप्त. 

**********************************************************************

                                                                 धन्यवाद !!!

 

18 Comments Add yours

  1. sarika devrukhkar says:

    thank you so must rutusara for lovely story. ajun ek request ahe tumhi asech lihit raha amhala avdel tumchya stories vachayla. I m waiting for next story. thank you so so much

    Liked by 1 person

    1. Anjali says:

      khoooop mast zali story.

      we are waiting for next one.

      All the best.

      Liked by 1 person

      1. rutusara says:

        Thank you 🙂 pudhe kaay lihaycha kahi tharavala nahiye ajun …pan baghu…lavkarach lihen…keep visiting davabindu…dhanyavaad !!

        Like

    2. rutusara says:

      Thank you very much…pudhe kaay lihaycha hyacha ajun vichar kelela nahi…pan lavkarach kahitari lihen….keep visiting davabindu….

      Like

      1. sarika devrukhkar says:

        hello mam tumchi next story kadhi prakashit karnar

        Like

      2. rutusara says:

        mazya blog la bhet dilyabaddal thanks 🙂 pudhchya storybaddal aattach tasa kahi sangta yenar nahi…pan kahitari navin gheun yeinach nakki…blog la asach bhet det raha ..:)

        Like

  2. sarika devrukhkar says:

    me tumcha blog roj pahin new story sathi

    Liked by 1 person

  3. Ujvala says:

    Jhakas fakte saile ani sidhart cha lagna zala paige hota

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      Thank you….Saylichi aatta lagn karnyachi ichha nahi naa…:)

      Like

  4. Sweetali says:

    Lovely story…nice ending…keep on writing.

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      Thank you dear 🙂

      Like

  5. Pranjali Borikar says:

    Ekdam Mast!! Thanks for writing and sharing your masterpiece, your treasure with us. I really enjoyed each n every part with its unexpected twists and turns.Keep on writing . Most awaiting for your next story/article. All the best!!!

    Like

  6. Bhagyashree Raut says:

    story khup chan ahe . tumhi hi story esahity.com ya site vr takavi as mala vat te , tya site vr marathi vachak khup aahet..

    Like

    1. rutusara says:

      Thanks…nakki vichar karen suchanecha…

      Like

  7. Bhagyashree Raut says:

    khupach chan story ahe … i think tumhi hi story esahity.com ya site vr takavi, tya site cha vachak varg motha ahe

    Like

    1. rutusara says:

      suchavilyabaddal dhanyavaad!! nakki vichar karen…

      Like

  8. sarika devrukhkar says:

    Hello… mam i am waiting for your next story ………..

    Like

  9. hello…. rutusara i m waiting for your next story please upload next story. your best writer

    Like

Leave a comment