अज्ञाताची चाहूल : (भाग : 36)

आता ह्या सुजयची मदत घायची. कशी, ते माहित नाही. पण बघू, विचार करूच. काय योगायोग होता, मागच्याच आठवड्यात त्या विवाह मंडळाच्या बाहेर त्या म्हाताऱ्या माणसाची टक्कर झाली. त्याच्याकडून ते विवाह मंडळाचं कार्ड मिळालं. आणि मग विवाह मंडळात त्या सायली देशपांडेंचा फोटो. हे सगळं कसं पुढे न्यावं ह्याचा विचार करतच होतो तेवढ्यात हा सुजय साने भेटला….